Dhawale Bal Rugnalay
Dhawale Bal rugnalay is children hospital located in Mohada town of Yavatamal District (Maharashtra) run by Dr.Tushar Dhawale (M.D.) Child Specialist.
This page is created for parent education purpose only.
29/07/2026
"O.R.S. जलसंजीवनी आहे"
1)ORS ची आवश्यकता:
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार जगात दुसऱ्या क्रमांकाने 5 वर्षाच्या आतील लहान मुलं ही अतिसारामुळे (जुलाब) दगावत असतात. अतिसार/ जुलाब - उलट्या मध्ये पाणी आणि क्षार भरपूर प्रमाणात शहराबाहेर फेकल्या जातात.यात अस्वच्छता, दूषित पाणी, बाळाने अजाणतेपणी तोंडात घातलेल्या अस्वच्छ वस्तू, इतक्या तान्ह्या बाळाला खेळण्यासाठी देण्यात येणारी खेळणी या वस्तूमधील बॅक्टेरीया (जिवाणू) व्हायरस (विषाणू) तोंडाद्वारे पोटात शिरतात. आणि ती न दिसणारी घाण पोटात गेल्यावर जुलाब आणि उलट्या होतात. स्तनपानाऐवजी बाटलीने दुध पाजणे हे ही बाळाला अतिसार होण्याचे महत्वाचे कारण आहे. आपल्याकडे काही मातांचा असा समज आहे की, दात येत असल्यामुळे बाळाला असे होत असते. त्यामुळे एक तर त्याच्याकडे "होईल बरं" असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं किंवा दात येण्यासाठी "औषध" दिली जातात. पण खरं म्हणजे दात येण्याचा व जुलाबाचा काहीच संबंध नसतो. अशा जुलाबामुळे शरीरातील पाणी, क्षार बाहेर पडत असल्यामुळे बाळासाठी सर्वात आवश्यक असते क्षार आणि पाणी... आणि Oral Rehydration solution (ORS) किंवा जलसंजीवनीमध्येही पाणी , साखर, मीठ यांचे प्रभावी प्रमाणात मिश्रण असते. त्यामुळेच जलसंजीवनी हे काम उत्तम प्रकारे करू शकते! जर जुलाब-उलटी होत असतानाच बाळाला ORS चे पाणी पाजायला सुरवात केली तर बाळाचे जुलाब तर थांबतातच, पण आपण बाळाला मृत्यूपासूनसुद्धा वाचवू शकतो. तेव्हा याविषयी जनतेने दक्ष व जागरूक आणि सज्ञानी राहायला हवे.
2)ORS दिन:
या दृष्टीने दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (25 ते 31 जुलै) ORS सप्ताह जगभरात साजरा केला जातो, तसेच 29 जुलै हा ORS दिन म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने ORS बद्दल जनजागृती सुद्धा या दिवशी केली जाते
3)जलसंजीवनी(ORS) विषयी माहिती:
ओआरएस (ORS - Oral Rehydration Solution) ची मुख्य घटक द्रव्ये म्हणजे सोडियम क्लोराइड (मीठ), ग्लुकोज (साखर), पोटॅशियम क्लोराइड आणि ट्राइसोडियम साइट्रेट आहेत. हे सर्व घटक योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून तयार केले जातात.
WHO ORS चे छोटे, मोठे पाकीट सर्व सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध असतात, मेडिकल स्टोर्स मधूनही सहज मिळतात. एक ग्लास (200ml) उकळून घेतलेल्या पाण्यात 1 छोटे पाकीट आणि 5 ग्लास (1लिटर) पाण्यात 1 मोठे पाकीट टाकून नीट विरघळून घ्यावे.तयार केलेले ORS २४ तासांच्या आत वापरून उरलेले फेकून द्यावे.साधारणपणे जुलाबात निघालेल्या पाण्याच्या प्रमाणात... छोट्या बाळास चमचा चमचा पाजावे. मोठया मुलांना पाव ते अर्ध्या कप पाणी कपाने किंवा ग्लासने देत राहावे. पाकीट उपलब्ध नसल्यास हे मिश्रण घरी ही तयार करता येते.
एक लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ टाकून मिश्रण बनवावे . साखर जास्त झाली तर डायरिया वाढू शकतो. मीठ जास्त झाल्यास बाळ ते पिऊ शकत नाही. तेंव्हा प्रमाण काटेकोर असावे.
ORS ची पावडर फक्त स्वच्छ पाण्यातच मिसळावी . कोरडी खाऊ नये.दूध , सूप , फळांचा रस यामध्ये मिसळू नये किंवा त्यात अजून साखर-ग्लूकोज मिसळू नये . तीन ते चार वेळा पातळ शी झाल्यास ओ आर एस चे पाणी पाजणे सुरू करावे. मात्र आपल्या बाळाला दिवसातून कमी लघवी होत असल्यास , खूप जास्त उलट्या होत असल्यास , खूप चिडचिड करीत असल्यास, सुस्त पडल्यास , डोळे व टाळू खूप आत गेल्यासारखे दिसत असल्यास, जीभ कोरडी पडली असल्यास, झटके आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ORS चे पाकीट नेहमी घरात हाताशी ठेवावे. अशी ही जीवन दायिनी जल संजीवनी सर्वांना केव्हाही उपयुक्त ठरू शकते.
24/06/2026
पावसाळ्यात घ्या, लहान मुलांची काळजी
पावसाळ्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतात. उन्हाळ्यात कोरडी गरम हवा जाऊन हवेत आर्द्रता वाढते. तापमानात सतत बदल होत राहतो. सलग पाऊस चालू राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. जागोजागी पाणी साचते. पाण्याची डबकी होतात. त्यामुळे चिलटे, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना यावेळी संसर्ग होण्याची भीती असते. नुकतीच रांगू लागलेली बाळे पटकन् काही वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो...
दूषित पाणी, अन्न याने फैलणारे आजार पावसाळ्यात अनेकदा नळालाही दूषित पाणी येते. ते व्यवस्थित उकळून तसेच गाळून मुलांना द्यावे. मुलांच्या वापराची भांडी उकळून निर्जंतुक करून ठेवावी. त्यामुळे लहान मुलांना पटकन होणारा संसर्गाचा धोका टळतो. जलशुद्धीकरणाची सोय नसलेल्या ठिकाणी मुलांना जुलाब, उलट्या, गॅस्ट्रो, कावीळ (कावीळ अ), टायफॉईड आणि क्वचित कॉलरा यांच्या साथीची लागण होऊ शकते. या आजारांकडे वेळेत लक्ष न दिल्यास बाळाला डिहायड्रेशन होऊ शकते. या आजारांचा अटकाव सोपा आहे. यासाठी अन्न व पाण्याची शुद्धता कोणत्याही परिस्थितीत ठेवायला हवी.
