Modern GENTS Parlor

Modern GENTS Parlor

Share

R J Modern Saloon is Owned and Served by Shri. Ravi Jadhav , Nhavi Pada, Badlapur East.

Having Expertise in Hair Treatment and Saloon from More than almost 60 Years from forefathers.

25/01/2025

Satkarma Ashram Badlapur Ravindra Jadhav

07/01/2025

*विलक्षण श्रीमंत मराठी भाषा*......

*रस्ता - मार्ग*
* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

*खरं - सत्य*
* बोलणं खरं असतं.
* सत्याला सोबत पुरावा जोडावा लागतो.

*घसरडं - निसरडं*
* पडून झालं की घसरडं.
* सावरता येतं ते निसरडं.

*अंधार - काळोख*
* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
* निसर्गात जाणवतो तो काळोख.

*पडणं - धडपडणं*
* पडणं हे अनिवार्य.
* धडपडणं हे कदाचित सावरणं.

*पाहणं - बघणं*
* आपण स्वत:हून पाहतो.
* दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

*पळणं - धावणं*
* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

*झाडं - वृक्ष*
* जे माणसांकडून लावलं जातं ते झाड.
* जो आधीपासूनच असतो तो वृक्ष.

*खेळणं - बागडणं*
* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
* जे मुक्त असतं ते बागडणं.

*ढग - मेघ*
* जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग.
* जे नक्की बरसतात ते मेघ.

*रिकामा - मोकळा*
* वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा.
* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.😊

*निवांत - शांत*
*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

*आवाज - नाद*
* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
* जो घ॔टेचा होतो तो नाद.

*झोका - हिंदोळा*
* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका.
* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

*स्मित- हसणं*
* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

*अतिथी - पाहुणा*
* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

*घोटाळा - भानगड*
* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.

*आभाळ- आकाश*
भरून येतं ते आभाळ.
निरभ्र असत ते आकाश.

*आहे की नाही आपली अमृताशीही पैजा जिंकणारी ही मराठी भाषा,अतिशय श्रीमंत !!!!!*

15/10/2024

आचारसंहिता लागू झाली आहे,कूणीही राजकीय पोस्ट टाकू नये, आलेली पोस्ट पूढे पाठवू नये. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी 🙏

03/10/2024

#कथाविश्व .....फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी ... परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी...... गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी..... वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी..... पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी.... एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी...... गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी ..... पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी..... पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पूर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी ..... पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी

मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नी कडून वसूल केले.

म. गांधीजींच्या जयंतीच्या गदारोळात त्यांचा हा कर्मयोगी शिष्य नेहमी झाकोळला जातो.

असे साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी,

त्यांना अनंत दंडवत....🙏🏻🙏🏻🙏🏻
कथाविश्व - भारत मातेच्या या महान सुपुत्रास शत शत नमन🌹🙏

25/09/2024

फेसबूकचे नाव *मेटा* केलंय तसेच व्हॉट्स ॲप चे नाव *कुटी* करा...कारण ह्या दोन्हींमुळे आयुष्य *मेटाकुटीला* आलय.!

Photos from Modern GENTS Parlor's post 21/09/2024

मोदकायन !!!!
मोदक हा उकडीचा पण असतो हे कळायला माझी आयुष्याची बरीच वर्षे गेली ... लहान पणी आमच्या खांदेशात मोदक म्हणजे फक्त तळणीचे .. २६ वर्षा पुर्वी मुंबईत आलो आणि मग या " अदभुत " पदार्थाची ओळख झाली ....

हे दोनही पदार्थ आपापल्या जागीच श्रेष्ठच फरक असेल तर तो फक्त ग्लॅमरचा .... उकडीच्या मोदकाचे ग्लॅमर तळणी मोदकाला नाही ....आणि तळणीच्या मोदकांची सहजता उकडीच्या मोदकात नाही ....

मनात आले आणि उकडीचे मोदक केलेत असं होत नाही ... तो एक कौटुंबिक सोहळा असतो ... खाणारे लोक मोजुन मापुन तो करण्याचा दिवस ठरवुन त्याची पुर्व तयारी केली जाते ...बरं आता केलेत तर घरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या हातावर ठेवलेत , शेजारी पाजारी दिलेत असही होत नसते ... अतिशय जवळच्या जिव्हाळ्याच्या लोकां करता केलेला हा पदार्थ असतो , या उलट तळणीचे मोदक ह्याला सामाजिक पदार्थ म्हणता येईल ...मोज माप न करता केलेला ... शेकड्यानी करून वाटता येण्या सारखा ...

