Apple multispeciality hospital ,nagapur midc
we have all best specialities of medical care
20/06/2019
*आंतरराष्ट्रीय योग दिवस*
जसे आपण सर्वांस माहित आहेच, *२१ जून* रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. जीवन सर्वदृष्टीने योग्य होण्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. पतंजलिंनी योग चा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध *योगश्चित्तवृत्ति निरोधः।* सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत:
*यम* - (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
*नियम* - (शौच, सन्तोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान) बाहेरचे अंग
*योगासन* - बाहेरचे अंग
*प्राणायाम* - बाहेरचे अंग
*प्रत्याहार* - बाहेरचे अंग
*धारणा* - आतले/मानसिक अंग
*ध्यान* - आतले/मानसिक अंग
*समाधी* - आतले/मानसिक अंग
योगशास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या आठ अंगांपैकी आसनाचा येथे मुख्यत्वाने विचार केला जातो आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य टिकविण्यासाठी योग, आसन महत्वपूर्ण आहे.
रोज सकाळी योगासने करावीत, योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवावा.
योगासने करण्याचा वेळ हळूहळू वाढवावा.
एकदम अवघड आसने करू नयेत.
आसन करताना त्यात स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.
नंतर ती स्थिरता वाढविण्याचा प्रयत्न करावा.
आसन हे अंग यम व नियम यानंतर सांगितले असल्याने, आसनांचा यथोचित लाभ मिळण्यासाठी यम व नियमाचा अवलंब करणे महत्वाचे आहे.
*जर राहायचे असेल निरोग, तर दररोज करावा योग
सध्याचा तांदूळ व त्याचे शरीरावर होणारे परिणाम
सध्या मला माझ्या रुग्णालयात एक बाब सतत निदर्शनास येत आहे, अन ती म्हणजे आवड, नावड, आलस्य, कंटाळा, घाई, गरिबी, आहाराविषयीचे अज्ञान इत्यादी कारणांनी समाजात सध्या भात खाण्याचे प्रमाण मुबलक वाढल्याचे सापडत आहे...'भाताशिवाय जेवण पूर्ण झाले असे वाटत नाही' असाही वाक्प्रचार सध्या ऐकायला मिळतो... पण आपण पानात घेत असलेला भात नक्की काय गुणांचा आहे, त्याचे शरीरावर कोणते चांगले वाईट परिणाम होतात या संदर्भात अनेकांना जाणीव व माहिती नसल्याने ती व्हावी म्हणून हा लेख आपल्या सेवेत प्रस्तुत करीत आहे. तो एकग्रपणे वाचून समजून घ्यावा ही नम्र विनंती.
पूर्वीच्या काळात तांदळाच्या जातीचे मुख्यत: तीन विभाग होते.
1. शाली : हेमंत ऋतू
2. षष्टीक : ग्रीष्म ऋतू
3. व्रीही : शरद ऋतू
1. 'शाली' : या तांदळाच्या मुख्यतः रक्त शाली, महाशाली, कलम व शकुनाहृत अश्या 4 जाती होत्या..
ही जात जास्त करून उत्तर हिंदुस्थानात होते. ओडीसा पश्चिम बंगाल (पूर्वीचा मगध) पासून ते पाकिस्थान पर्यंत होणाऱ्या या तांदळाच्या विविध जाती...
त्यात पण हिमालयाच्या पायथ्याशी (नेपाळ इत्यादी प्रांतात) रक्तशाली उत्तम होते. मगध प्रांतात महाशाली, सिंध प्रांतात 'शकुन' किंवा 'गरुडापर' नावाने व दक्षिणेत वक्र नावाने या जाती विकास पावल्या...
उत्तरेतील या भागात पाऊस उशिराने पोहोचतो त्यामुळे साधारण ऑगस्ट महिन्यात या तांदुळ प्रकारची पेरणी होऊन हा तांदूळ डिसेंम्बर एन्ड पर्यंत (हेमंत ऋतूत) काढणीला येतो...
कमी पावसात, उत्तम स्थानात व उत्तम काळात (बलवान ऋतूत) हा तांदूळ तयार होत असल्याने अमृतवतच समजावा. [यातील शकुनाहृत ही जात बौद्ध काळाच्या पूर्वी मगध प्रांतातून हंस/गरुड या पक्ष्यांकरवी उत्तर कुरु प्रांतात (सिंध) व दक्षिणेत अवंती प्रांतात (तमिळनाडू) वारंवार नेली गेली (पक्ष्यानी नेली म्हणून शकुनाहृत). हे तांदळाचे पीक तिकडे विस्तार पावले पण प्रांत बदलल्याने त्याच्या गुणांमध्ये रक्तशाली च्या मनाने थोडी न्यूनता आली. पण तरीही त्या जाती अजूनही त्या प्रांतात उत्तम आहेत].
