Paranjpe Attarwale

Paranjpe Attarwale

Share

Exclusive quality Perfumes and Attars

03/10/2025

दिवाळी जवळ येते आहे....

परफ्यूम्स आणि अत्तरांची ऑर्डर द्यायला विसरु नका....याखेपेस दिवाळी लवकर आहे आणि रेग्युलर कस्टयर्सनी ऑलरेडी ऑर्डर नोंदवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्वरा करा... 9823124242 क्रमांकावर PERFUME असे कॅपिटल मधे टाईप करुन व्हॉटसअप मेसेज करा. दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ पर्यंत येणाऱ्या व्हॉटसअप मेसेजना रिप्लाय करुन त्याच ऑर्डर स्विकारल्या जातील. त्यानंतर येणाऱ्या मेसेजेसना दिवाळीनंतरच रिप्लाय केले जातील. ज्या व्हॉटसअप मेसेजच्या सुरुवातीला PERFUME टाईप केले नसेल ते मेसेज ओपनच केले जाणार नाहीत.....

परफ्यूम्समधे ऑर्डर्स देताना रनवे, मॅक्सी, ओव्हरटेक यांची (For Men) खरेदी आवर्जून करा. थ्रील, ओपन सिक्रेट, क्लासिक ओपिअम, मॅजेस्टिक आणि गॉडफादर ही नवीन पुरुषांसाठी खास डिझाईन केलेली परफ्यूम्स आवर्जून खरेदी करा.... For Women स्वीटहार्ट, सिक्रेट फॉर हर, ओशन सिल्क, कॅनडा क्लब (डव्ह साबणाचा सुगंध) ही परफ्यूम्स आवर्जून खरेदी करा.

अत्तरांची लिस्ट ही दिली जाईलच पण त्यातही मिलाफ, जन्नत उल फिरदौस, स्विस मस्क, रॉयल मस्क, प्युअर सॅंडल, व्हाईट उध, रश्क-ए-कमर, केवडा, फैय्याझ, कायनात, लिहाज, नवाजिश, एन्जल मस्क, निशिगंध, जीन फॉर मेन, उध बगदादी, उध मोरक्कन, उध फरहा, उध बेनझीर, उध रोमान्स, नेपोलियन, दरबार, सिफर, योगमाया, हरिमोहिनी, शाही शमामा या नावांना प्रायोरिटी देणे. ही नावे माझी Personal Recommendations आहेत.

✍🏻 सचिन मधुकर परांजपे (पालघर)

03/07/2024

काल चि. विस्मयाला आमच्याकडील परफ्यूम्ससाठी एक pdf बनवायला सांगितले. म्हणलं मी काहीच सांगणार नाही. तु एकेका परफ्यूमचा सुगंध घ्यायचा आणि त्याचं तुला योग्य वाटणारं वर्णन लिहून पीडीएफ बनव म्हणजे क्लायंट्सना ती पाठवली की ऑनलाईन खरेदीसाठी त्यांना परफ्यूमची निवड करणं सोपं होईल. चितळे मास्तरांच्या शब्दात सांगायचे तर तिचं इंग्लिश फस्सक्लास आणि फर्डे म्हणता येईल असं आहे. म्हणलं लिही....

परफ्यूमच्या आमच्या नोट्स या तशा सिक्रेट असतात म्हणजे आम्ही त्याविषयी बोलतो पण काही गोष्टी लपवायला लागतात, बिझनेस सिक्रेट म्हणून...पोरीने प्रत्येक परफ्यूममधल्या टॉप नोट्स, मिडल नोट्स आणि बेसनोट्स ज्या सफाईदारपणे सांगितल्या ते ऐकून मी चाट पडलो.... बाबा, यात टॉपनोट सॅन्डल, बर्गेमॉट आणि वाईल्ड मस्क... मिडल नोट वेटीवर आणि सिनॅमन.... बेसनोट स्मोकी सिडारवुड आणि व्हॅनिला.... आयला सगळंच रहस्योद्घाटन काही सेकंदात.... आणि वरती बाबा, यात तुम्ही सफाईदारपणे बर्बन आणि ओकवुड ब्लेंडिंग केलंय ना? खल्लास....

