Bharat Trails

Bharat Trails

Share

A travel blog of Raginee, Yogesh & Vasundhara. Exploring far off places to backyards. Stay connected for stories & photos. We all do take journey in our lives.

Explicit permission is required before you use any content from our page, site or any social media platforms. Some time physical but most of the time inner. Some journeys are so good that we wish our people should know about this path , explore wonders which it holds. Some are beautiful , adventurous , peaceful , breathtaking …. We all love to share our experience in such journeys . So do we! We w

Photos from Bharat Trails's post 24/11/2025

Beach beauty : my evening walks on the beach bless me with the excellent fresh air, soft breeze and sunset that is better than the last one. But there's also one more thing and that is the gifts of the ocean lying on the seashore. Maybe a random driftwood, shell, dried leaf etc.. Their resting on the soft sand is like a statement of their beautiful existence that shaped them in sync with the nature throughout their life. And even their departure symbolises beauty. Hope our's will be like that when we say goodbye to this beautiful and ever evolving world.
Words & images : Yogesh K
All rights reserved.

Photos from Bharat Trails's post 03/11/2025

Kokan & Gomantak ( Goa ) : a symphony created by monsoon and the Western Ghats. Monsoon is favourite season without a doubt because of this. Whether it's an aerial view or a close shot the shades of green are just fabulous.

All rights are reserved.

Photos from Bharat Trails's post 29/10/2025

Moods of the Sindhusagar ( Arabian Ocean ) in Kokan. My connection with the ocean is like the water in my body. Inseperable. Emotional just like hide tides and low tides. Sometime calm on the surface yet currents flowing underneath. The same thing that replicated outside enchants me. Years of friendship with the ocean reveals something so sacred that I want to share with you. Afterall we all are an ocean within ourselves.

Images & words : Yogesh Kardile
*All rights reserved.

12/09/2025

Beautiful and grand view of Terekhol river and majestic Sahyadri range of Amboli.
All rights reserved.

Photos from Bharat Trails's post 03/09/2025

Shades of green into the mountain. The sense of peace floating all over with the fog and intermittent shower. Paradise is not a concept but reality here on earth.
words & images : Yogesh Kardile
All rights reserved.

Photos from Bharat Trails's post 15/08/2025

कोकणचे पावसाळी सौंदर्य शब्दातीतच. कितीही भटका प्रत्येकवेळी मन भरून येते. प्रत्येक भागाचे स्वतःचे असे एक सौंदर्य असते. कोकण मला त्याच्या हिरवागार निसर्ग, समुद्र आणि संस्कृतीसाठी नितांत आवडतो. २००५ सालापासून चाललेल्या कोकण भटकंतीत शेवटी गोमंतकात आल्यापासून या निसर्गाचा रोजच आस्वाद घेतोय. हि काही छायाचित्रे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवासाची.
शब्द आणि छायाचित्र : योगेश कर्डीले
सर्व हक्क राखीव.

Photos from Bharat Trails's post 07/08/2025

The gigantic Western Ghats peaks covered by the evergreen forest then the coastal mangroves and the sloppy land where river flows like amazon delights the eye of the any nature lover. Western Ghats a truly paradise to explore. Imagine the beauty 400 years back !

सह्याद्रीची घनगंभीर सदाहरित शिखरे , संततधार पाऊस , दूरवर गाजणारे धबधबे आणि खाली खोल दरी. नागमोडी वाहणारी नदी आणि तिला झाकून टाकणारे भीतीदायक वन. तर श्रावणाच्या लपाछपीचा चमकणारे कांदळबन ( मॅन्ग्रूव्ह ). सह्याद्री आणि कोकण कुठल्याही निसर्गप्रेमीच्या मनावर कायमचे गारुड करून टाकणार नाही ते नवलच ! मी तर तीन दशके लोटली तरीही अजूनही त्यातून बाहेर आलो नाही. कल्पना करा शिवकाळातील वनराई किती गर्द , नयनरम्य आणि त्याचसोबत भयावह देखील असेल ना ?

Images: Yogesh Kardile
All rights reserved.

02/08/2025

The beauty of the Western Ghats. Clouds floating over the Kalad gad and a tribal village below the fort vicinity.