एखादी गोष्ट उरकायची म्हणुन करायची असेल तर करूच नाही या प्रकारात मोडणारा पदार्थ म्हणजे उकडीचा मोदक ... हे करायला प्रचंड चिकाटी लागते , पण अंगी चिकाटी आहे म्हणुन मोदक जमेल असेही नसते ... ती एक कला आहे ...कारण केलेला मोदक पानांत वाढण्या पुर्वी फुटला तर त्याचे निर्मितीमुल्य शुन्य होते ....या मोदक प्रक्रिये मध्ये करणारा / करणारी कितीही वाकबगार असले तरी त्यांचा कधीही रोहित शर्मा होऊ शकतो ....तिथे द्रविड ची खेळीच आवश्यक असते ...

या उलट तळणीचा मोदक करणाऱ्याच्या पेशन्सची परीक्षा अजिबात घेत नाही ...पण म्हणुन कोणीही उठुन याच्या वाटेला गेलं तर त्याचा फरदीन खान होतो ...म्हणजे काय तर त्यांची पाक कला सुरु होण्या पुर्वीच अस्ताला जाण्याची शक्यता असते ...

उकडीचा मोदक रंग , रूप , सादरीकरण या सगळ्याच बाबतीत श्रीमंत , त्याच्या अगदी विरूद्ध तळणीचा मोदक... प्रसिद्धी आणि ग्लॅमर पासुन तसा दूर ....उकडीच्या मोदकात कुबेराची श्रीमंती असेल तर तळणीच्या मोदकात टाटांचे औदार्य आहे ...

उकडीच्या मोदकात लता दीदीच्या आवाजा सारखी तरलता असेल तर तळणीच्या मोदकात आशा ताईच्या आवाजा सारखा खट्याळ पणा आहे ...उकडीच्या मोदकाचे आव्हानं न पेलवणारे असते , पण तळणीच्या मोदकाचे आव्हान सहज पार करता येते .....

उकडीच्या मोदकात सचिन च्या खेळीची नजाकतता आहे तर तळणीच्या मोदकात गावस्कर ची सहजता आहे...

दोनही मोदक आपल्या जागी श्रेष्ठच !!!

मोदक मग कुठलाही असो , कंजूसपणा झळकेल इतकं कमीही नाही व मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही असं सारण भरून मोदक सहज पणे करता येणाऱ्या मुलीच्या भविष्याची काळजी तिच्या आई करता त्या क्षणा पूरता मिटलेली असते ...

आम्ही भारतीय लोक भावनिक असतो , प्रत्येक गोष्टींशी आमचे भावनिक नातं जडलेले असते त्या मुळे मोदकाशी आमचे भाववनिक नाते असते ... पानातला पदार्थ होण्या आधी तो आमच्या करता प्रसाद असतो ...आम्ही वारसा जपणारे ...त्या मुळे मोदक कितीही पोट फुटे पर्यन्त खाल्ले तरी ते आमच्या करता dessert कधीच नाही होऊ शकत ...

तुम्हाला उत्तम प्रतीचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर तुमच्या आयुष्यातला मोठा काळ हा रत्नागिरी, गुहागर, केळशी अशा कुठल्या तरी ठिकाणी जावा लागतो. कारण हाताच्या चवीइतकाच मातीचा सुगंधही इथे महत्वाचा आहे. तसंच, हा पूर्णतः ‘तालमीचा राग’ आहे. यूट्यूब वर बघून हा येऊ शकत नाही. आई, आज्जी, आत्या अशा कुणाकडून तरी त्याची रीतसर तालीम घ्यावी लागते.

आपल्याकडे बाजारात उकडीचा मोदक बनवायचे ‘साचे’ मिळतात. ही ‘चीटिंग’ आहे. हे म्हणजे ऑटोट्युनर वापरून सुरेल होण्यासारखं झालं. जातिवंत खवैयाला असा ‘साचेबद्ध’पणा रुचत नाही.

मोदक हा व्हीआयपी पाहुणा आहे. त्याचं स्वागत टेबल-खुर्चीवर बसून नाही, तर पाटावर मांडा ठोकून करायचं असतं. सोबत आमटी-भात, बटाट्याची भाजी, चटणी वगैरे माननीय पाहिजेतच. मोदक स्वतः सुद्धा येताना कधी एकटा येत नाही, तर ‘निवग्री’ नावाच्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन येतो. निखळ मधुर रसाच्या मोदकाबरोबर निवग्रीची ही चमचमीत जोड हवीच.

तर असा दिमाखात आलेला मोदकराज तुमच्या पानात पडतो, त्यावर साजूक तुपाची धार पडते, आणि त्याचा पहिला घास जेव्हा तुम्ही घेता, त्या वेळी होणाऱ्या भावनेलाच आपल्या संतसज्जनांनी ‘ब्रह्मानंदी टाळी लागणे’ असं म्हणलेलं आहे. यानंतर असते ती केवळ तृप्तीची भावना. खाल्लेले मोदक मोजणं म्हणजे रियाजाचे ‘घंटे’ मोजण्यासारखं आहे. त्याला फारसं महत्व नाही. ‘समाधान’ हेच खरं इप्सित.