आमचे आजोबा, माझे बाबा आणि मी... मला वाटत होते माझी तिसरी पिढी ही सुगंध व्यवसायातली बहुदा शेवटची पिढी... कारण मुलांचे अभ्यासविषय आणि कार्यक्षेत्र निराळी आहेत.... पण नाही... परमेश्वरकृपेने आमच्या पुढच्या पिढीतही तो #गंधवारसा जसाच्या तसा किंबहुना अधिक जास्त अचूकपणे उतरला आहे हे मला जाणवलं....

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

लवकरच नवीन काही ॲडिशनल परफ्यूम्ससह माहितीपुस्तिका उर्फ pdf आपल्याला मिळेल.

29/08/2023

३ नवीन कोरे करकरीत सुगंध. नेक्स्ट ऑर्डरमधे आवर्जून मागवा....

१) #नजदीक - टिपिकल फ्लोरल सुगंध, मिक्स वाईल्ड फ्लॉवर्सच्या गंधांचे माईल्ड ब्लेंडिंग केलेला एकमेवाद्वितीय असा सुगंध आहे. For Her... खूप दिवसांनी इतकं छान लेडिज ओन्ली अत्तर केलं आहे. तुमच्या प्रिय असणाऱ्या कोणत्याही “तिला” सप्रेम भेट द्यायला अगदी परफेक्ट अत्तर. ऑफिस, पार्टीज् किंवा कोणत्याही खास फंक्शन्ससाठी डिझाईन केलेलं अत्तर...

२) #रिवायत - केशर, उध, चंदन आणि गुलाब या सुगंधांपासून बनवलेल्या अरेबिक स्टाईलच्या अत्तराचा सुगंध किंचित स्ट्रॉंग आणि नंतर मध्यम होतो. पण कोणाही दर्दी अत्तरषौकीन माणसाला पहिल्या फटक्यात आवडेल असंच अत्तर आहे. युनिसेक्स आहे. हमखास मागवा.

३) #रक्स (Raqs) - हे देखील एक अप्रतिम सुगंधाचं युनिसेक्स अत्तर आपण बनवलं आहे. फ्रेंच कलोन आणि प्युअर इंडिअन कस्तुरी याचा अफलातून ब्लेंड यात आपण केला आहे. लास्टिंग चांगलं आहे. रक्स म्हणजे नृत्य करणं. मनुष्य आनंदात बेभान झाल्यावरच नृत्य करतो...ते मदहोश होणं या सुगंधात आपण अनुभवू शकता....

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
#अत्तरवाले_परांजपे_पालघर

25/03/2023

उन्हाळा सुरु झालाय. तर आता आमच्याकडील सुप्रसिध्द आणि जगात एक नंबर असलेल्या
#खस (वाळा),
ोरक्कन (मृद्गंध, खस आणि उध याचं अफलातून कॉम्बिनेशन)
#निशिगंध,
#प्युअर_सॅन्डल या चारही अत्तरांच्या ऑर्डर्स 9823124242 वर व्हॉटसप करुन आवर्जून द्या....

उन्हाळा नुसताच सुसह्य नव्हे तर सुगंधित करा. ही वरील चारही अत्तरे खास उन्हाळ्यासाठी आपण डिझाईन केलेली आहेत. चारही अत्तरे अत्यंत मंद सुगंधाची, मन प्रसन्न आणि चित्तवृत्ती शांत करणारी आणि शब्दशः एक सुखद अनुभव देणारी आहेत.....!!!!

-अत्तरवाले परांजपे (पालघर)
9823124242

(स्वर्गातील नंदनवनाच्या तोडीस तोड, स्वर्गीय सुगंधाची निर्मिती करणारे दुसरे फक्त आम्हीच)
☺️☺️☺️

07/10/2022

अत्तर चाहत्यांनी ऑर्डर देताना जी.ए.कुलकर्णींच्या आठवणींना समर्पित केलेलं #रमलखूण अत्तर, किंचित पारंपरिक सुगंधाची #हीना आणि #मजमुआ ही दोन अत्तरे, क्लासिक्स मधे #रश्क_ए_कमर #रॉयल_मस्क, #प्युअर_सॅंडल, #इंटिमेट आणि #मिलाफ आवर्जून ऑर्डर करा आणि आधुनिक किंवा स्टायलिश सुगंधांसाठी, लॉंग लास्टिंग #ॲक्वा_फ्रियो, #डार्लिन #नेपोलिअन, #कायनात, #फैय्याझ, #मैखाना आहेत....