काय करायला हवे?
- लहान मुलांना गाळून आणि उकळून पाणी द्या.
- पावसाळ्यात ताजे गरम व शिजवलेले अन्न मुलांना द्या.
- बाळाचे अन्न तयार करताना त्याला भरवताना हात स्वच्छ असावेत.
- बाळाला वाटी-चमच्याने दूध पाजा. सर्व वाट्या-चमचे उकळून वापरा. बाटलीचा वापर शक्यतो टाळा. कारण बाटलीची काळजी घेण्यास खूप वेळ लागतो. अनेकदा घर आणि नोकरीच्या व्यापात ते जमत नाही.
- भेळ, उसाचा रस, उघडे सरबत, फ्रूट ज्यूस, खूप पिकलेली फळे, काकड्या यांचा आहार टाळा.
- मलमूत्र विसर्जन झाल्यावर साबणाने हात स्वच्छ करा
हवेतून पसरणारे आजार हवेतून एका रुग्णापासून दुसऱ्याला लागण होणारे आजार होतात. त्यात सर्दी, पडसे, खोकला, ताप, न्यूमोनिया यांचा उल्लेख करावा लागेल. स्वाइन फ्लू याच वर्गात मोडतो
- सर्दी, पडसे, खोकला असलेल्या रुग्णांनी गर्दीत जाऊ नये.
- लहान मुलांना अशा ठिकाणी घेऊन जाऊ नये. त्यांना लवकर संसर्ग होऊ शकतो.
- खोकताना तोंडावर रूमाल धरा.
- निरोगी लहान मुलांना रुग्णालयात किंवा दवाखान्यात घेऊन जाऊ नका.
- लहान मुलांना आजारी असताना शाळेत पाठवू नका. त्याने साथ पसरते.
- बाळाचे लसीकरण व्यवस्थित करा
कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंगी हे आजार होतात. पावसाळ्यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, फुटलेली मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुने कॅन यात पाऊस साठतो. त्याने, डेंगू व मलेरियाच्या डासांना (एडीस, ऍनोफॅलीस) आमंत्रण मिळते. त्यांची पैदास वाढते. हे दोन्ही आजार गंभीर होऊन जीवघेणे ठरू शकतात.
- जुने टायर, फुटलेली मडकी यात तसेच घराजवळ पाणी तुंबू देऊ नका.
- ड्रेनेज (उघडी गटारे) तुंबणार नाही याकडे लक्ष द्या.
- मच्छरदाण्यांचा वापर करा.
- घरात शोभेची झाडे लावू नका.
- दमट हवा असली तरी मुलांचे कपडे कोरडे स्वच्छ हवेत. अंथरुण आठवड्यात तीनदा तरी बदला.
- मुलांना धूळ, साचलेल्या धुळीने पटकन सर्दी-खोकला होऊ शकतो.
- सर्दी झाल्यास वा नाक चोंदल्यास मुलांच्या कपड्यास निलगिरी लावा. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडसर येत नाही.
- कचरा तसेच घंटागाड्यांजवळ मुलांना नेऊ नका. घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवून तो मुलांपासून दूर ठेवा. त्याचे वेळीच विघटन करा. पावसाळ्यात हे पदार्थ कुजतात व त्यांचा मुलांना त्रास होतो.
20/10/2025
दिवाळीत मुलांची घ्या ही काळजी:
दिवाळीचा उत्सव सर्वत्र सुरु आहे. प्रत्येकजण नातेवाईकांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहे. पण हे सगळं करत असताना पालकांनी याकडे आर्वजून लक्ष देणे गरजेचे आहे. ते म्हणजे पालकांनी दिवाळीत लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना फटाक्यापांसून वाचवणे याकडे पालकांनी लक्ष देणे अनिवार्य आहे.सजावटीसाठी फटाके आणि मेणबत्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने दरवर्षी दिवाळीच्या वेळी अनेक लोक अपघात आणि जखमींना बळी पडतात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सुरक्षा टिप्स देत आहोत. घ्या जाणून
1)लहान मुलांना एकटे सोडू नका:
दिवाळी म्हटलं की, लहान मुलांमध्ये उत्साह असतो. कशाच्यातरी मागे धावणारी ही मुलं डोळ्यासमोरून सहज हरवून जातात. दिवाळीच्या वेळी, आपल्या लहान मुलांवर देखरेख ठेवणे महत्वाचे आहे, विशेषत: जर त्यांना यादृच्छिक गोष्टी उचलण्याची आणि तोंडात टाकण्याची सवय असेल तर.
तुमचे मुले मेणबत्त्या, दिवे, फटाके, माचिस अशा कोणत्याही आगीच्या स्रोताच्या संपर्कात येत नाही याची खात्री करा. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ते आपल्या मुलाच्या आवाक्याबाहेर ठेवणे चांगले.
२)दिवे आणि मेणबत्त्या कसे पेटवायचे:
तुमच्या मुलाला घर सजवण्यात आनंद वाटू शकतो. ही एक चांगली गोष्ट आहे. तथापि, मुलांनी मेणबत्त्या किंवा दिवे लावणे यासारख्या काही क्रियाकलाप टाळावेत. तुमचे मूल त्यांना हाताळण्यास तयार आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पडद्याजवळ किंवा इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाजवळ दिवे किंवा मेणबत्त्या पेटवू नका.
३) धूरा पासून दूर ठेवा:
मुलांना जास्त वेळ बाहेर ठेवणे, धूर आणि फटाक्यांचा आवाजापासून दूर ठेवणे, तसेच धूर आणि आवाजामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तुम्ही त्यांना हलके कानातले आणि फेस मास्कसह घालू शकता. जास्त धुरामुळे मळमळ, डोकेदुखी तसेच दमा आणि काही प्रकरणांमध्ये फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका होऊ शकतो.
४)फटाके फोडताना नको त्या क्लृप्त्या टाळा:
दिवाळीत फटाके फोडताना चिमुकल्यांच्या उत्साहाला जणू भरती येत असते. यावेळी अनेक क्लृप्त्याही बालमंडळी शोधत असतात.मग लोखंडी किंवा प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या, बॉक्सेस आदी फटाक्यावर ठेवून फटाका उडवणे, हातात फटाका फोडणे असे प्रकार मुले करू शकतात.