या चारही जातींमध्ये 'रक्तशाली' म्हणजे तांबसाळ ही उच्च दर्जाची जात मानली जात असे.
2. 'षष्टीक' : म्हणजे जो तांदूळ 60 दिवसात तयार होतो तो. पूर्वी अक्षय तृतीयेला हा तांदूळ पेरला जायचा, व पावसाळा सुरू होऊन महिनाभरात तो हाती यायचा (ग्रीष्म ऋतूत). म्हणजे पेरणी झाल्यापासून 60 दिवसात हा तांदूळ तयार होऊन कापणीला यायचा. खूप कमी पाण्यात तयार होत आसल्याने या तांदळाला "वाफेवरचा तांदूळ" असेही म्हणत असत. हा तांदूळ गुणांनी लघु (पचायला अत्यंत हलका), अक्लेदी(शरीरात ओलावा न आणणारा),पौष्टिक, त्रिदोषघ्न, तर्पण करणारा या उत्तम गुणांचा होता. याच्या काही उपजाती पण होत्या...
हा तांदूळ प्रकार सध्या लुप्त प्राय झाला आहे.
नवीन शेतकऱ्यांना तर असा काही प्रकार होता हे ही माहीत नाही...
या तांदळाचा शोध घेतला जाऊन तो प्रचारात येणे ही काळाची गरज आहे....
3. याउलट 'व्रीही' ही जात आहे...
हा तांदळाचा प्रकार गौण मानला आहे.
या प्रकारचा तांदूळ पावसाच्या सुरुवातीला पेरला जाऊन पाऊस संपल्यावर हे पीक कणीस धरते व जमिनीतील उरला सुरला ओलावाही टिपून घेऊन मग हा तांदूळ साधारण ऑक्टोबर च्या शेवटास (शरद ऋतू) तयार होतो. पहा, म्हणजे अख्खा पावसाळा, जवळपास 4 ते 5 महिने (120 ते 150 दिवस) लागतात हा तांदूळ हाताशी यायला...
म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी पिऊन तयार होणारा हा तांदळाचा प्रकार अंगी तसेच गुण बाळगणार हे वेगळे सांगायला नको...
हा तांदूळ पचायला जड, शरीरात चिखलासारखी स्थिती निर्माण करणारा (क्लेदि), पित्त वर्धक, शरीरात पाण्याचा अंश वाढविणारा, (वर्ष्या ऋतूतील पाण्याने पोसला गेल्यामुळेे) अम्लविपाकी (असिडीक), या दोषांनी युक्त असतो...
तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी धान्य प्रकार हे नेहमी 1 वर्ष जुने असलेले खाण्यात असावे असा शास्रादेश आहे. कारण नवीन धान्यात उपरोक्त दोष मोठ्या प्रमाणात असतात...
साधारणतः वर्षभर ठेवणीतला तांदूळ हा चांगला मुरलेला असतो. साठवून ठेवल्यामुळे त्यातील प्रत्येक दाण्याची परस्परांत ऊब बसून ते धान्याचे दाणे एकप्रकारे आतल्या आत पचवले जातात. त्या धान्यातील दाण्यांमधील ऊब या वर्षभराच्या काळात त्या धान्यातील द्रवांश पूर्णतः उडवून लावते, व त्या धान्यातील ओलावा, जडपणा या कालसंस्काराने पूर्णतः टिपला जाऊन ती धान्ये कोरडी व पचायला हलकी बनतात.
वर वर्णिलेल्या एक व दोन या जाती ग्राह्य. कुणाला हे तांदूळ प्रकार मिळत असल्यास त्यांनी हे एक वर्ष जुने करून यथेच्छ खावेत.
पण दुर्दैवाने सध्या तिसऱ्या प्रकारच्या म्हणजे 'व्रीही' या प्रकारच्या तांदळाचे च उत्पादन व उपयोग जोरावर आहे. सध्या प्राप्त होणाऱ्या 'इंद्रायणी', 'आंबेमोहोर', 'कोलम', 'एकशेवीस तीनशे', 'सुगंधी चुनर', इत्यादी व्हरायटी या 'व्रीही' याच कॅटॅगरीत मोडतात. त्यातही हा तांदूळ कापणी, मळणी व पोलिशिंग होऊन तत्काळ विक्रीला येतो (पूर्वी पाट्यावर हाताने झोडून हा तांदूळ येत असे ज्याला 'हातसडीचा' तांदूळ म्हणत असत. आता ते काम मशीन करते). डिसेंम्बर महिन्यात दुकाना-दुकानातून मोठे तांदूळ महोत्सव भरतात व लोकं मोठ्या प्रमाणावर हा ताजा तयार तांदूळ विकत घेतात अन लागलीच खातातही...
