Priyal_my_fight_with_cancer

Priyal_my_fight_with_cancer

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Priyal_my_fight_with_cancer, Health/Beauty, Amravati.

Since 6 months i m fighting c cancer i just want to tell u all abt my journey c cancer, my mental, physical an emotional condition that i m facing yet..an want to encourage cancer patients..

Photos from Priyal_my_fight_with_cancer's post 24/07/2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌿

आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून आत्मपरीक्षण, संयम, श्रद्धा आणि सकारात्मक परिवर्तनाचा उत्सव आहे.
समुपदेशक म्हणून एवढेच सांगू इच्छिते की, जसे आपण शरीराला विश्रांती देतो, तसेच मनालाही शांततेची गरज असते. राग, चिंता, अपराधीपणा आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करून प्रेम, क्षमा, कृतज्ञता आणि आशा यांचा स्वीकार करूया.
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या विचारांप्रमाणे, मन निर्मळ असेल तर जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनते.
या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या जीवनात मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना.
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
॥ पांडुरंग हरी विठ्ठल ॥ 🙏

24/07/2026

आज दुपारचं जेवण....

ज्वारीच्या पिठाचे धिरडं, पत्ता कोबी,भेंडी आणि शेवग्याच्या पानांची भाजी,सोबत वरण एक चमचा तूप घालून😂
साधं, पौष्टिक आणि चविष्ट....

24/07/2026

मी खेड्यात का राहते?
बरेच जणांचं म्हणणं असतं, तू खेड्यात का राहते? तू पुण्याला का शिफ्ट होत नाही,तू मुंबईला का शिफ्ट होत नाही.
एक काळ असा होता, की मला सुद्धा खेड्यात राहायला आवडत नव्हतं. खेड्यात राहणं म्हणजे सगळं तुमच आयुष्य फ्रीज होतं असं मला वाटायचं. इथे काहीच अपॉर्च्युनिटी नाही त. पैसा नाही आहे, थोडा कुठे विरंगुळ्यासाठी काहीच गोष्टी नाही आहेत. कारण लहानपणापासून मी शिक्षणासाठी बाहेरगावीच राहिले. त्यामुळे खेड्यात आल्यावर मला बोर व्हायचं. सगळी फॅमिली एकत्र असली तरच मला आवडायचं.
वयानुसार माणूस, परिस्थिती, जगण्याचा दृष्टिकोन सगळच बदलत असत. हा बदल माझ्यातही झालेला आहे.
आता मला सगळ्या चैनींच्या गोष्टी पेक्षा, शांतता आयुष्यात हवी आहे. समाधानकारक आयुष्य हवे आहे.
आधी दोन दिवस गावी आल की बोर व्हायचं. आता दिवस कुठे जातो कळत नाही.
ती मोकळी हवा, शांतता, निसर्ग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांततेच आयुष्य. घरापासून दोन मिनिटांवर क्लिनिक. न गाडीची गरज ना काही. निसर्गातून मिळणाऱ्या अशा ओरिजनल गोष्टी, हे सगळं मला माझं गाव देत आहे.
आणि आत्ता असं झालंय या आयुष्यात मी रमलेय. खेड्यात राहताना, तुमच्या गरजा खूप कमी होऊन जातात. एक स्वच्छंद वातावरण इथे आहे. आता मला माझं गाव सुटत नाहीये.

24/07/2026

प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली, हे आयुष्य सरळ, समाधानकारक होत. आणि प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत गेलो तर ते दुखणं अजून वाढतं.

24/07/2026

Do good for others, it will come by unexpected way 🤞😊

दुसऱ्यांसाठी चांगलं करण्याची भावना जर तुमची असेल, तर तुम्ही केलेली मदत, तुमची कर्म हे कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला परत मिळतात. त्याचा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतलेला आहे.
माझ्या आजारपणात मला इतक्या लोकांचे फोन मेसेजेस आले, की ते वाचून मला रडायला यायचं. आपण आयुष्यात काय कमावलं हे त्यादरम्यान मला कळालं.
तुझ्यासारख्या मुली सोबत असं होऊच शकत नाही. नेहमी दुसऱ्यांसाठी मदतीसाठी तू तत्पर असणारी मुलगी, तुझ्याकडून कधीच नाही हा शब्द आम्ही ऐकला नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येकासाठी धावून येणारी, दुसऱ्यांना नेहमी आनंद देणारी तू. तुझ्यासोबत देव एवढा निष्ठुर होऊ शकत नाही, असे मेसेज मला त्यावेळेस मी ज्या लोकांसोबत आयुष्यात वेळ घालवला, कामाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये, माझ्या रूम मेट, माझे सीनियर, या सगळ्यांचे होते. आणि हे सगळं वाचून माझे डोळे पानवायचे.
आणि तेव्हा मला कळालं की तुम्ही जेव्हा तुमचे कर्म चांगले ठेवतात कुठलेही अपेक्षा न ठेवता, त्याच फळ तुम्हाला मिळतच.
आणि तुम्ही ज्या लोकांना मदत केली तीच लोक तुम्हाला मदत करतील अशी अपेक्षा जर तुम्ही ठेवत असाल तर ते प्रत्येक वेळेस चुकीच आहे. ज्यांना मदत केली ते लोक तुम्हाला आयुष्यात मदत करतील किंवा तुमच्या कठीण काळात धावून येतील असे नाही पण तुम्ही केलेले चांगले कर्म कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला येऊन मदत करतात. पण ती दुसरी लोक असतात.
म्हणून आयुष्यात अपेक्षा करायचा नाहीत. फक्त आपले चांगले कर्म करत जायचं. त्याच फळ तुम्हाला निश्चितच कधी ना कधी मिळते. आपल्यामुळे कधीच कुणाचा वाईट होऊ नये हे दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.

Photos from Priyal_my_fight_with_cancer's post 23/07/2026
23/07/2026
23/07/2026

तुम्हाला कुठलाही आजार झाल्यानंतर, तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळे ट्रीटमेंट करून, मग मात्र तुम्ही बाकीच्या औषधा घेऊ शकता. पण जाहिरातींना बळी पडून, आजार वाढवून घ्यायचा नाही.

Photos from Priyal_my_fight_with_cancer's post 23/07/2026

आज दुपारचं जेवण....

माझा आजारानंतर सर्वात जास्त मी सफर झाले दातांमुळे.
उजव्या बाजूला ऑपरेशन झाल्यामुळे खाता येत नाही.
डाव्या बाजूला सर्व भार येऊन पडला. त्यामुळे सारख्या डेंटिस्टच्या वाऱ्या असायच्या. दोन रूट कॅनल झालेत.
आता दोन दिवसापासून परत दाळ दुखत आहे.
म्हणून आता भाजी भाकरी न खाता, असे नरम धिरडे सुरू आहे. याच्यामध्ये मी ज्वारी आणि बेसन पीठ घेऊन, घरात असतील त्या भाज्या त्यात घातल्या आहेत. शेवग्याची पानं सुद्धा घातली आहेत.
तर मंडळींनो,हे आहे माझा आजचा दुपारचं जेवण, साधं पौष्टिक आणि चवीष्ट....🙏☺️

23/07/2026

My fight with cancer doesn't stop my responsibilities as a doctor.
Sometimes the scars you can't see are the ones that need the most heeling.
We must treat the mind not just the body.....

Want your business to be the top-listed Beauty Salon in Amravati?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Amravati