सर्व फटाके संपल्यानंतर न फुटलेले फटाके शोधतही बहुतेक चिमुकले हिंडत असतात. न फुटलेला फटाकाच हातात फुटून इजा होण्याची शक्यता असते.त्यामुळे वडीलधाऱ्यांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
५) मुलांच्या आहाराची काळजी घ्या:
दिवाळीत गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ भरपूर प्रमाणात असतात, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने अपचन, पोटदुखी किंवा अन्नातून विषबाधा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मुलांना दिले जाणारे प्रमाण मर्यादित करणे महत्वाचे आहे.
६)विजेच्या दिव्यांपासून सावध राहा:
दिवाळीच्या सजावटीसाठी वापरले जाणारे रंगीबेरंगी दिवे मुलांना खूप आकर्षक वाटतात, परंतु त्यामुळे विजेचा धक्का किंवा शॉर्ट सर्किटचा धोका असतो. म्हणून, ते नेहमी उंचावर आणि मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावेत. तसेच, कोणत्याही ठिणग्या, शॉर्ट सर्किट किंवा आगीचा धोका टाळण्यासाठी विजेच्या तारा आणि प्लग पॉइंट्स तपासा.
७)मोठा आवाज टाळा:
फटाक्यांचा मोठा आवाज मुलांच्या नाजूक कानांना हानी पोहोचवू शकतो. त्यामुळे त्यांच्या हृदयावर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून, मुलांना गोंगाटाच्या ठिकाणांपासून दूर ठेवणे चांगले. जर घराभोवती सतत मोठ्या आवाजाचे फटाके वाजवले जात असतील, तर त्यांना कान झाकण्यासाठी इअरमफ किंवा इतर सुरक्षित पर्याय उपलब्ध करून द्या.
06/10/2025
लहान मुलांमध्ये कफ सिरपच्या वापरावरून निर्माण झालेला संभ्रम
नुकत्याच झालेल्या सर्दी खोकल्याच्या औषधाच्या वापरातून निर्माण झालेल्या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत सुमारे सतरा बालकांना जीव गमवावा लागलेला आहे. आणि या सर्व दुर्दैवी घटनांमध्ये 'कोल्ड्रिफ' या कफ सिरपचा वापर हा कारणीभूत असल्याचे लक्षात आले आहे.
त्यामुळे बऱ्याच डॉक्टरांच्या मनामध्ये आता लहान मुलांमध्ये सर्दी खोकल्याचे औषध द्यावे का नाही असा संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण या औषधांमधील घटक आणि सर्वसामान्य रित्या वापरल्या जाणाऱ्या सर्दी खोकल्याच्या औषधांमधील घटक हे सारखेच आहेत.
मग हे सर्दी खोकल्याच्या औषधांमधील घटक उदाहरणार्थ CPM + Phenylephrine Hydrochloride लहान मुलांमध्ये वापरावे का नाही ? अशी बऱ्याच डॉक्टरांची विचारणा होत आहे.
सदर दुर्घटनेचा आणि डॉक्टर नियमित वापरत असलेल्या सर्दी खोकल्या साठीच्या औषधी घटकांचा काही संबंध नाही.
ही दुर्घटना डायथिलीन ग्लायकॉल (DEG), इथिलीन ग्लायकॉल (EG) या भेसळ युक्त घटकांचा अतिरिक्त वापर *कोल्ड्रिफ* या सर्दी खोकल्याच्या औषधामध्ये झाल्याने निर्माण झालेली आहे.
अन्य चांगल्या कंपन्यांची सर्दी खोकल्याची औषधे जी आपल्याला डॉक्टरांनी लिहून दिलेली आहेत ती आपण सुरक्षित रित्या विनाशंका घेऊ शकता.
तामिळनाडूच्या उत्पादन युनिटमधील 'कोल्ड्रिफ' कफ सिरपच्या बॅचमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त डायथिलीन ग्लायकोल (DEG) आढळून आले आहे. आणि ते या दुर्घटनेला कारणीभूत आहे असे लक्षात आले आहे.
*➡️ डायथिलीन ग्लायकॉल (DEG), इथिलीन ग्लायकॉल (EG) म्हणजे काय ?*
डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल (EG) हे अँटीफ्रीझ, पेंट्स, ब्रेक फ्लुइड्स आणि प्लास्टिकमध्ये वापरले जाणारे औद्योगिक सॉल्व्हेंट्स आहेत. ते औषधांसाठी नसतात. कधीकधी ते ग्लिसरीन सारख्या औषधी घटकांमध्ये भेसळ म्हणून वापरले जाते कारण ते स्वस्त असते.
*डायथिलीन ग्लायकॉल (DEG) - इथिलीन ग्लायकॉल (EG) धोकादायक का आहेत?*
अतिरिक्त प्रमाणात या घटकांचा वापर केल्यावर, DEG आणि EG विषारी संयुगांमध्ये विभाजित होतात ज्यामुळे मूत्रपिंड ( Kidney ) , यकृत ( Liver ) आणि मज्जासंस्थेचे ( Nervous system) यांचे गंभीर नुकसान होते.
🚫अतिरिक्त प्रमाणात हे घटक असलेल्या औषधांचे सेवन केल्याने लहान मुलांमध्ये खालील लक्षणे निर्माण होतात - मळमळ, पोटदुखी आणि लघवी कमी होण्यापासून ही लक्षणे सुरू होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये - हे तीव्र मूत्रपिंड निकामी होणे ( Acute renal failure ) , झटके येणे ( Convulsions ) आणि पर्यायाने मृत्यू होण्याची शक्यता पण निर्माण होते.
*DEG poisoning -* The most prominent clinical manifestation of DEG poisoning is nephrotoxicity (AKI and anion gap metabolic acidosis), which follows gastrointestinal symptoms, including nausea /vomiting, abdominal pain, and diarrhea. DGA is a toxin that causes mitochondrial injury.
Subsequently, progressive neurological dysfunction follows and manifests as encephalopathy, multiple peripheral and cranial neuropathies, quadriparesis, and other neuropathic findings.
Unfortunately, despite supportive measures, including hemo- and peritoneal dialysis and inhibition of alcohol dehydrogenase, which metabolizes DEG to DGA.
*🚫The mortality rate is high for DEG poisoning*
विशेषतः लहान मुलांमध्ये या घटकांचे अतिरिक्त सेवन धोकादायक समजले जाते कारण त्यांच्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत अगदी कमी प्रमाणात देखील ते प्राणघातक ठरू शकते. मोठ्या माणसांमध्ये तो धोका तेवढा संभवत नाही.