All rights reserved.

24/04/2025

काश्मीरचे सत्य : काश्मिरीयत आणि जिहाद

स्वतःच्या अनुभवांवरून आणि आंतरजालावरील माहितीवरून लिहिलेला लेख. राष्ट्रप्रेमी मुस्लिमांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही. आणि चाटू हिंदूंनी मला अनफ्रेंड केले तर अतिउत्तम.
बरीच वर्षे लिहिण्याची उर्मी होत होती परंतु ती नेहमीच टाळली. आत्ता वेळ आलीय म्हणून हा लेखनप्रपंच.

काश्मीर सुंदर आहे का ? हो. काश्मिरी लोक चांगले आहेत का ? हो. त्यांचे आदरातिथ्य आणि कलाकुसर छान आहे का ? एकदम छान. मग तेथे अडचण नेमकी काय ?
मागच्या पिढ्यांनी केलेली पापे आणि त्यांचे धार्मिक व राजकीय नेतृत्व. जिहादी वृत्तीची माणसे, अशिक्षित समाज, भारतीय हिंदू , बुद्धिस्ट , आदिमानव संस्कृती, संग्रहालये, स्त्रिया, पंडितांविषयीची घृणा हे सर्व देखील तेथे आहे. आणि पर्यटनातील मोठी फसवणूक. हे उघड्या डोळ्यांनी आम्ही तेथे पहिले, अनुभवले. फक्त निसर्ग आणि समाज समजून घ्यावयाचा होता म्हणून प्रत्येक वेळी गप्प बसलो.

सह्याद्रीत काही ठिकाणी तुम्हाला लांबच्या लांब निलगिरीची झाडी लावलेली दिसतील. त्याला सरकार जरी वनीकरण म्हणत असेल तरी त्याचा सरळ सरळ अर्थ मोनोकल्चर होतो. ज्यामुळे एकाच जातीची झाडी वाढून दुसऱ्या जातींचा समूळ नायनाट करतात किंवा आधी कोणीतरी तो केलेला असतो. वन हे वैविध्यपूर्ण हवे तरच ते परिपूर्ण मानले जाते. मग तुम्हीच सांगा कोठल्याही राज्यात एकाच धर्माची लोक ( मोनोकल्चर ) झाल्यावर त्या राज्याचे काय होणार ? सहा ते सात वेळा ज्या सर्वात समृद्ध आणि सुंदर राज्यावर अफगाणी, इराणी, पाकिस्तानी अशा रानटी वृत्तीच्या लोकांनी हत्याकांडे केली तेथील हिंदू, बुद्धिस्ट माणसे, पूजास्थळे, घरे संपविली त्यांचा शाप हा पुढच्या पिढीला लागणार का नाही ? बल्टी, डोग्रा, काश्मिरी, पठाण, गुज्जर, बकरवाल, दर्द शीना, पंडित, बुद्ध असे अनेक लोकसमुदायांचा संच या राज्यामध्ये आणि सभोवती आहे. त्यामुळे फक्त मुसलमान म्हणजे काश्मीर कधीच नव्हता. प्रचंड कत्तलींचा परिपाक म्हणजे येथील विविधता संपणे व आक्रमकांची बीजवृद्धी हा होय. बहुरत्न वसुन्धरा हे वचन येथे मात्र लागू होत नाही. तिथे आपले समाजधुरंधर सोयीने ते विसरतात.