ऊध च्या चाहत्यांनी ादी, ोरक्कन, ास्कस आणि ेनझिर आठवणीने मागवायची....

-अत्तरवाले परांजपे (पालघर)

दिवाळीचा क्षण न क्षण सुगंधित करण्याची जबाबदारी आमची

Photos from Paranjpe Attarwale's post 23/09/2022

केवडा हा दूर्गा, गणपती आणि विष्णूपूजनात अग्रस्थानी मानला जातो. केवड्याचा सुगंध हा किंचित Strong आणि dominating असतो. केवडा अत्तर तसं लोकप्रिय आहेत. एक्झॅक्टली याच अप्रतिम सुगंधाचा वापर आपण “गंधकेतकी” या गंधरेखाच्या हॅन्डमेड सोप्समधे केला आहे. एक अप्रतिम सुगंधाचा हॅन्डमेड सोप इतकंच मी म्हणेन #गंधकेतकी बद्दल....clary sage ह्या essential oil ची जोड दिली आहे जे anti anxiety, stress relief साठी उपयुक्त आहे.

“बहरला पारिजातक दारी, फुले का पडती शेजारी?” हे गदिमांनी लिहिलेलं भावगीत तुमच्या परिचयाचं असेलच. स्वर्गातून आणलेलं पारिजातकाचं रोपटं भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या महालाच्या कुंपणाजवळ लावतात...त्यामुळे सत्यभामा रुक्मिणीकडे अहंकाराने बघत असते. पण हळुहळु त्याचा वृक्ष झाल्यावर त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या दारी पडतात अशी गंमत होते. सत्यभामेच्या मनातली खंत ही माडगूळकरांनी अतिशय यथार्थपणे शब्दात उतरवली आहे. पारिजातकाचा हाच स्वर्गीय आणि मोहक सुगंध आम्ही “गंधरेखा हॅन्डमेड सोप्स” च्या “ #स्वर्गा” या सोपमधे जसाच्या तसा उतरविलेला आहे. त्यामुळे तुमची अवस्था सत्यभामेऐवजी रुक्मिणीसारखी आनंदीच होईल याची १००% गॅरंटी. मिडिअम ते लाईट फ्लोरल नोट्सचा वापर आपण यात केला आहे. मंद सुगंध बराचकाळ दरवळत कसा राहील याची दक्षता आपण घेतली आहे. Goat milk base मध्ये बनवलेला हा सोप कोरड्या त्वचे साठी उत्तम आहे. ह्यात neroli essential oil वापरले आहे जे मन शांत करून झोप लागण्यास मदत करते, त्वचेचे संवर्धन करते.

या आणि अशाच एकापेक्षा एक सर्वोत्तम सुगंधी आणि दर्जेदार हॅन्डमेड सोप्सच्या माहितीपत्रक, ऑर्डर्स बुकिंगसाठी संपर्क 9309145456

वैयक्तिक सर्व ऑर्डर्स, गिफ्टपॅक्स आणि कॉर्पोरेट बल्क ऑर्डर्स स्विकारल्या जातील.

-डॉ (सौ) श्रेया सचिन परांजपे
सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Photos from Paranjpe Attarwale's post 18/09/2022

दिवाळी जवळ येते आहे. तेव्हा नेहमीच्या टिपिकल मिठाई, ड्रायफ्रुट्स आणि सोनपापडी 😜😜😜 पेक्षा निराळी...खूप रॉयल आणि तितकीच संस्मरणीय अशी “कॉर्पोरेट गिफ्ट” द्यायची खरंच मनापासून इच्छा आहे?

तुमचं हा खरोखरच तुमच्या बिझनेसला तुमचे ग्राहक, सहकारी, आणि मित्र-स्नेही यांच्या मनोमनी एक अढळ स्थान द्यायचं आहे?

या एका अप्रतिम #कॉर्पोरेट_गिफ्ट मुळे तुमचं आणि तुमच्या बिझनेसचं स्थान वर्षभर समोरच्याच्या मनातच रहाणार नाही तर तुमची #सिग्नेचर ओळख या गिफ्टमुळे कायम ठसेल यावर विश्वास आहे ना?

मग एक काम करायचं....अप्रतिम सुगंधाची, तब्बल तीन पिढ्यांची सुसंस्कृत कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या मराठी आणि पेशाने डॉक्टर असलेल्या उद्योजिकेच्या #गंधरेखा या #हॅन्डमेड_सोप्स ना यंदा एक संधी आवर्जून द्या असा माझा आग्रह आहे.