यापूर्वी सुद्धा अशा दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत . उदाहरणार्थ गांबियामध्ये, दूषित कफ सिरप घेतल्याने २०२२ मध्ये किमान ७० मुलांचा मृत्यू झाला होता.
*या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे काय म्हणणे आहे ?*
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वारंवार DEG आणि EG ने दूषित कफ सिरपबद्दल यापूर्वी पण इशारा दिला आहे, कारण या प्रकारच्या भेसळीमुळे २०२२ पासून जगभरात ३०० हून अधिक बालमृत्यू झालेले आहेत.
WHO ने औषध नियमानासंदर्भात नवीन द्वि-स्तरीय चाचणी पद्धती विकसित केल्या आहेत, ज्यामध्ये प्रारंभिक तपासणीसाठी पातळ-स्तर क्रोमॅटोग्राफी (TLC) आणि त्यानंतर पुष्टीकरणासाठी गॅस क्रोमॅटोग्राफी यांचा वापर सुरक्षित औषध निर्मितीसाठी करणे अत्यावश्यक आहे.
निष्कर्ष: अन्य चांगल्या कंपन्यांची सर्दी खोकल्याची औषधे जी आपल्याला डॉक्टरांनी लिहून दिलेली आहेत ती आपण सुरक्षित रित्या विनाशंका घेऊ शकता.
(स्त्रोत : इंटरनेट)
22/03/2025
मुलांसाठी ए.सी. / कुलरची हवा योग्य आहे की नाही ?
आई – वडिलांसाठी नक्कीच हा प्रश्न पडतो की, बाळासाठी एसी अथवा कूलरची हवा सुरक्षित आहे की नाही अथवा योग्य आहे की नाही? तुम्ही तुमच्या मुलांसाठी एसी अथवा कुलरचा वापर करून घेऊ शकता. पण हा वापर करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच अनिवार्य आहे. या गोष्टी नक्की कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया.
1) तुमच्या घरात एसी असेल तर तुम्ही बाळासाठी त्याचे टेंम्परेचर असे सेट करा जेणेकरून खोलीमध्ये अधिक थंडीही नसेल आणि उन्हाळाही जाणवणार नाही. अधिक थंडी झाली तर बाळाला खोकला, सर्दीसारख्या समस्या उद्भवू शकतात
2)उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी लहान मुलांना कैरी पन्हे, कोकम सरबत द्यावे
3)मुलांना एसी अथवा कुलरची हवा डायरेक्ट अंगावर येईल अशा पद्धतीने झोपवू नका अथवा बसवू नका
4)कूलर चालवताना खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि खोलीचे तापमानही अगदी योग्य राहील. तसंच तुम्हाला घामामुळे चिकटपणा जाणवणार नाही
5)उन्हाळ्याच्या दिवसात कॉटन कपडे सर्वाधिक चांगले ठरतात. त्यामुळे लहान मुलांनाही कॉटनचे अथवा सुती कपडे घाला. तसंच मुलांना थोडे ढगळ कपडे घाला. एसी अथवा कुलरचे तापमान कसे आहे यानुसार तुम्ही तुमच्या बाळाला कपडे घाला
6)एसी वा कुलर चालू असताना बाळाच्या अंगावर लहानशी गोधडी नक्की ओढून ठेवा. लक्षात ठेवा ही गोधडी बाळ आपल्या तोंडावर तर झोपेत घेत नाही ना याकडे वेळोवेळी लक्ष ठेवा
7)कुलरची नियमित स्वच्छता करा. रोज त्याचे पाणी बदला. जेणेकरून बाळाला नेहमी ताजी हवा मिळेल. तसंच एसी नियमित वापरत असाल तर वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग करून घेणेही गरजेचे आहे
बाळासाठी अथवा तुमच्या लहान मुलांसाठी तुम्ही एसी वा कुलर वापरत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायला हव्या.
12/03/2025
"रंग खेळताना मुलांची घ्यावी ही काळजी "
मुलांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. अशा वेळी होळीला रंग खेळताना थोडासा निष्काळजीपणाही त्यांच्यासाठी प्रश्न निर्माण करू शकतो. रंग आणि आनंदाचा होळीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण या सणाची उत्सुकता अनेक दिवस आधीच मुलांच्या डोळ्यांत दिसू लागते.
रंग खेळताना मुलांची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
रंग खेळताना पालकांनी लक्षात ठेवाव्या या गोष्टी-
१)तेल:
होळी खेळण्यापूर्वी मुलाच्या अंगावर नारळ तेल चांगले लावा. असे केल्याने तुमच्या मुलांना कोणत्याही रंगाची एलर्जी होणार नाही आणि रंगांमुळे त्वचेचा रंग खराब होणार नाही.
२)पूर्ण कपडे:
मुलांना होळी खेळायला पाठवण्यापूर्वी त्यांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालून पाठवा. जर तुम्ही मुलाला हाफ पँट किंवा शॉर्ट्स घातली असेल तर त्यांच्या हात आणि पायांच्या उघड्या भागावर पेट्रोलियम जेली किंवा तेल लावा. असे केल्याने होळीचा रंग मुलांच्या त्वचेवर चिकटणार नाही.
३)पेट्रोलियम जेली:
नखांच्या आत पेट्रोलियम जेली लावा, जेणेकरून होळी खेळताना रंग मुलांच्या नखांच्या आत जाणार नाही.
४)केसांची काळजी:
केसांच्या मुळांमध्ये सिंथेटिक रंग लावल्यामुळे मुले अनेकदा डोकेदुखीची तक्रार करतात. अशा परिस्थितीत ही समस्या टाळण्यासाठी या होळीमध्ये रंग खेळण्यासाठी पाठवण्यापूर्वी त्याचे केस पूर्णपणे बांधून पाठवा. जेणेकरून रंग केसांच्या मुळांपर्यंत पोहोचणार नाही.
५)ऑर्गेनिक रंग:
सिंथेटिक रंगांमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात, ज्यामुळे मुलांच्या आरोग्याला हानी पोहोचते. अशा स्थितीत मुलांना रंगांशी खेळण्यासाठी फक्त ऑर्गेनिक रंग द्या.