काश्मीर एक अखंडित परंपरा : काश्मीर हे फक्त हनिमून साठी नाहीये मित्रांनो तिथे आपली ऐतिहासिक, धार्मिक आणि अध्यात्मिक नाळ जोडली आहे. भारतीय विचारांची गंगोत्री तेथून स्फुरलेली आहे. बुद्धांचा विचार येथून सगळीकडे पसरला. आम्ही शिव आणि शक्ती पूजक आहोत. त्यामुळे संपूर्ण विश्वाच्या या आद्य आराध्य स्थळांचे पुरावे जिकडे जाऊ तिकडे शोधत असतो. काश्मीर तर अद्वैत शैव व शाक्त तंत्र मार्गाचे उगमस्थान. हरमुख पर्वत हा तिबेटमधील कैलासाइतकाच महत्वाचं पर्वत, सुगंधेश, नारानाग, शंकराचार्य यासारखी सुंदर मंदिरे, मार्तंडाचे सूर्य मंदिर, अवंतिकेश्वर, खीर भवानी, तर लल्लेश्वरी ( शैव तत्वज्ञाची महत्वाची संत कवियत्री ) , नंद ऋषी ( सुफी आणि शैव तत्वज्ञान यांचा मिलाफ ) , नीलमत पुराण आणि राजतरंगिणी ( भारतीय इतिहासातील महत्वाचा ग्रंथ ) या भूमीने आपल्याला दिला. स्नातकोत्तर अभ्यासासाठी शारदा पीठ ( आता पाकिस्तानच्या ताब्यात ) येथे वाराणसीहून लोक अभ्यासासाठी जायचे. या जागेला साक्षात माँ शारदेचा निवास मानतात हे येथीलच. तर हरवन येथील बुद्ध मठ जेथे मोठी बुद्ध परिषद झाली होती. बुरझहमा येथे आदिमानवांचे अवशेष ( वस्त्या ) होत्या जे मोहेंजोदाडोला अनेक गोष्टी येथील नद्यांमार्फत देवाणघेवाण करावयाचे. यातील बऱ्याच गोष्टी आम्ही डोळ्यांनी पहिल्या. दल लेक ( तलावाच्या ) काठी येथील राज्य संग्रहालयात गेल्यावर येथील हिंदू आणि इतर धर्मियांचे कलाकृती, पुतळे पाहिल्यावर डोळ्यात पाणी येते. ( दुर्दैवाने मोबाईलने देखील फोटो काढण्यास परवानगी देत नाही. ) संपूर्ण भारतात फक्त याच संग्रहालयात हे बंधन का आहे हे समजले नाही.

शंकराचार्य, भगवान बुद्ध, ऋषी कश्यप, हब्बा खातून, लल्लेश्वरी यांचा एक तरी पुतळा या राज्यात बसवून दाखवा ? लाज वाटली पाहिजे सर्व सरकारांना एकाच्याही मध्ये आजही ती हिंमत नाही. ज्यांच्या पुण्याईने आपल्याकडे मोठी विचार आणि ग्रंथ परंपरा निर्माण झाली त्यांचे काहीही अस्तित्व का या राज्यात असू शकत नाही ? किती शेतकऱ्यांची पोरे तिकडे नेऊन मृत्यूच्या तोंडी द्याल ? शहिद हा शब्द वापरून आपण मोकळे होतो ? मूर्खांनो शहिदचा अर्थ जिहादसाठी कुर्बान झालेला असतो हे देखील आपल्याला माहित नाही. जमल्यास हुतात्मा म्हणा.

परंतु पहलगाम, बैसरन, दूधपथरी, गुलमर्ग, दल लेक, सोनमर्ग या ठिकाणी अक्षरशः आपली लूट केली जाते. त्याच लायकीचे आपण षंढ आहोत. फेसबुकवर हिंदू म्हणून घेणारे किती लोक प्रत्यक्ष जाणीवपूर्वक वर दिलेल्या ठिकाणी जात असतील ? तुम्ही जात असाल तर उत्तमच. परंतु हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच माणसे ऐतिहासिक स्थळे आणि संग्रहालयांना भेट देतात. गाढवासारखे त्या लोकांच्या खेचरांवर जाताना आपण स्वतःहून पर्यटन करीत नसून त्यांनी दाखविलेल्या बोटाकडे पाहून दूधखुळ्या बालकासारखे वागतो. ते बर्फाचे गोळे एकमेकांवर फेकणे, खोटे केसर, शिलाजीतच्या नावाखाली दुसरेच काही घेणे, खोटी पश्मिना शाल आपल्या आई / बायकोला घेऊन आनंदी होणे , त्या काश्मिरी बायकांचे कपडे घालून मुर्खासारखे फोटो काढणाऱ्या बायका एक गोष्ट विसरतात की आपली संस्कृती संपवून ते तुम्हाला त्यांचे कपडे घालवायला लावतात. गाढवांनो पंडितांचे कपडे, पंडित बायकांचे वस्त्रालंकार तेथे असतात का फोटो काढण्यासाठी ? मुघल बाग कोणी बांधली ? हब्बा खातूनच्या हव्यासापायी तिच्या नवऱ्याला कोणी संपविले ? दारा शिकोह आणि काश्मीरचा संबंध माहीत आहे का ? माँ कालीचे मंदिर तोडून आता शाही हमदान दर्गा का बांधला ? का नाही आपल्या मातेस आपण तिथे नमन करू शकत ? त्या माणसाने नेमके काय केले ? काश्मीरमधील रक्ताचा शेकडो वर्षांचा प्रवाह जेव्हा तुम्हाला येथील मंदिरे, घरे, गल्ल्या आणि नद्यांमध्ये दिसेल तेव्हाच तुम्ही खरे हिंदू. चार पैसे कमवून विमानाने जाऊन पॅकेज घेऊन आपण फक्त त्यांच्या धंद्याला मदत करतो. भारताला आणि भारतीयांच्या सुखदुःखांना समजावून घेत नाही.