एकापेक्षा एक अप्रतिम सुगंधानी नटलेल्या #विष्णुप्रिया #कर्पूरगौरं #मांगल्यम् #हीना_अभ्यंगम #गोल्डन_ब्लॉसम अशा वैविध्यपूर्ण नावांच्या १२ साबणांसोबत यंदाचे वर्षी नव्याने introduce केल्या जाणाऱ्या #स्वर्गा आणि #गंधकेतकी या दोन अक्षरशः स्वर्गीय सोप्सना मनात नोंदवून घ्या आणि पुढचा नंबर व्हॉट्सप/कॉल साठी ताबडतोब सेव्ह करा +919309145456 आणि 21 सप्टेंबर सकाळपासून ऑर्डर्स साठी मेसेज किंवा फोन करा....कॉर्पोरेट गिफ्ट्स सोबत वैयक्तिक वापरासाठीही तुम्ही संपर्क साधू शकता.

विशेष म्हणजे उद्योजिका या स्वतः व्यवसायाने डॉक्टर असल्याने प्रत्येक साबण बनविताना त्यात त्वचेला हानिकारक रसायने टाळून शक्य तितक्या आरोग्यकारक पध्दतीने सोप्स बनविले जातात त्यामुळे अर्थातच भरपूर फेसापेक्षा (जो त्वचेला कोरडं आणि नंतर निस्तेज करतो) गुणवत्ता, अधिक काळ दरवळत रहाणारा निराळा सुगंध आणि दर्जा याला आपण जास्त महत्व देतो. इथेच आपल्या हॅन्डमेड सोप्सचं वेगळेपण दिसून येतं...

#गंधरेखा
#गंधरेखा_हॅन्डमेड_सोप्स





-डॉ (सौ) श्रेया सचिन परांजपे
सचिन मधुकर परांजपे (अत्तरवाले परांजपे)
पालघर

Photos from Paranjpe Attarwale's post 31/05/2022

अत्तरवाले परांजपे (पालघर) म्हणजे खरोखरच स्वर्गीय सुगंधाची लयलूट असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. अगदी मनापासून सांगायचं झालं तर सुगंध आणि आम्ही हे एक अविभाज्य समीकरण आहे. सुगंध टिकतो किती? या टिपिकल भारतीय मानसिकतेतून निर्माण झालेल्या सनातन प्रश्नाच्या उत्तरावर त्यातल्या त्यात समाधानकारक उत्तर आम्ही देतोच पण सुगंध टिकतो किती यापेक्षा तो तुम्हाला आनंद किती देतो? तो किती मनभावन आहे? तुमच्या चित्तवृत्ती उल्हसित करण्याची ताकद त्या सुगंधात आहे का? हे महत्वाचे. अत्तरांची गंमत म्हणजे जितका सुगंध अधिक टिकतो तेवढं ते अत्तर उग्र आणि समोरच्या माणसाचं डोकं उठवणारं... अर्थात आपण सुगंधाचा दर्जा आणि टिकणं (lasting) याचा उत्तम संयोग साधलेला आहे.

नव्या आणि जुन्या ग्राहकांना काही उत्कृष्ट सुगंधांची माहिती नव्याने देण्याआधी एका नव्या सुगंधाची घोषणा आज करायची आहे ते अत्तर म्हणजे #सुकून. हे अत्तर असलं तरी पूर्णपणे फ्रेंच परफ्यूमच्या धर्तीवर डिझाईन केलं आहे. लाईट फ्रुटी बेसनोट्स आणि फ्लोरल नोट्स वर बनवलेलं हे एक अप्रतिम माईल्ड सुगंधाचं अत्तर आहे. याचं लास्टिंग चार ते सहा तास आहे आणि त्याचा सुगंध जवळच्या लोकांना किमान सहा तास सतत येत राहतो. याचा स्प्रेड (दरवळ) तीन फुटांपर्यंत आहे. हे एक पार्टी फ्रेग्रन्स आहे असं म्हणता येईल.... लक्षात ठेवा #सुकून_

याच बरोबरीने अत्तरांची ऑर्डर करताना पुढील काही सुगंध आवर्जून मागवा.

#मिलान_मूड्स (for Men) लाईट आणि वुडी फ्रेग्रन्स असणारं इंग्लिश अत्तर.