६)ओले कपडे जास्त वेळ घालू नका:
अनेक वेळा मुले रंग आणि पाण्याने बराच वेळ होळी खेळत राहतात. संध्याकाळपर्यंत ओल्या कपड्यात होळी खेळल्याने त्यांना ताप, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या होऊ शकतात. अशा परिस्थितीत मुलांना जास्त वेळ ओल्या कपड्यात होळी खेळू देऊ नका.
७)पाण्याचे फुगे टाळा:
पाण्याच्या फुग्यांमुळे डोळे, नाक, कान किंवा शरीराला इजा होऊ शकते. अशा परिस्थितीत मुलांना एकमेकांवर फुगे फेकून होळी खेळण्यास मनाई करा.
31/10/2024
दिवाळीत मुलांची घ्या ही काळजी:
दिवाळीचा उत्सव सर्वत्र सुरु आहे. प्रत्येकजण नातेवाईकांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहे. पण हे सगळं करत असताना पालकांनी याकडे आर्वजून लक्ष देणे गरजेचे आहे. ते म्हणजे पालकांनी दिवाळीत लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना फटाक्यापांसून वाचवणे याकडे पालकांनी लक्ष देणे अनिर्वाय आहे.सजावटीसाठी फटाके आणि मेणबत्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने दरवर्षी दिवाळीच्या वेळी अनेक लोक अपघात आणि जखमींना बळी पडतात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सुरक्षा टिप्स देत आहोत. घ्या जाणून
1)लहान मुलांना एकटे सोडू नका:
दिवाळी म्हटलं की, लहान मुलांमध्ये उत्साह असतो. कशाच्यातरी मागे धावणारी ही मुलं डोळ्यासमोरून सहज हरवून जातात. दिवाळीच्या वेळी, आपल्या लहान मुलांवर देखरेख ठेवणे महत्वाचे आहे, विशेषत: जर त्यांना यादृच्छिक गोष्टी उचलण्याची आणि तोंडात टाकण्याची सवय असेल तर.
तुमचे मुले मेणबत्त्या, दिवे, फटाके, माचिस अशा कोणत्याही आगीच्या स्रोताच्या संपर्कात येत नाही याची खात्री करा. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी ते आपल्या मुलाच्या आवाक्याबाहेर ठेवणे चांगले.
२)दिवे आणि मेणबत्त्या कसे पेटवायचे:
तुमच्या मुलाला घर सजवण्यात आनंद वाटू शकतो. ही एक चांगली गोष्ट आहे. तथापि, मुलांनी मेणबत्त्या किंवा दिवे लावणे यासारख्या काही क्रियाकलाप टाळावेत. तुमचे मूल त्यांना हाताळण्यास तयार आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पडद्याजवळ किंवा इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाजवळ दिवे किंवा मेणबत्त्या पेटवू नका.
३)धूर आणि आवाजापून दूर ठेवा:
मुलांना जास्त वेळ बाहेर ठेवणे, धूर आणि फटाक्यांचा आवाजापासून दूर ठेवणे, तसेच धूर आणि आवाजामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तुम्ही त्यांना हलके कानातले आणि फेस मास्कसह घालू शकता. जास्त धुरामुळे मळमळ, डोकेदुखी तसेच दमा आणि काही प्रकरणांमध्ये फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका होऊ शकतो.
26/08/2024
"मुलांमध्ये चिकनगुनिया"
👉मुलांमध्ये चिकुनगुनियाची चिन्हे आणि लक्षणे :
मुलांमध्ये चिकनगुनिया हा ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पुरळ आणि थकवा यासारख्या सामान्य लक्षणांसह प्रकट होतो. सतत उच्च ताप, तीव्र सांधेदुखी, श्वास घेण्यात अडचण आणि न्यूरोलॉजिकल गुंतागुंत यासह विशिष्ट किंवा गंभीर लक्षणांबद्दल जागरूक असणे महत्वाचे आहे ज्यात लक्ष देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, चिकुनगुनियाची लक्षणे मुले आणि प्रौढांमध्ये भिन्न असू शकतात. लहान मुलांना सहसा सांधेदुखीचा अनुभव येतो परंतु त्वचेवर पुरळ आणि न्यूरोलॉजिकल अभिव्यक्तीची वारंवारता जास्त असू शकते. हे फरक समजून घेतल्याने प्रभावित मुलांसाठी वेळेवर वैद्यकीय मदत होऊ शकते.
👉मुलांमध्ये चिकुनगुनियाचे निदान :
मुलांमध्ये चिकुनगुनियाचे निदान करण्यासाठी निदान चाचण्या आणि प्रक्रियांचा समावेश होतो. IgM आणि IgG सारख्या चिकनगुनिया अँटीबॉडीज शोधण्यासाठी तुम्हाला ELISA किंवा PCR सारख्या विविध पद्धती वापरून वेगवेगळ्या रक्त चाचण्या पार कराव्या लागतील. तथापि, इतर व्हायरल इन्फेक्शन्सच्या लक्षणांमुळे मुलांमध्ये चिकनगुनियाचे निदान करणे आव्हानात्मक असू शकते. जर तुमच्या मुलामध्ये लक्षणे दिसत असतील आणि ते चिकनगुनियाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात राहत असेल किंवा प्रवास करत असेल तर आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घेणे योग्य आहे. वैद्यकीय तज्ञ लक्षणांचे मूल्यांकन करू शकतात, आवश्यक चाचण्या करू शकतात आणि अचूक निदान करू शकतात. लवकर ओळख आणि योग्य निदानामुळे चिकुनगुनियाने बाधित मुलांसाठी योग्य उपचार आणि काळजी घेणे शक्य होते.
👉मुलांमधील चिकुनगुनियासाठी उपचार पर्याय:
इतर प्रमुख आजारांप्रमाणेच, चिकनगुनियामध्ये विशिष्ट लस किंवा औषध नाही जी तुम्हाला टाळू शकते किंवा तुम्हाला चिकुनगुनियापासून त्वरित आराम देऊ शकते.तथापि, काही प्रतिबंधात्मक पावले उचलून आणि उपचार पर्यायांचे कसून पालन केल्याने, तुम्ही तुमच्या मुलाला चिकनगुनियापासून लवकर बरे होण्यास मदत करू शकता.
विश्रांती आणि हायड्रेशन:
मुलांना विश्रांती आवश्यक आहे. तुमच्या मुलाला पुरेशी विश्रांती घेण्यास प्रोत्साहित करा, ज्यामुळे त्यांच्या शरीराला संसर्गाशी लढा मिळू शकेल. याव्यतिरिक्त, ते हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर द्रव पिण्याची खात्री करा. पाणी, ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन्स आणि इलेक्ट्रोलाइट युक्त पेये कमतरता झालेले द्रव भरून काढण्यास आणि निर्जलीकरण टाळण्यास मदत करू शकतात.