अश्या या मोठयाप्रमाणावर पाणी पिऊन तयार झालेल्या व ज्यातील ओलावा व अम्लविपाक (ऍसिडिक अंश) अजून स्थिर आहे व जो अजून पचायला जड आहे अश्या तांदळाचा एक गुणधर्म असतो अन तो म्हणजे वारंवार असा तांदूळ शरीरात गेल्यावर तो शरीरातील (जल तत्वाला) ओलाव्याला धरून ठेवतो. परिणामी शरीरातील पाणी वाढल्याने शरीरातील रक्त मांस, मेद यांच्यातील ओलावा वाढून, त्यांच्यात लिबलिबित पणा, थुलथूलीतपणा (शैथिल्य) येतो. त्याचप्रमाणे या तांदळातील अम्लता या शरीरांतर्गत मांसपेशींना मिळाल्याने त्याच्यात उष्मा वाढून (त्यांत विदाह उत्पन्न होऊन) त्यांची ताकद कमी कमी होत जाते व त्या मांसपेशींची धारण क्षमता खालावते...
परिणामी,
1.संधींना धरून ठेवण्याची स्नायूंची ताकद कमी होते,
2. मूत्राशय शिथिल बनल्याने मूत्रवेग अनावर होतात,
3. मूत्राचे वेग वाढतात,
4. गर्भाशयाची शिथिलता वाढून गर्भपात होण्याचे प्रमाण वाढू शकते,
5. पाळीला अंगावरून जास्त रक्तस्राव होतो(ज्याला रक्त प्रदर म्हणतात),
6. शरीरात स्थूलता घर करू लागते,
7. कफाची घनता कमी होऊन कफ द्रवरूप व शिथिल बनू लागतो. परिणामी प्रमेहा सारखे व्याधी शरीरात घर करतात.
8. रक्तात द्रवता वाढल्याने पांडू, रक्तपित्त हे विकार जडतात,
9. त्वचेचे विकार जडतात...
10. या तांदळात अम्लता अधिक असल्याने ते खाणाऱ्यात सहसा अम्लपित्त वाढिला लागते....
11. "पृथ्वी तत्व (घनद्रव्य) जलतत्वात (पाण्यात) विरते" हा सृष्टीचा नियम येथेही पहायला मिळतो, पेशींमध्ये द्रवता वाढल्याने अस्थी धातू (हाडाचे)चे कण या ओलाव्यामुळे विरघळू लागतात, त्यामुळे अस्थीसौशिर्य (ऑस्टिओपोरोसिस), हाडे ठिसूळ होणे, त्यातील मज्जा धातू कमी होणे हे घडायला लागते.
12. पाणी हे नेहमी तेलकटपणा धुवून टाकते (तेलकटपणाला विरोध करते) या कारणाने शरीरात पाणी वाढल्याने शरीर धातूंमधील स्नेह कमी होऊ लागतो.
या सर्व कारणांमुळे शरीरात आधी छोट्या हाडांमधील क्षय प्रथम नजरेस पडतो... तसेच,
A. ज्या लोकांमध्ये व्यायामाचा अभाव आहे,
B. ज्यांत पाणी पिण्याचे प्रमाण अधिक,
C. जे लोकं आंबट पदार्थ अधिक सेवन करतात,
(किंवा अधिक प्रमाणात फळे खातात), व
D. जे लोक अति प्रमाणात भाताचे सेवन करतात, तोही विशेषतः नवा तांदूळ आणि त्यातही भात एकांतिक मात्रेत रात्री खाणाचे सातत्य असते...,(यातपण नुसत्या भातापेक्षा 'तांदळाची खिचडी' हा प्रकार जास्त वाईट)
अश्या लोकांमध्ये प्रमेह(डायबेटीस) व मानेच्या किंवा कमरेच्या मणक्याच्या विकाराचे प्रमाण अधिक सापडते.
उपरोक्त चतुर्विध कारणे ज्या लोकांमध्ये असतात त्यांना मानेचा स्पॉंडीलोसिस सापडतोच... किंवा कालांतराने होतोच हे नेहमी लक्ष्यात ठेवावे.
त्यासाठी थोडक्यात चिकित्सा म्हणजे हे चार हेतू टाळणे (संक्षेप्ततः क्रियायोगो निदानं परिवर्जनम् ।।)
त्यामुळे हे धोके लक्ष्यात घेऊन या तांदळाचे सेवन योग्य मात्रेत असलेलेच बरे.