दर आठवड्याला जर एखादा समाज मिटिंगसाठी विशिष्ट वारी एकत्र येत असेल आणि त्या समाजात अडाणी लोक जास्त असतील तर ते द्वेषाने भरलेली भाषणे ऐकून तुम्हाला नक्कीच मारू शकतील. भलेही तुम्ही कितीही हुशार असा. मुर्खांच्या हातातील एक दगड तुम्हाला संपवून टाकेल. आणि हे वारंवार होत असताना यांच्या पिल्लांना आपण आपल्या पैशाने पोसतो. याचा अर्थ आपण दुसऱ्याचा द्वेष करायचा नसून परिस्थितीचे आकलन त्यांच्या बोलण्याला भुलून जाऊन न करता सत्य समजावून घेऊन काय करावयाचे हे ठरवायचे. उगाचच गळे काढून काही होणार नाही.

एक प्रश्न स्वतःला विचार जर हे लोक खरोखरच इतके चांगले आहेत तर मग का श्रीनगरच्या डाऊन टाऊन मध्ये आपण एकटे फिरू नाही शकत ? सुदैवाने मी एकटा फिरून जिवंत मागे आलो. त्यांच्या जामिया मस्जिद मध्ये, खानका-ए -मौला देखील एकटा गेलो. चांगली माणसे भेटली. परंतु अनेकांसोबत बोलताना भारतापासूनचा अलग असल्याचा भाव, हिंदू धर्मियांविषयीचा विषयीचा विखारी द्वेष प्रतीत होत होता. मला तुम्ही कुठल्या राजकीय विचार धारेचे आहेत याचे घेणे नाही ? परंतु प्रत्येक भारतीयाला भारताच्या प्रत्येक गल्ली बोळात मुक्त फिरता यायला पाहिजे. का म्हणून विशिष्ट समाजाच्या गल्ल्याबोळांत आपण एकटे किंवा एखादी स्त्री एकटी स्वस्थ चित्ताने फिरू शकत नाही ? सर्वधर्म समभाव येथेच संपतो.

काश्मिरीयत : आत्तापर्यंत तीन वेळा साधारणतः १५ दिवसांच्या आसपास प्रत्येक ट्रिप केली. उन्हाळा, हिवाळा आणि शरद ऋतूत गेलो. अतिशय सुंदर राज्य आणि अनेक माणसे खरेच खूप चांगली होती. विशेषतः सुशिक्षित लोक. अरु व्हॅलीतील एके ठिकाणी बंदिपुरातील एक कुटुंब होते. त्यांना सर्व मुली. अतिशय शांत आणि काश्मीर विषयी खूप छान माहिती त्यांनी दिली. तसेच एक टूर ऑपरेटर मुनीर भाई मित्र झाले. प्रत्येक वेळेस स्वतःहून त्या माणसाने खूप माहिती आणि चांगले हॉटेल्स दाखविले. एका काश्मिरी शिक्षकांच्या घरी देखील राहायला मिळाले. एक पोर्टर काकांनी अतिउंचावरील ट्रेक करताना आमच्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले. तर एका गुज्जर काकांनी काहीही संबंध नसताना त्यांच्या झोपडीत चहा प्यायला बोलावले. गुरेझ सेक्टर मध्ये तर असेच ओळख ना पाळख एका व्यक्तीने प्रवासाने थकलो असताना चहा, केक आणि बरेच काही आम्हाला दिले तर एका व्यक्तीने त्यांच्या घरी नेऊन पाहुणचार केला. हे सर्व सत्य आहे. काश्मिरीयत हि आपल्या गावकडच्या पाहुणचारासारखीच थोडी आधीच सरस आहे. ते संस्कार आपण नाकारू नये. आणि काश्मीरला जावे देखील.