हा खुपच पर्सनलाईज्ड सुगंध आहे. याला मी "इंटिमेट क्षणांचा सोबती" असं गंमतीने म्हणतो.

#इबादत इबादत म्हणजे पूजा...टिपिकल वुमन्स फ्रेग्रन्स असणारं एक अप्रतिम अत्तर. मी तर म्हणेन प्रत्येक वर्किंग वुमन आणि स्टुडंटने अवश्य एकदा तरी वापरुन पहावा असा मोहक सुगंध. थोडं नॉस्टॅल्जिक आणि पूर्ण फ्लोरल नोट्स ने बंदिस्त...खूप छान दरवळत रहाणारं अत्तर...

#क्लासिक_वुडी हे देखील पुरुषांसाठी डिझाईन केलेलं अत्तर...

आणि मुख्य म्हणजे तुम्ही #अत्तरांचे दर्दी षौकीन असाल तर आमच्याकडील ोरक्कन, ादी, ा आणि ेनझीर यांच्याशिवाय तुमची ऑर्डर अपुरी राहील हे लक्षात ठेवा. आमची उध अत्तरांची रेंज अनुभवल्याशिवाय खरा षौकीन राहूच शकत नाही. आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघणे, हैदराबादला जाऊन बिर्याणी न खाणं आणि इस्तंबूलला जाऊन बखलावा न चाखण्यासारखं आहे ते.... असो.

तर आता ताबडतोब 9823124242 ला ATTAR LIST असा व्हॉट्सप करा आणि तुम्हाला शक्य तितक्या लवकर आम्ही माहिती पाठवू त्यानुसार लवकरात लवकर ऑर्डर द्या आणि पेमेंट प्रोसिजर पूर्ण करा...

कारण तुम्हाला माहिती असेलच... ब्रह्मांडात सर्वोत्कृष्ट अत्तरे मिळण्याची ठिकाणे दोनच. एक म्हणजे प्रत्यक्ष #स्वर्ग आणि दुसरे पृथ्वीवर #अत्तरवाले_परांजपे_पालघर..

😊😊😊

31/01/2022

#चंदन (Sandalwood) हा समस्त भारतीयांच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. वैयक्तिक वापरापासून ते देवाच्या पूजेपर्यंत चंदनसुगंधाचा वापर गंध, अत्तर, टॅल्कम पावडर आणि निरनिराळ्या सौंदर्यप्रसाधनात केला जातो. चंदनाचा सुगंध हा गोड, शीतल आणि मन अत्यंत प्रफुल्लित करणारा आहे. चंदनाचा गुणधर्मच मुळात शीतल आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधांत देखील चंदनाचा वापर केला जातो.

आपण #अत्तरवाले_परांजपेंतर्फे एक अतिशय अप्रतिम आणि एकमेवाद्वितीय सुगंधाचे #प्युअर_सॅंडल ( ) नावाचे अत्तर आणि परफ्यूम (Scent) बनविलेले आहे. टिपिकल सिंथेटिक सुगंधापेक्षा अतिशय निराळं आणि बरंचसं पूजेच्या चंदनसुगंधाशी जवळीक साधणारे अत्तर+परफ्यूम आपण केलं आहे. तुम्ही एकाचवेळी अत्तर आणि परफ्यूम वापरलं तर अधिकस्य अधिकं फलं. किंवा दोन्हीपैकी एकच काहीतरी वापरु शकता. हा सुगंध तुमचा ठरु शकतो हे नक्की.... साधारणपणे पाच ते सहा फूट प्रोजेक्शन पॉवर झोन असून, हा सुगंध लाईट टू मिडिअम असूनही दीर्घकाळ रहातो. बंदिस्त रुम, एसी हॉल, फंक्शन्स, डिनर पार्टीसाठी वापरायला अतिशय अप्रतिम सुगंध असं आपण म्हणू शकतो. एकाचवेळी दोन्ही वापरुन बघा... सुगंध तोच पण त्याची गंमत डबल...

सँडलवूडचा अतिशय निराळा पण तरीही एकदम अप्रतिम सुगंध हवा असेल आणि आजतागायत इतका वेगळ्या नोट्सवरचा सुगंधानुभव घ्यायचा असेल तर आजच्या आजच 9823124242 वर व्हॉटसअप मेसेज करा. #प्युअर_सॅंन्डल च्या कॉम्बो किंवा स्वतंत्र अत्तर किंवा परफ्यूमची चौकशी करा आणि ऑर्डर कन्फर्म करा...