"अष्मकावंतिकानां तैलाम्लम् सात्म्यमुच्यते।" तसेच, "सात्म्यम् दक्षिणतः पेया।" च. चि. 30
अर्थात दक्षिणेत भाताची पेज शरीराला मानवते त्याचप्रमाणे अवंती म्हणजे आजचा तमिळनाडू व केरळ चा भाग व अष्मणतक म्हणजे आजचा कर्नाटक व आंधरप्रदेश या भागातील लोकांनी आंबट खाल्ले तरी त्यांना ते मानवते किंवा त्यांच्यासाठी ते त्या प्रदेशात पौष्टिक असते असे श्री. चरकवाक्य असल्याने दक्षिण भारतात जन्मलेल्या व वाढलेल्या किंवा त्या प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या लोकांना वरील भाताचा नियम लागू नाही... त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पिकवला गेलेला तांदूळ पोषक च समजवा.
आता प्रश्न तयार होतो मग तांदूळ खावा की नाही?
तर खावा पण त्याचे विशिष्ट प्रमाण व काही नियम असावेत... ते पुढीलप्रमाणे...
1. तांदूळ हा जुना असावा. त्यासाठी तांदूळ नेहमी पावसाळ्याच्या सुरुवातीला विकत घ्यावा व कोठीत कडुनिंबाची पाने पेरून साठवून ठेवावा.
(नव्या तांदळासाठी काही वैद्य एक सोय सांगतात की, तांदूळ भाजून घेऊन मग त्याचा भात लावावा. पण मी त्याचा समर्थक नाही).
2. तांदळाचा भात बनवताना कुकरचा वापर शक्यतोवर टाळावा. शक्य असल्यास कलहीच्या पितळाच्या पातेल्यात तांदूळ शिजवावा.
3. सप्ताहात फार तर 2 वेळाच भात खावा.
4. ज्या ठिकाणी भात पिकतो अश्या ठिकाणी भाताचे सेवन त्यातल्या त्यात नित्य चालेल...
पण उपरोक्त त्रासांपैकी त्रास उद्भवल्यास अश्या लोकांनीही भात कमी करावा.
5. भात खातेवेळी त्यासोबत सहसा गाईच्या तुपाचे सेवन उत्तम असावे.
6. मटणाच्या सुपासोबत, मुगाच्या वरणासोबत किंवा दुधतुपासोबत (साखर न घालता) घेतलेला भात सहसा बाधत नाही.
7. शिळा भात शक्यतोवर टाळावा.
8. दही-भात, खिचडीभात, साखर-भात, साय-भात, आंबट सारासोबत घेतलेला भात, तुरीचेवरण-भात, लोणचं-भात, पंजाबी डिश सोबत भात व 'रात्रीचा भात' हे असे भाताचे combinations शरीराला अत्यंत घातक समजावेत.
सध्या सरकार कडून मुलांच्या पोषणासाठी म्हणून शाळेच्या वेळेत खिचडी किंवा वरण भात दिला जातो त्यात पण यासाठी निकृष्ट दर्जाच्या तांदळाची योजना केली जाते...
आपणाला वरील लिखानावरून हे लक्ष्यात आलेच असेल की लहणग्याना दिला जाणारा केवळ तांदळाचा आहार ही बाब किती घातक आहे ते....? भावी भारताचे हे भविष्य आपण अज्ञाना ने किती कमकुवत करीत आहोत हे कुणाला कळतच नाहीए, याचा आवर्जून मी येथे उल्लेख करू इच्छितो. यातून अपेक्षा एकच की, कुणा सज्ञाना प्रत ही पोस्ट पोहोचावी व लहान बालगोपाळांना दिला जाणारा हा दुर्दैवी खुराक थांबवला जावा...
आता काहींच्या मनात हा प्रश्न तयार होईल की, जर दक्षिण भारतातील लोकांना भात पूरक आहे तर मग मध्य देशातील लोकांसाठी उत्तम आहार कोणता?
तर याविषयी महान चरक महर्षी म्हणतात,
"मध्यदेशे भवेत सात्म्यम् यवगोधुमगोरस:।" च. चि. 30
अर्थात भारताच्या मध्य भागात 'सातू (एक धान्य प्रकार जो छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेशात अधिक होतो. यालाच इंग्लिश मध्ये 'बार्ली' म्हणतात) गहू व गायीचे दूध' हे उत्तम होत.
उत्तम शरीराची कामना करणाऱ्या पुरुषाने नियमित व्यायाम करत देशी गाईचे दूध व गव्हाची चपाती हा आहार तूप घालून नित्य घेतल्यास तो त्याला शतायुषी ठेवतो.
त्यामुळे उपरोक्त विधान व्यवस्थित समजून घेऊन व नियम पाळून सेवन केलेला भात शरीराला पोषकच समजावा.
वै. सुदर्शन बच्छाव.
(9890334829).
09/01/2018
Image: Chinese Restaurant Syndrome: The adverse effects of MSG – Grow Fit Found on Google from getgrowfit.com
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Nagapur Midc , Gajanan Coloney, Wadagaon Gupta Road , Ahemednagar
Ahmednagar
414111