जिहादी : परंतु सर्वांवर विश्वास देखील ठेवू नये. भारतात जाण्यासाठी एकच मोठा रास्ता असल्याने गरीब आणि अशिक्षित लोकांचा मोठ्या प्रमाणावर मेंदू धुवून काढलाय. सतत कानी कपाळी धर्माची अफूची गोळी या लोकांना दिली जाते. तरुण देखील त्याला बळी पडतात. दुर्दैवाने तरुण मुली ज्यांना काही आयुष्यात करण्याची इच्छा आणि स्वातंत्र्याने जगण्याची उर्मी असते त्यांना हे लोक धर्माच्या नावाखाली पडद्याआड करतात मात्र आपल्या बायकापोरांकडे वाईट नजरेने पाहतात. सरस्वती , काली आणि भवानी मातेच्या भूमीत आज मात्र तेथील स्त्री संपूर्ण स्वतंत्र नाही हे सत्य आहे. याचा अर्थ सगळे लोक तसे नाहीत आणि तसा कोणी गैरसमज करू नये. पण धर्मवेड येथे टोकाला गेलेय. मी स्वतः ट्रेक करताना काम करणाऱ्या लोकांना तंबूच्या कोपऱ्यात बसून कट्टर जिहादी भाषणांचे व्हिडीओ मोबाईलवर ऐकताना पहिले आहे. सत्य नाकारू नका. कारण तुम्ही कितीही नकार द्या तुमचे डोके जमिनीत खुपसून आणि पार्शवभाग वर ठेवला तरी जिहाद बंद होणार नाही. त्या गोळीचा निशाणा डोक्याऐवजी तुमच्या ढुं - णावर असेल. हि विषवल्ली संपवायची असेल तर भारतीय सेनेला मोकळा हात देणे, भारतीय कंपन्या काश्मीरमध्ये सर्वदूर पसरविणे, अजून मोठे रस्ते तयार करणे गरजेचे आहे. जर काश्मीर मध्ये सर्वधर्म समभाव पाहायचा असेल तर हिंदू ( शैवमत, शाक्तमत, वैष्णव ), बुद्ध, शीख, सुफी, ख्रिश्चन यांचे सर्व उत्सव जोरात व्हायलाच हवे. खासकरून परदेशी मालकांचे बूट चाट णाऱ्या सेक्युलर भावांनो आणि भगिनींनो काश्मीरमध्येही तितकाच सेक्युलॅरिझम गरजेचा आहे जो तुम्हाला महाराष्ट्रात हवा असतो. जे सरकार हे करून दाखवील ते हिंदूंच्या, बुद्धांच्या आणि ख्रिश्चनांच्या भावनेचा खरा विचार करते आहे असे मी म्हणेल. का म्हणून एकाच भावंडाला मांडीवर घेऊन घाण साफ करण्यासाठी आमचे पैसे वाया घालवायचे ? भिकारचोट फिल्म वाले आता बोलणार नाहीत. त्यांना फक्त पॅलेस्टाईन दिसते कारण त्यांना मिळणारा पैसा. ज्यांचे पोटपाणी त्या लोकांवर आहे. ज्यांना परदेशात जगायचे आहे तुम्ही आपली अक्कल तिकडे चालवा. किमान आपल्या देशाशी गद्दारी तरी करू नका.

