saiprabha_patil

saiprabha_patil

Share

absolute quality absolute price Atomy products

28/10/2025
Photos from saiprabha_patil's post 12/08/2025

आजचा दिवस आणि आजचे रक्षाबंधन अतिशय अविस्मरणीय तसेच आज मला सैनिक बांधवानी दिलेले गिफ्ट माझ्या साठी अतिशय अनमोल असे गिफ्ट आहे.
आज जम्मू ला सैनिकांना राखी बांधण्यासाठी आले. आम्हाला पूर्ण ग्रूप ला परवानगी मिळाली होती पण कोणत्या बॉर्डर वर जाणार याबाबत security च्या कारणास्तव सांगण्यात आले नाही. सकाळी सैनिकांची गाडी आम्हाला घेण्यासाठी आमच्या हॉटेल वर आली.
आम्ही बॉर्डर वर पोचल्यावर आम्हाला माहिती झाले की आम्हाला ज्या ठिकाणी operation sindur चे युद्ध झाले त्या बॉर्डर वर आम्हाला घेऊन गेले होते आणि ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष युद्ध केले त्या सैनिकांना आम्ही आज रक्षाबंधन च्या निमित्ताने राखी बांधली.
सैनिकांनी खूप प्रेमाने आमचे स्वागत केले. आमच्या पाहुणचाराची पूर्ण तयारी त्यांनी केलेली होती. आमच्या साठी नाश्ता, लिंबू सरबत त्यांनी स्वतः आम्हाला आणून दिले. आम्ही स्वतः हाताने घेतो असे त्यांना आम्ही सांगितले पण त्यांनी तुम्ही सगळे बसा आम्ही तुम्हाला देतो असे सांगीतले आणि आम्हाला बसायला सांगीतले. सगळ्यांना राखी बांधून झाल्यावर त्यांनी आम्हाला कॉफी मग गिफ्ट म्हणून दिले. त्या कॉफी मग वर operation sindur, त्यांच्या बटालियन चे सिम्बॉल आणि त्यांचे वाक्य लिहिलेले आहे ज्याचा अर्थ असा की "तुम्ही फक्त सांगा आम्ही करतो" तसेच युद्धात काय झाले कसे झाले याबाबत ची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. तसेच जेथे युद्ध झाले ते दाखविण्यासाठी घेऊन गेले. युद्धासाठी तयार केलेले बँकर मी प्रत्यक्ष आतमध्ये जाऊन बघितले. तेथे ते कसे राहतात तिथेच खाणेपिणे असते ते युद्धाच्या वेळेस कसे काय करतात त्याची माहिती सांगितली. पाकिस्तान चे point दाखवले. काही माहिती सिक्युरिटी purpose साठी social media वर लिहू शकत नाही. सगळ्या सैनिकांनी युद्ध कसे केले जाते याबाबत तयार केलेले बंकर दाखवून माहिती दिली.
सैनिकांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद खूपच समाधान देणारा होता. आजचा दिवस कायम स्मरणात राहणारा आहे.
आम्ही राखी बांधण्यासाठी येणार आहोत असे जेव्हा सैनिकांना रात्री माहिती झाले तेव्हा त्यांनी रात्री urgent आमच्या साठी कॉफी मग प्रिंट करून घेतले. एवढे प्रेम करणारे सैनिक आपल्या रक्षणासाठी सदैव कार्य करतात त्याच्या कार्याला कोटी कोटी वंदन

Photos from saiprabha_patil's post 28/09/2023

मेरी माटी मेरा देश 🇮🇳🇮🇳

Photos from saiprabha_patil's post 09/05/2023

जुनांदुरखी भिवंडी येथे महिला सक्षमिकरण आणि जागृती व महिलांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले

15/02/2023

Scheduled tribes आदिवासी समाजातील मुलींना वडिलांच्या मालमत्ते मध्ये हिस्सा नाही त्यामुळे भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे होऊनही या समाजातील स्रिया आपल्या मात्मात्तेतील अधिकारापासून वांच्छित आहेत या गोष्टीची दखल घेऊन त्यांच्या अधिकाराबाबत आणि हक्काबाबत कायद्या मध्ये दुरुस्ती करण्याबाबत केंद्र सरकारने लक्ष द्यावे या मागणी साठी भारताच्या मा. राष्ट्रपती यांना मी आज विनंती करणारे पत्र पाठवले.

Telephone