सांधेदुखीचे व्यवस्थापन:
चिकुनगुनियामुळे अनेकदा सांधेदुखी होते, जी विशेषतः मुलांसाठी अस्वस्थ असते. प्रभावित सांध्यांवर कोल्ड कॉम्प्रेस किंवा बर्फाचे पॅक लावल्याने जळजळ कमी होण्यास आणि तात्पुरता आराम मिळण्यास मदत होते. हेल्थकेअर प्रोफेशनलच्या मार्गदर्शनाखाली हलके स्ट्रेचिंग व्यायाम देखील सांधे कडकपणा कमी करू शकतात आणि गतिशीलता सुधारू शकतात.
लक्षण निरीक्षण:
चिकुनगुनियामुळे अधूनमधून एन्सेफलायटीस किंवा मायोकार्डिटिस सारख्या गुंतागुंत होऊ शकतात. वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप आणि योग्य व्यवस्थापन गंभीर गुंतागुंत टाळण्यास आणि सुरळीत पुनर्प्राप्तीस प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते.
भावनिक आधार आणि सांत्वन:
चिकुनगुनियाचा मुलाच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांची भीती आणि चिंता दूर करण्यात मदत करण्यासाठी भावनिक आधार, सांत्वन आणि आश्वासन द्या. त्यांची आवडती पुस्तके वाचणे, गेम खेळणे किंवा एकत्र चित्रपट पाहणे यासारखे त्यांचे मन विचलित करणाऱ्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा.
चिकुनगुनिया असलेल्या मुलांसाठी घरगुती काळजी आणि उपाय :
चिकनगुनियावर कोणताही विशिष्ट उपचार नसला तरी, काही घरगुती काळजी उपाय लक्षणे दूर करण्यात आणि मुलांच्या पुनर्प्राप्तीस मदत करू शकतात. ताप आणि वेदना कमी करण्यासाठी, तुमचे मूल आरामदायी आणि थंड वातावरणात विश्रांती घेत आहे याची खात्री करा. प्रभावित सांध्यांना कोल्ड कॉम्प्रेस लागू केल्यास वेदना आणि जळजळ यापासून आराम मिळू शकतो. याव्यतिरिक्त, आपल्या मुलाला पिण्याचे पाणी, ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन्स किंवा इलेक्ट्रोलाइट युक्त द्रवपदार्थ चांगले हायड्रेटेड राहण्यास प्रोत्साहित करा.
चिकुनगुनियापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी येथे पाच आवश्यक धोरणे आहेत:
1)घरी डास नियंत्रण:
तुमच्या घरातील आणि आजूबाजूचे अस्वच्छ पाण्याचे स्रोत काढून टाका कारण ते डासांसाठी प्रजनन स्थळ म्हणून काम करतात. नियमितपणे रिकामे, स्वच्छ किंवा पाणी गोळा करणारे कंटेनर झाकून ठेवा, जसे की फुलांची भांडी, बादल्या आणि टाकून दिलेले टायर.
2)कीटकनाशके वापरा:
वयोमानानुसार वापरासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्वचेच्या उघड्यावर DEET, picaridin किंवा IR3535 असलेले मच्छर प्रतिबंधक लावा. मुलांसाठी अनुकूल फॉर्म्युलेशन निवडा आणि निर्देशानुसार पुन्हा अर्ज करा. लक्षात ठेवा दोन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना तिरस्करणीय लागू करणे टाळा आणि मार्गदर्शनासाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या.
3)संरक्षक कपडे:
हलक्या रंगाचे कपडे देखील डासांना रोखण्यास मदत करू शकतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा अतिरिक्त संरक्षणासाठी कीटकांपासून बचाव करणारे कपडे निवडा.
4)मच्छर-प्रूफ झोपेचे वातावरण:
डासांना बाहेर ठेवण्यासाठी खिडक्या आणि दरवाज्यांना योग्य स्क्रीन लावलेल्या खोल्यांमध्ये तुमचे मूल झोपत असल्याची खात्री करा. स्क्रीन उपलब्ध नसल्यास, झोपेच्या वेळी डास चावण्यापासून शारीरिक अडथळा निर्माण करण्यासाठी बेडवर मच्छरदाणी वापरा.
5)मुलांना डासांच्या चाव्यापासून बचाव करण्याबद्दल शिक्षित करा:
मुलांना डास चावणे टाळण्याचे महत्त्व शिकवा. डासांच्या उत्कर्षाच्या वेळी, सहसा पहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास त्यांना घरात राहण्यास प्रोत्साहित करा. रेपेलेंट्स वापरणे, संरक्षणात्मक कपडे घालणे आणि डासांची जास्त संख्या असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट करा, जसे की साचलेले पाणी.
शाळेमध्ये चिकनगुनियाचे व्यवस्थापन करणे
विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मॉस्किटो रिपेलेंट्स वापरण्यास आणि बाह्य क्रियाकलापांदरम्यान संरक्षणात्मक कपडे घालण्यास प्रोत्साहित करा. डासांची संख्या कमी करण्यासाठी योग्य स्वच्छता आणि स्वच्छता राखली पाहिजे.
चिकुनगुनिया असलेल्या मुलांमध्ये दीर्घकालीन प्रभाव आणि पुनर्प्राप्ती साधारणपणे, लहान मुले चिकुनगुनियापासून लवकर बरी होतात, तथापि, त्यांच्यापैकी काहींना विशिष्ट दीर्घ कालावधीसाठी याचा अनुभव घ्यावा लागतो.
यासोबतच मुलांना निरोगी आहार योजना, निरोगी जीवनशैली, पुरेशी आणि दर्जेदार झोप, हे मापदंड पाळायला शिकवले पाहिजेत जे लवकर बरे होण्यास मदत करतात.
👉वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
प्रश्न-१: लहान मुलांमध्ये चिकनगुनियाची सामान्य लक्षणे कोणती?
उत्तर: सामान्य लक्षणांमध्ये ताप, सांधेदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पुरळ आणि थकवा यांचा समावेश होतो.
प्रश्न-२: चिकुनगुनिया व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकतो का?
उत्तर: नाही, चिकुनगुनिया हा प्रामुख्याने संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे पसरतो.
प्रश्न-३: मुलांमध्ये चिकुनगुनियासाठी विशिष्ट उपचार आहे का?