गुरेझ सेक्टरला फिरायला गेलो असताना फक्त आम्हीच होतो. ड्रायव्हरने आम्हाला दगडफेकीच्या खोट्या बातम्यांनी घाबरवून सोडले होते. परंतु भारतीय सेनेवर आमचा संपूर्ण विश्वास होता. आदल्या दिवशी तिकडे दहशदवादी घुसले होते. गोळीबार झाला होता. परंतु आतला कीडा म्हणा भारतातील अतिशय सुंदर भाग तेव्हा पाहण्याची उत्सुकता होती. पण फिरताना माझ्या मागे जवळपास ७ बोफोर्स डिप्लॉय केलेल्या पहिल्या तेव्हा कळले आपण पाकिस्तानच्या किती जवळ आहोत. प्रत्यक्ष तारांच्या कम्पाउंडजवळून जाताना ड्रायव्हरला जेव्हा तेथे थडग्यांची रांग पाहिल्यावर विचारले तेव्हा तो ती शहिदांची आहे म्हणाला. मनातल्या मनात समजून घेतले ही माणसे संपूर्ण ब्रेनवॉश झाल्यामुळे पुढच्या अनेक पिढ्या बरबाद करण्यास तयार आहेत. अजूनही त्यांचे मन सीमेपलिकडच्या मुसलमानांसाठी असून ज्या सैनिकांच्या आणि पर्यटकांच्या जीवावर घर चालते त्यांच्या विरोधीच आहे. बाबांनो तुम्हाला कुठ्लाहि राजकीय पक्ष काहीही सांगो. गावाकडे म्हणतात ना वळणाचे पाणी वळणालाच जाते तसे हे आपल्याला टिशू पेपरसारखे वापरतात. खरेच हिंदूंविषयी प्रेम असेल तर आमचे उत्सव ( दिवाळी, दसरा, गणपती , बुद्ध पौर्णिमा, बाबासाहेबांची जयंती, बैसाखी ) हे चौकाचौकात सैनिकांशिवाय साजरे होऊ शकतील तेव्हा मान्य करू.
गाढवांनो रात्रीच्या वेळी पंडितांच्या फाटक्या घरांमधील बिना कौलांच्या छपरांमधून दिसणारा चंद्र आणि तारे त्यांच्यावरील झालेला अत्याचार सांगेल. तुटकी फुटकी मंदिरे आणि निर्जन संग्रहालय तुम्हाला त्यांची तुमच्याविषयीची अनास्था सांगेल. रस्त्याच्या कडेला काळ्या अक्षरात भारतविरोधी लिहिलेले लिखाण तुम्हाला तुम्ही आणि ते वेगळे आहेत हे दाखवून देईल. तुमचे हे सर्वधर्माचे तुणतुणे तुमच्या घरात येऊन तुमच्या ... मध्ये जेव्हा ते घालतील तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. जगात धर्मवेडाने अनेक देशांचे बळी गेलेत. संस्कृती संपल्यात हे विसरू नका.

आणि खरेच जर सर्वधर्म समभाव पाहायचा असेल तर आपले उत्सव तिथे साजरे करायला जा. मला माहित आहे तुमच्यात तो दम नाहीय. नारानागाच्या मंदिरात शिवोपासना आपले एकही माणूस नसताना त्यांच्यासमोर आम्ही केली. गुलमर्गला पर्वतशिखरावर महामृत्युंजन्य मंत्र म्हंटला आणि छत्रपतींचा जयजयकार देखील केला. जर माझ्या देशात माझ्या पवित्र भूमीत मला भगवंताचे नामस्मरण करण्याचे बंधन असेल तर ती अडचण सरकारची आहे माझी नाही.