बरं, भरपूर मोदक केवळ खाऊन झाले म्हणजे झालं, असं नाही. त्यानंतर संपूर्ण दुपार झोपण्यासाठी राखीव ठेवावी लागते. मुळात, मला ‘सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ?’ असं कुणी विचारलं तर मी तत्क्षणी सांगीन, ‘दुपारची झोप’!

‘रात्रीची झोप’ हे धर्मकर्तव्य आहे, तर ‘दुपारची झोप’ हा रम्य सोहळा. डोअरबेल बंद, फोन सायलेंटवर, पूर्ण अंधार, डोक्यावर पंखा अशा स्थितीत जाड पांघरुणात शिरून तो साजरा करायचा असतो. आणि हा सोहळा जर मोदकाच्या आगमनाने सुफळ झाला तर अजून काय हवं ?

सुमारे ३ तास निद्रादेवीच्या सान्निध्यात घालावल्यावर जड डोळ्यांनी चहाचा पहिला घोट घेतल्यावरच मोदकाची इतिकर्तव्यता पूर्ण होते.

15/09/2024

तू फक्त डायग्राम दाखव, बाकीचे मी लिहितो. या अफाट आत्मविश्वासावर इंजिनीयर झालेल्या सर्व इंजिनिअर्सना
Happy Engineer's Day👍

08/09/2024

🐀🐀🐀🐀🐀श्री गणेश जीवन परिचय
१] वडील = भगवान शंकर
२] आई = देवी पार्वती
३] मोठा भाऊ = कार्तिकेय
४] बहीण = अशोकसुंदरी
५] पत्नी = रिद्धी व सिद्धी
६] पुत्र = शुभ व लाभ
७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत
८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून
९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = डिंक
१०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = प्रणव
११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = गाणपत्य
१२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात? = कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने
१३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = भगवान शंकर
१४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = हत्तीचे शिर बसवून
१५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = लेखनिक
१६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = मोदक,लाडू
१७] आवडता रंग व फुल = लाल,जास्वंदीचे
१८] प्रिय पत्री = दूर्वा,शमीपत्र
१९] हातातील मुख्य अस्त्रे =पाश,अंकुश
२०] नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे =सुमुख,एकदंत,कपिल,गजकर्णक,लंबोदर,विकट,विघ्ननाश,विनायक,धुम्रकेतू,गणाध्यक्ष,भालचंद्र व गजानन@highlight
२१] श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली ? = समर्थ रामदास स्वामी

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही..

आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला.

हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली.

माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले.

या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.
ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.

श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच माझी गणेशास प्रार्थना..🙏🙏

Mitra Song Video - Kanha | Marathi Dahi Handi Songs | Vaibhav Tatwawdi, Gashmeer Mahajani 24/08/2024

🎬 दहीहंडी स्पेशल गाणी!
लवकरच ठिकठिकाणी गोविंदा मानवी मनोरे उभारून दहिहंडी फोडतील. सगळीकडे जल्लोषाचे वातावरण असेल. आजपर्यंत अनेक कलाकारांनी दहिहंडीच्या उत्सवावर आधारीत गाण्यात सादरीकरण केलंय. काही लोकप्रिय गाणी तुमच्यासाठी घेऊन आलोय...

1. गोविंदा आला रे : http://bit.ly/321dxfe

2. मच गया शोर : http://bit.ly/2U2COmj

3. हर तरफ है ये शोर : http://bit.ly/2LaEZjE

4. शोर मच गया शोर : http://bit.ly/2ZeAHl6

5. चांदी की डाल पर सोने का मोर : http://bit.ly/2zhRnJ4

6. पिंट्या : http://bit.ly/2Hi8JKv

7. गो गो गोविंदा : http://bit.ly/30urhOZ

8. नंद का लाला रे : http://bit.ly/2Zqhf00

9. लाल पागोटं, गुलाबी शेला : http://bit.ly/30wl5pR

10. गोविंदा रे गोपाळा : http://bit.ly/33Z616u

11. डॅशिंग गोविंदा : http://bit.ly/2NwVARB

12. मित्रा (कान्हा) : http://bit.ly/2P8kbi7

Mitra Song Video - Kanha | Marathi Dahi Handi Songs | Vaibhav Tatwawdi, Gashmeer Mahajani Presenting Superhit Marathi Dahi Handi (Gokulashtami) Song 'Mitra' from Marathi Movie 'Kanha कान्हा'. Beautifully Sung by Adarsh Shinde & Rohit Raut. Music c...

Photos from Modern GENTS Parlor's post 08/08/2024
Want your business to be the top-listed Beauty Salon in Badlapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Le Hall
Badlapur

Opening Hours

Tuesday 8am - 5pm
6pm - 11pm
Wednesday 8am - 5pm
6pm - 11pm
Thursday 8am - 5pm
6pm - 11pm
Friday 8am - 5pm
6pm - 11pm
Saturday 8am - 5pm
6pm - 11pm
Sunday 8am - 5pm
6pm - 11pm