उत्तर: चिकुनगुनियासाठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही, परंतु लक्षणे कमी करणारी औषधे आणि सहाय्यक काळजी लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात.
प्रश्न-4: चिकुनगुनियापासून बरे होण्यासाठी मुलाला किती वेळ लागतो?
उत्तर: बहुतेक मुले काही आठवड्यांपासून महिन्यांत पूर्णपणे बरी होतात, परंतु सांधेदुखी अनेक महिने टिकून राहू शकते.
प्रश्न-५: मुलांमध्ये चिकुनगुनिया रोखता येईल का?
उत्तर: होय, प्रतिबंधात्मक उपाय जसे की डास नियंत्रण, तिरस्करणीय वापरणे, संरक्षणात्मक कपडे घालणे आणि प्रजनन स्थळे काढून टाकणे मुलांमध्ये चिकुनगुनिया टाळण्यास मदत करू शकतात.
29/12/2023
"मुलांची झोप"
कोणत्या वयाच्या मुलांनी किती तास झोपावं याची माहिती पालकांना असायला हवी, दररोज पुरेशी शांत झोप मिळाल्यास मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.वाढत्या वयानुसार बाळाची पुरेशी झोप होणे आवश्यक आहे. पालकांनी बाळाच्या झोपेचे योग्य ते वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे.लहान मूल जन्माला येतं तेव्हा ते कित्येक तास झोपतं. या झोपेतच त्याची वाढ होत असते असं म्हणतात. जसं मूल मोठे होतं तसं ते झोपतं तेव्हाच काय ते घर शांत असतं. नाहीतर दिवसभर दंगा आणि मस्ती. हे सगळं ठिक आहे पण मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांची पुरेशी झोप होणे गरजेचे असते. मोठ्या माणसांसाठी झोप जशी आवश्यक असते, त्याचप्रमाणे लहानग्यांसाठी झोप ही टॉनिक असते. झोपेत त्यांचा मेंदू शार्प होतो, जास्त वेळ शांत झोपल्याने त्यांची शारीरिक, मानसिक वाढ चांगली होते असे म्हटले जाते. मूल व्यवस्थित झोपले तर त्याचा चिडचिडेपणा कमी होतो. झोप पूर्ण झाल्यास मूल एनर्जेटीक होते आणि अतिशय उत्साहाने खेळायला लागते. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्यामुळे दिवसभर खेळून मूल थकते. अशावेळी त्याने झोपणे आवश्यक असते, त्यामुळे त्याचा थकवा दूर होण्यास मदत होते. तसेच मूलांचे पोट व्यवस्थित भरलेले असेल तरीही मूल झोपण्यासाठी त्रास न देता लगेच झोपते. पण किती वयाच्या मुलाने किती झोपावे हे समजून घेणे आवश्यक आहे. पाहूयाच शास्त्रीयदृष्ट्या मुलांनी किती तास झोपायला हवे याविषयी...
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाळाच्या झोपेचे तास,
बाळाचे वय झोपेचे तास
० ते ३ महिने - १४ ते १७ तास
४ ते ११ महिने - १२ ते १५ तास
१ ते २ वर्षे - ११ ते १४ तास
३ ते ५ वर्षे - १० ते १३ तास
आता ही झोप नेमकी कधीची असा प्रश्न पालकांना पडतो. तर ही सगळी झोप फक्त रात्रीची नसून रात्रीची आणि दिवसाचे मिळून हे तास आहेत हे लक्षात घ्यायला हवे. यामध्ये मूलांच्या झोपेच्या सवयीनुसार किंवा आजुबाजूच्या वातावरणानुसार काही प्रमाणात कमी-जास्त होऊ शकते. पण शक्यतो या प्रमाणात झोप झाल्यास मूल चिडचिडे होत नाही किंवा त्याला आळस, डोकेदुखी अशा समस्या उद्भवत नाहीत. ते नव्या दमाने खेळण्यासाठी तयार होते.
० ते ३ महिने - ही झोप लहान लहान तुकड्यात होणारी असते. नव्यानेच जगात आल्याने आजुबाजूच्या गोष्टींशी, हवामानाशी जुळवून घेणारे नवजात बालक दर थोडा वेळानी उठते आणि दूध प्यायले की पुन्हा झोपते. या काळात बाळाच्या झोपेच्या वेळा, सवयी सतत बदलत असतात. मात्र अशावेळी पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही.
४ ते ११ महिने - नॅशनल स्लिप फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार या वयातील बाळांनी पूर्ण दिवसात १२ ते १५ तास झोपण आवश्यक आहे. यामध्ये साधारण बाळाची आंघोळीनंतरची २ तासाची झोप, दुपारची २ तासाची झोप आणि रात्रीची ९ ते १० तासाची झोप यांचा समावेश असतो. या वेळा प्रत्येकानुसार काही प्रमाणात बदलू शकतात. पण साधारणपणे या वयात बाळ आंघोळीने आणि दूध पिऊन तसेच हातपाय मारुन आणि इतर हालचालींमुळे थकते. पुरेशी झोप झाल्यास ते फ्रेश होते.
१ ते २ वर्षे - जसजसे मूल मोठे होत जाते त्याची झोप कमी होत जाते. एकदा ते चालायला लागले की त्याचे खेळणे वाढते. तसेच दंगा कऱण्याचे प्रमाणही वाढते. अशावेळी झोपेचा वेळ आधीपेक्षा निश्चितच कमी होतो. या वयातील मुले दमून झोपतात. या वयात त्यांचा मेंदू वेगाने काम करत असतो. झोपेमध्ये बाळाची उंची वाढते असेही म्हटले जाते. दिर्घकाळ व्यवस्थित झोप झाल्यास बाळाचा मेंदू उत्तम मोटर कौशल्ये संपादित करतो.
३ ते ५ वर्षे - या वयातील मुले शाळेत जातात, शाळेतील अॅक्टीव्हीटी, इतर मित्रमंडळींबरोबरचे खेळणे आणि घरातील दंगा यामध्ये मूल पूर्णपणे बुडून गेलेले असते. अशावेळी मुले दिवसा झोपण्यासाठी किरकिर करतात, रात्रीही जागवतात. परंतु ही मुले एकदा झोपली की गाढ झोपतात. अशावेळी ते सकाळी त्यांची झोप पूर्ण झाल्यावर उशीरा उठतात.