काश्मीरमध्ये शिवगर्जना चौकाचौकात व्ह्यालाच हवी. आपण तेथे जायलाच हवे. आपण मराठा आहोत ( जातीवाचक अर्थ घेऊ नका ). भारताचे रक्षण करणारे आपले राज्य आहे. संविधानाबद्दल बोलणारे, शिवजयंतीत तलवार नाचविणारे, गड किल्ल्यांवर मोठ्या संख्येने धार्मिक उन्मादात न्हाऊन मोहीम काढणारे स्वघोषित हिंदू धर्माच्या तारणहार लोकांनो तुमच्यात दम असेल तर महाराजांचे नाव आणि भगवा काश्मीर मध्ये फडकवा. अर्थात शांततेत. स्वघोषित शिवव्याख्याते, शिवकन्या, मावळे जाणार का तुम्ही काश्मीरला ? का फक्त इकडेच आपल्या चौकाचौकात नाचून गर्दीकरून आपल्याच लोकांना त्रास देणार ? जर काश्मिरी लोक पुण्यात मुंबईत येऊन मजा करतात तर आपण देखील तिकडे जायलाच हवे. ते राज्य देखील आपलेच आहे. सरकार काय करते यासोबत आपण काय करतो ते देखील महत्वाचे आहे. सर्व काश्मिरी वाईट नाहीत आणि जे जिहादी आहेत त्यांना आपली हिंमत दिसली पाहिजे. आज २७ लोक मेले तर एवढी फा-ली. ज्या आईने आपला पोरगा, बायकोने नवरा आणि मुलांनी आपला बाप सैन्यात कार्य करताना हरविला त्यांना काय वाटत असेल ?

*काश्मीरचा शाप जोपर्यंत तेथील लोक मान्य करून सर्वधर्मसमभाव अंगिकारित नाहीत तोपर्यंत यांच्या पुढच्या पिढ्या गिळीत राहणार आणि त्यात आपली शेतकऱ्यांची पोरे देखील हुतात्मा होणार.

शब्द आणि छायाचित्र : योगेश कर्डीले
मॉडेल : के रागिणी योगेश
स्थळ : अवंतिकेश्वर मंदिर ( अवंतिपुर काश्मीर )

Photos from Bharat Trails's post 26/02/2025

महाशिवरात्र : आज भारतीय जनमानसाचा आनंदाचा सण. सह्याद्रीच्या गिरिशिखरावर आणि गावोगावच्या निवांत जागी विराजमान असलेल्या शंभु महादेवाचा अध्यात्मिक सण. ज्याला जसे हवे त्या स्वरूपात दर्शन देणारा हा देव. अध्यात्माच्या प्रथम चरणावर मानव रूपात दर्शन देणारा महादेव, वैज्ञानिकाना अनु रेणूपासून ते आकाशगंगेमध्ये सर्वत्र तांडव नृत्य करणारा नटराज, तंत्र उपासकाला भूमितीय रूपात शिव लिंग रूपातील तर ध्यानाच्या शेवटच्या चरणात निर्गुण निराकार असणारा चराचरात भरून कळिकाळालाही न कळलेला महाकाल.

छत्रपतींनी स्वातंत्र्याची शपथ घेताना रायरेश्वरला ज्याच्या माथ्यावर रक्ताभिषेक केला तो शंभू महादेव या भारताच्या संस्कृतीच्या प्रवासाचा साक्षीदार कधी हडप्पामध्ये पशुपतीच्या रूपात, उत्तरेत भोले बाबा, दक्षिणेत नटराज, सतीचा परमप्रिय प्रियकर व सखा महादेव, कधी रुद्र, भैरव, कालभैरव नाथ परंपरेतील आदिनाथ तर मानवरूपात शिवाजी राजे आणि शंभू राजांच्यामध्ये अंश रूपाने प्रकटणारा शिव. प्रत्येक स्त्रीच्या मनातील आदर्श सखा , रणभूमीवर रक्ताच्या प्रत्येक थेंबांतून जिवंत होऊन नवनिर्मितीसाठी दुष्टांच्या संहारासाठी मराठ्यांचा हर हर महादेव.

Words & Images : Yogesh Kardile
In frame : K Vasundhara Yogesh
All rights reserved.

Photos from Bharat Trails's post 25/02/2025

Pargad : The last fort standing in Maharashtra on the border of Gomantak ( Goa ) & Karnataka. Dense forest hides the fort from direct view. Evergreen canopy makes it look like a hidden gem in the hands of Sahyadri. It is said that the fort is still guarded since the time of Chatrapati Shivaji Maharaj.

Photos from Bharat Trails's post 18/02/2025

Gomantak : The winter is behind now. Yet the most fertile land of Gomantak is charming me with its green beauty. Here are some images from everyday walks.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Mumbai