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

26/01/2022

सर्वसाधारण परिचित सुगंध म्हणजे गुलाब, केवडा, मजमुआ, जन्नत-उल-फिरदौस, हीना ही आपली #अत्तरवाले_परांजपे_पालघर यांची स्पेशालिटी आहेच. पण खरे अस्सल अत्तरषौकीन रसिक पसंती दर्शवतात ती आपल्या #उध आणि #मस्क या दोन स्वर्गीय सुगंधाच्या अफाट रेंजला... मस्क आणि उध हे दोन्ही माझे वैयक्तिक स्वतःच्या आवडीचे सुगंध असल्याने त्यात मी माझ्या स्वसंशोधित पध्दतीने अनेक सुरेख कॉम्बिनेशन्स करुन एकापेक्षा एक अप्रतिम सुगंधाची निर्मिती केली आहे. आपल्यासारख्या चोखंदळ आणि दर्दी रसिकांनी आपल्या चॉईसनुसार मागणी नोंदवावी ही नम्र विनंती. तुम्ही नाराज होणार नाही याची खात्री....

#मस्कच्या प्रत्येक सुगंधाचा प्रोजेक्शन एरिया २ ते ४ मीटर असून #उधच्या सुगंधाचा प्रोजेक्शन एरिया थोडासा जास्त आहे. सर्वच सुगंध साधारणपणे ५ ते १२ तास टिकतात.

#ग्रीन_मस्क, 👇🏻
#स्विस_मस्क, 👇🏻
#रॉयल_मस्क 👇🏻
#प्युअर_मस्क (मंद सुगंधाची अत्तरे)
#एन्जल_मस्क 👇🏻
आणि
#मस्क_निर्वाणा 👉🏻(मध्यम सुगंधाची अत्तरे)

ेनझीर
ोरक्कन
ादी

#व्हाईट_उध
#मैखाना
आणि
अगदी लेटेस्ट
्हेनिस (सर्वच उध अत्तरे ही किंचित स्ट्रॉंग असतात)

याशिवाय आपल्याकडे सर्वोत्तम क्वालिटीची परफ्यूम्स देखील उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी.

अधिक माहिती, दरपत्रक आणि बॅन्क ट्रान्सफर डिटेल्स साठी 09823124242 वर व्हॉटसअप करा. रिप्लाय येईलच, प्रतिक्षा करा. घाईगडबड करु नका. आलेल्या मेसेजेसना उत्तर देण्यासाठी आमच्याकडे सध्या एकच व्यक्ती उपलब्ध आहे (तुमच्या प्रेमळ कृपेचा वरदहस्त लाभला तर कॉलसेंटरही उघडू लवकरच)

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

26/01/2022

अत्तरं/परफ्यूम्स विकणं आणि अत्तराच्या सुगंधाची जाण असणं हे दोन्ही एकदम स्वतंत्र विषय आहेत. आमची या सुगंधाच्या व्यापारातील तिसरी पिढी....लोकांना एक्झॅक्टली काय आवडेल? कितपत रुचेल? पसंत पडेल की नाही? याचा अभ्यास गेल्या तीन पिढ्या आमच्या रक्तात आहे. यात कोणताही गर्व किंवा अभिमान नाही हे मी विनयाने नमूद करु इच्छितो....

