Dr. Shilpa Deshmukh's Herbal Solutions.
We've purely natural & traditional beauty product: Sukheshini Shikakai Hair Wash( ready to use)
30/07/2026
संतुलित आहारच मधुमेह नियंत्रणाची गुरुकिल्ली; मधुमेह रुग्णांसाठी 'मिलेट्स' ठरतात फायदेशीर, -आहारतज्ज्ञ दीपाली भैसे, वाघ
आजकाल जीवनशैलीतील बदल, खाण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अनुवांशिकेतेमुळं अनेक लोकांना मधुमेह होत आहे. मात्र, मिलेट्समुळं मधुमेह नियंत्रणात आणणं सोपं आहे.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचारांइतकाच आहार महत्त्वाचा आहे. बदलत्या जीवनशैलीमुळं वाढणाऱ्या मधुमेहाच्या पार्श्वभूमीवर पारंपारिक भरडधान्ये किंवा तृणधान्ये (Millets) पुन्हा एकदा आहारात महत्त्वाचे ठरत आहेत. यासंदर्भात आहारतज्ज्ञ दीपाली भैसे-वाघ यांनी मिलेट्सचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं, कसं सोपं आहे, यासंदर्भात 'ईटीव्ही भारत' शी बोलताना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
मिलेट्सची अशी आहे उपयुक्तता : भरडधान्ये अर्थात गहू ज्वारी, बाजरी, कोदो, कुटकी हे पूर्णतः ग्लूटेन फ्री असल्यामुळं ते पचनासाठी हलके असतात. यामध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण खूप जास्त असल्यानं अन्न हळूहळू पचतं. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं रक्तातील साखर झपाट्यानं वाढत नाही. वजन नियंत्रणासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. आतड्यांचे आरोग्यदेखील यांच्यामुळं सुधारतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. दीर्घकाळ पोट भरल्याची भावना मिलेट्स देतात असं देखील दिपाली भैसे- वाघ यांनी सांगितलं.
रोजच्या आहारात ज्वारीची भाकर सुरक्षित : ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आयर्न आणि तंतुमय पदार्थ मुबलक असतात. रोजच्या आहारात ज्वारीची भाकर समाविष्ट करणं, हे अतिशय आवश्यक आहे. ज्वारीमुळं पोट भरल्याची भावना जास्त वेळ टिकते. त्यामुळं वारंवार भूक लागत नाही. सकाळच्या नाश्त्यात ज्वारीचे पदार्थ घेतल्यास दिवसभर ऊर्जा टिकते. ज्वारी पचायला हलकी असल्यामुळं दैनंदिन आहारामध्ये वापरता येते.
बाजरी खाण्याचं महत्त्व : बाजरी ही उष्ण प्रकृती असणारं धान्य आहे. बाजरी हिवाळ्यात खाणं अतिशय योग्य ठरतं. हिवाळ्यात शरीराला बाजरीमुळं उष्णता मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकरिता बाजरी अतिशय उपयुक्त धान्य आहे. शरीराची ऊर्जा टिकवून ठेवणारी बाजरीची भाकर थंडीच्या दिवसात अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात बाजरीचं सेवन मर्यादित ठेवावं. शरीरात उष्णता वाढू नये याची काळजी घेणं, अतिशय गरजेचं असंदेखील आहारतज्ञ भैसे-वाघ यांनी स्पष्ट केलंय.
मेळघाटातील कोदु कुटकीचं महत्त्व : कोलंबो आणि कुटकी हे पारंपारिक आणि नैसर्गिक भरडधान्ये आहेत. यामध्ये उच्च प्रतीचे तंतुमय पदार्थ, प्रथिने चांगले आहेत. लोह, कॅल्शियम यात मोठ्या प्रमाणात असतात. ग्लायसेमिक इंडेक्स अत्यंत कमी असल्यामुळं मधुमेहासाठी कोदो, कुटकी हे धान्य अतिशय फायदेशीर आहे. याच्या सेवनामुळं रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत होते. पचन सुधारतं. तसेच बुद्ध कोष्टता कमी होते. अमरावती जिल्ह्यात मेळघाटात आदिवासी बांधवांचं कोदो आणि कुटकी हे धान्य आरोग्यदायी आहाराचा भाग आहे, असंदेखील भैसे-वाघ म्हणाल्या आहेत.
तांदूळ पूर्णपणे बंद नको : जेवणात भात हा हवाच असतो. मधुमेह झाला आहे, म्हणून भात पूर्णपणे बंद करू नये. भात खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. डाळ आणि भाज्यांसोबत भात खाल्ला तर कुठलीही हरकत नाही. जंकफूड प्रोसेस फुड टाळायला हवेत. पाणी मात्र भरपूर प्यावं, असा सल्ला आहारतज्ञ दिपाली यांनी दिला. भात पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. भात खाण्याची योग्य पद्धत म्हणजे डाळीसोबत खावा म्हणजे ते प्रथिनांचं योग्य संमिश्रण होते. भातासोबत भरपूर भाज्या खाव्यात. पांढऱ्या तांदुळाऐवजी ब्राऊन राईस वापरणं चांगलं, असं दिपाली भैसे वाघ यांनी सांगितलं.
मधुमेही मुलांसाठी मिलेट्स : लहान मुलांना भाकरी खाणं आवडत नाही. असं असलं तरी त्यांना पोषक घटकांची आवश्यकता आहे. प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही मधुमेही बालकांना मिळायला हवेत. लहान मुलांना ज्वारी आणि बाजरीची भाकर देण्याऐवजी पराठा, चपाती आणि उपमा करून द्यावा. गोडसाठी नैसर्गिक पर्याय वापरावेत. वाढत्या वयासाठी संतुलित आहार आवश्यक आहे, असं दीपाली यांनी सांगितलं.
दीर्घकालीन आरोग्यासाठी मिलेट्स महत्त्वाचे : मधुमेह नियंत्रणासाठी केवळ औषधोपचार महत्त्वाचे नाही, तर योग्य आहार विशेषतः भरडधान्यांचा समावेश आहारात असणं हा दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. पारंपारिक ज्वारी, बाजरी आणि कोदो, कुटकी यासारखी धान्य पुन्हा आहारात आणल्यास केवळ साखर नियंत्रणात राहत नाही, तर एकूण आरोग्य सुधारतं. त्यामुळं आधुनिक जीवनशैलीत पारंपारिक पद्धतीकडं वळणं हीच खरी गरज आहे, असेही त्यांनी सांगितलं.
29/07/2026
01/05/2026
*गावा गावासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा।।*
*उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकड्या म्हणे।।*
ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकासाचा अलौकिक संदेश देणारे थोर राष्ट्रसंत *वंदनीय तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन!*🌸🌺 जय गुरु 👏🙏
02/04/2026
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Amravati
Alerts
Be the first to know and let us send you an email when Dr. Shilpa Deshmukh's Herbal Solutions. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.