लहानपणापासून म्हणजेच साधारण वयाच्या ६ महिन्यानंतर बाळाचे झोपेचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. बाळाला साधारण कोणत्या वेळेला, कोणत्या गोष्टी केल्यावर झोप येते हे समजून घेत आईने आणि घरातील इतरांनी त्याचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. त्याचा बाळाच्या शांत आणि नियमित झोपेसाठी चांगला फायदा होतो. तसेच बाळाचे झोपण्याचे तास लक्षात ठेवा. बाळ किती वेळा भुकेनी उठते याचीही नोंद ठेवणे गरजेचे आहे. बाळ झोपत असलेली खोली शांत, हवेशीर आणि प्रसन्न असेल याची काळजी घ्या, जेणेकरुन बाळ वेळच्या वेळी झोपण्यास त्याची निश्चितच मदत होईल. बाळ हळूहळू जसे मोठे होते तशी दिवसाची झोप कमी होऊन रात्रीची झोप वाढते. तेव्हा रात्री ते लवकर झोपेल आणि सकाळी लवकर उठेल याची काळजी घ्या.
26/07/2023
"डोळ्यांचा फ्लू वेगाने पसरण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय"
देशभरात पावसामुळे परिस्थिती सतत बिघडत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पाणी साचण्याच्या समस्येने ग्रासले असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे बिघडलेल्या परिस्थितीमध्ये एक नवी समस्या समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये जास्त पाऊस झाला. यावर्षी हा विषाणू झपाट्याने पसरत आहे. हा संसर्ग, त्याची लक्षणे आणि उपाय याबद्दल जाणून घेवूया.
आय फ्लू म्हणजे काय?
आय फ्लू म्हणजेच कंजंक्टिवायटिस याला डोळे लाल होणे असेही म्हणतात. हा एक संसर्ग आहे, ज्यामुळे कंजंक्टिवायटिसला जळजळ होते. कंजंक्टिवायटिसला हा एक स्पष्ट थर असतो जो डोळ्याचा पांढरा भाग आणि पापण्यांच्या आतील अस्तरांना व्यापतो. पावसाळ्यात कमी तापमान आणि आर्द्रतेमुळे, लोकांना जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीक घटकांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि कंजंक्टिवायटिस सारखे संक्रमण होते. हा संसर्ग डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आहे ज्यामुळे डोळ्याचा पांढरा भाग गुलाबी किंवा लाल होतो.प्रदूषण पसरवणाऱ्याया कारणांमध्ये सांडपाणी आणि इतर जीवाणूंचा समावेश होतो. जेव्हा लोक या दूषित पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा डोळ्यांपर्यंत बॅक्टेरिया आणि विषाणू पोहोचण्याचा धोका असतो. यामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा संसर्ग होऊ शकतो.
डोळ्यांचा संसर्ग पसरण्याची कारणे:
याशिवाय स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुविधांची मर्यादित उपलब्धता, पावसामुळे हवेत अनेक पदार्थ पसरू शकतात ज्यामुळे ऍलर्जी आणि चिडचिड होऊ शकते आणि पुरामुळे जास्त आर्द्रता येऊ शकते. हे जीवाणू आणि विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते. उबदार आणि ओलसर परिस्थिती संसर्गजन्य घटकांना जगण्यासाठी आणि पसरण्यासाठी योग्य वातावरण तयार करते. यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो.
कंजंक्टिवायटिसचे लक्षणे:
डोळ्यांच्या फ्लूला कंजंक्टिवायटिस म्हणतात, त्याचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. तुम्हाला ज्याने कंजक्टिव्हायटीसचा त्रास होत आहे त्यानुसारही लक्षणे दिसून येतात. कंजंक्टिवायटिस कारणांमुळे एक किंवा दोन्ही डोळे लाल होणे, खाज सुटणे, किरकिरे होऊ शकतात हा, कंजंक्टिवायटिसची लक्षणे असू शकतात. पापण्यांना सूज येऊ शकते आणि कधीकधी प्रकाशाचाही त्रास होवू शकते. जर तुम्हाला अशी समस्या असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
घरगुती उपाय आहेत कोणते?
हा संसर्ग टाळण्यासाठी, आपले हात वारंवार धुवा, आपल्या हातांनी आपल्या डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नका आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा. वेळोवेळी डोळे धुत रहा. जर बाहेर जाणे अधिक महत्त्वाचे असेल तर डार्क चष्मा घालून जा, तसेच पीडित व्यक्तीशी संपर्क करणे टाळा. डोळ्याच्या फ्लूची लागण झालेल्या व्यक्तीचा पलंग, टॉवेल किंवा कपडे वापरू नका आणि यावेळी टीव्ही-मोबाइलपासून अंतर ठेवा. आय फ्लूमुळे डोळे दुखतात आणि हे टाळण्यासाठी ठराविक अंतराने डोळे थंड पाण्याने धुवा.
डोळ्यांचा फ्लू किती दिवसांत बरा होईल?
हा विषाणूजन्य डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आहे, म्हणून हा एक रोग आहे जो स्वतःच बरा होऊ शकतो. वॉश बेसिन, टॉवेल किंवा उशी घरातील प्रत्येकाला संक्रमित करू शकते. डोळ्याच्या फ्लूपासून बरे होण्यासाठी 3 ते 5 दिवस लागू शकतात. पण एकामागून एक डोळ्यात संसर्ग झाल्यास तो बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो.
डोळ्यांच्या फ्लूदरम्यान कोणती खबरदारी घ्यावी?
जर तुम्हाला डोळा संसर्ग झाला असेल, तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतर लिहून दिल्याप्रमाणे नियमित औषधे घ्या. साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. डोळ्याच्या फ्लूचा प्रसार रोखण्याचा हा सर्वात महत्वाचा आणि प्रभावी मार्ग आहे. विशेषतः टॉयलेट वापरल्यानंतर, डायपर बदलल्यानंतर किंवा नाक शिंकरल्यानंतर आपले हात धुवा. तसंच टॉवेल, रुमाल यांसारख्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका आणि डोळ्यांना संसर्ग झाल्यास चष्मा वापरा. संसर्ग झाल्यानंतर घरीच रहा, बाहेर गेल्यास संसर्गाचा धोका वाढेल. त्यामुळे ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना शाळेमधून सुट्टी घेण्यास सांगा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Main Road
445323
Opening Hours
| Monday | 9:45am - 7pm |
| Tuesday | 9:45am - 7pm |
| Wednesday | 9:45am - 7pm |
| Thursday | 9:45am - 7pm |
| Saturday | 9:45am - 7pm |
| Sunday | 9:45am - 7pm |