एखादा मस्क, उध किंवा कोणताही वुडी, फ्लोरल सुगंध माझ्या मनासारखा तयार झाला की मी एक काम करतो. रात्री अगदी झोपण्यापूर्वी हातपाय धुवून वगैरे बेडवर आलो की त्या सुगंधाचा एक थेंब मनगटावर चोळतो. कानांच्या पाळी मागे लावतो. ती सुगंधाची कुपी उशीलगतच ठेवतो. आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करतो.... रात्रभरात मग मीच केलेल्या प्रयोगाची रहस्य एकापाठोपाठ एक उलगडत जातात... अगदी सुरुवाती सुरुवातीला #अप्पर_नोटचा गंध दरवळत रहातो, त्यातच झोप लागते. मध्यरात्री कधीतरी अवचित जाग आली, पाणी प्यायला उठलो की मनगटावर आणि नाकापाशी #मिडलनोटच्या एखाद्या मस्क किंवा सिट्रस सुगंधाचं शांत सुराज्य सुरु असतं. आणि अगदी भल्या पहाटे कुस बदलताना थोडीशी जाग आली की #बेसनोटच्या चंदनाचा किंवा इराणी उधचा अंमल सुरु असतो. सबंध रात्रीच्या निरनिराळ्या प्रहरात जसे निरनिराळे राग आळवले जावेत तसे सुगंधनाट्याचे निरनिराळे प्रवेश सुरु असतात आणि आपण फक्त रसिकतेने ते न्याहाळत बसायचे असतात. सकाळी चहाच्या पहिल्या घोटाबरोबरच अत्तर हीट की फ्लॉप? ते समजतं. #गंधरेखेच्या कृपेने आजतागायत फेल्युअरचं प्रमाण अगदी नगण्य आहे ही परमेश्वरी कृपाच.....

अत्तर किंवा परफ्यूम्स ही लोकांवर चांगले इंप्रेशन पडावं आणि तुमच्या आसपासचं वातावरण सुगंधी रहावं म्हणून असतातच पण त्याहीपेक्षा खरंतर तो तुमचा वैयक्तिक आनंदोत्सव असतो. म्हणून खरे अत्तराचे षौकीन लोक कायमच त्या गंधसुगंधाचा अपरिमित आनंद लुटत असतात. अत्तरं आणि परफ्यूम्स म्हणूनच इतरांपेक्षा तुम्हाला स्वतःला अगोदर आवडावी लागतात ती यासाठीच.... आणि तुम्हाला एक्झॅक्टली काय आवडेल? ते तुमच्याइतकं जाणतो ते आम्ही.... तेव्हा आता एक काम करायचं. कालच्या उध आणि मस्क च्या पोस्टमधली काही नावं आणि शिवाय आणखीन काही Exclusive अत्तरं आणि परफ्यूम्सच्या ऑर्डर्ससाठी 9823124242 वर व्हॉटसअप मेसेज करा. रिप्लाय येईलच (घाईगडबड करु नका) आणि इतर डिटेल्स आल्यावर ऑर्डर नोंदवा... बाकी आम्ही बघून घेतो...

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
#अत्तरवाले_परांजपे_पालघर

Photos from Paranjpe Attarwale's post 15/10/2021

अजून काही जणांनी ऑर्डर देणं शिल्लक असेल तर एक काम आवर्जून करा...माझा, एका सुगंध एक्स्पर्टचा आग्रह आहे असं समजा पण कोणत्याही परिस्थितीत #मांगल्यम् या आमच्या #गंधरेखा_हॅन्डमेड_सोप्स च्या एका अप्रतिम आणि दर्जेदार सोपची ऑर्डर अवश्य द्या. खरोखरच तुम्हाला अभ्यंगस्नानाची खरीखुरी मजा आणि त्याचं सुगंधसुख अनुभवायचं असेल तर "मांगल्यम्" आठवणीने मागवा....

आणि तसाच आमचा #कर्पूरगौरं हा दुसरा #गंधरेखाचा USP असणारा एक अप्रतिम सोप. अस्सल उच्चदर्जाचा भीमसेनी कापूर आणि मस्क (कस्तुरी) यांचा जगातला (होय सबंध जगात इतका उत्कृष्ट ब्लेन्ड कुठेच नाही) अप्रतिम मिलाफ म्हणजे "कर्पूरगौरं" एका शब्दशः दिव्य सुगंधाच्या अनुभूतीने सबंध स्नानघर दरवळून टाकणारा एकमेव सोप...

9309145456 वर व्हॉटसअप मेसेज ( मेसेज 24x7 कधीही) किंवा फोन कॉल (सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान) करा आणि तातडीने ऑर्डर नोंदवा. आता फक्त शेवटचे ५ दिवस उरले आहेत चौकशी करून ऑर्डर नोंदविण्यासाठी.
आत्तापर्यंत आलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद आणि मागणी यासाठी आम्ही आपणा सर्वांचे आभार मानतो आहोत.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Want your business to be the top-listed Beauty Salon in Palghar?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Mahim Road
Palghar
401404

Opening Hours

Monday 10:30am - 6pm
Tuesday 10:30am - 6pm
Wednesday 10:30am - 6pm
Thursday 10:30am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10:30am - 6pm