Suteja Collections
खणाच्या पर्सेस , sling बॅग्स , गुढीवस्त्रं , कॉटन sling बॅग्स , customised तोरणे असं बरंच काही ...
06/11/2025
हॅलोज कसे आहात सगळे? 😊
मी माझ्या wall वर लिहिलं आहेच पण इथंही परत डकवते आहे...
मराठी scrabble अर्थात मराठी शब्दरचना गेम हा एक तार्किक विचार आणि स्मरणशक्तीचा यथायोग्य वापर करवून घेणारा गेम आहे .. मेंदू तल्लख राहण्याकरता आणि अल्झायमर किंवा dementia सारख्या रोगांचे येणे लांबवण्याकरता ही एक अफलातून युक्ती आहे ...
शब्दकोडे सोडवायची आवड असेल आणि मराठी शब्दांशी तुमची नाळ जुळलेली असेल तर हा game तुम्हाला नक्कीच आवडेल ..
सध्या 600/- ला उपलब्ध असलेल्या या खेळावर आकर्षक discount सुद्धा मिळेल.
भारतीय खेळांना ,भारतीय भाषांना प्रोत्साहन देऊ या , मराठीसाठी काहीतरी करायचं असल्यास हा गेम तुमच्याकडे असणं must !!!
25/03/2025
हॅलो दोस्तांनो ,
पहिलं म्हणजे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानायचे आहेत ☺️ कारण सुतेजाचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत .. दिल से शुक्रिया !!!
दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे :
आम्ही इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आणि विविध items दाखवत असतो , तुमच्यातल्या खूपजणांना ते आवडतं , बरेचजण आवर्जून सांगतात देखील .. लेकिन बॉस , वेट !! 'बुद्धी आणि पैशांचं सोंग आयुष्यात कधीही घेता येत नाही!' हा मंत्र आपल्या मनात आणि मेंदूत तिन्हीत्रिकाळ वाजत असतोच ना ! एखादी वस्तू कितीही आवडली तरी 'सध्या बजेटमध्ये बसत नाहीय , नंतर बघू' असं आपण मनाला बजावतो !( आणि हो , हे फक्त बायकाच करतात असं नाहीय हं , पुरुषही करतात , फक्त ते बोलून दाखवत नाहीत एवढंच! 😁)
तर अनेक लोकांच्या कळत नकळतपणे विचारल्या गेलेल्या (किंवा मी read केलेल्या) शंकांनुसार काही बजेट फ्रेंडली ऑप्शन्स मी इथं आज दाखवणारे ... आवडले तर rate आणि MOQ (Minimum Order Quntity) याबाबत नक्की चौकशी करा! आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार हा item तुमच्या बजेटमध्ये बसवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करू!
चलो , एन्जॉय !! भेटत राहा 💐💐
- सुतेजा कलेक्शन्स
14/02/2025
हॅलो मित्रमैत्रिणींनो
कसा काय सुरुय व्हॅलेंटाईन्स डे? सगळ्यांना मस्त मस्त जाऊ दे व्हॅलेंटाईन डे ☺️ तर आज निमित्त आहे सुतेजा कलेक्शन्सच्या fb पेजच्या दुसऱ्या वाढदिवसाचं !! आत्तापर्यंत महाकुंभमेळा जितक्या वर्षांनी भरतो तितके फॉलोअर्स म्हणजे जवळपास 144 फॉलोअर्स जमलेले आहेत !! Hurrah !! या इवल्याशाच पण महत्त्वाच्या यशाबद्दल आमचे मित्र , हितचिंतक आणि आमच्यावर भरघोस विश्वास टाकणारे कस्टमर्स या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद 😊💐
आम्ही तुम्हाला असेच नवनवे प्रॉडक्ट्स दाखवत राहू आणि तुम्ही असंच आमच्याबरोबर प्रेमाने राहा आणि हो , आमचं (नेहमी करताय तसं) प्रमोशन करा हं ☺️
थँक्स अ लॉट वन्स अगेन ☺️☺️
दुसऱ्या अनिव्हर्सरीनिमित्त आम्ही काही छान छान प्रॉडक्ट्स इथं दाखवत आहोत , हवे असल्यास नक्की संपर्क करा ..
भेटू , बोलू आणि संपर्कात राहू !!
- सुतेजा कलेक्शन्स
25/10/2023
हॅलो मित्रांनो आणि माझ्या गोड मैत्रिणींनो
ही पोस्ट खास तुम्हाला आठवण करायला ☺️ ऑनलाईन म्हणा किंवा सोशल मीडियावर आपण कितीही प्रॉडक्टस दाखवत असलो तरीही शेवटी फोटो ते फोटोच आणि प्रत्यक्ष ते प्रत्यक्षच ना , इथं काही 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट'नसते असा सगळा हिशोब ☺️
तर खास दिवाळीसाठी बॉण्ड ग्रुपने आयोजित केलेलं 'झेप' प्रदर्शन येतंय तुम्हा सगळ्यांच्या भेटीला .. ☺️
चिंचवडे लॉन्स , चिंचवड इथं 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी आम्ही 'सुतेजा कलेक्शन्स' येऊ तुमच्या सर्वांच्या भेटीला .. खण प्रॉडक्ट्स , sling बॅग्स , सुंदर अत्तरं , सुंदर सुंदर mugs , फोटोफ्रेम्स आणि बरंच काही घेऊन !
भेट द्यायला विसरू नका , 28 आणि 29 ऑक्टोबरला !
02/09/2023
फ्रेंड्स लोक , कसे आहात रे बोले तो एकदम झकास ...'यंदा काय अधिक मास आहे , लांब आहे गणपती बाप्पा' म्हणत निवांत राहू नका बरं का ! आता लाडके बाप्पा अगदी 15 दिवसांवर आलेत ... सजावटीची तयारी , भिजवलेल्या फुलवाती, नवे नवे कपडे , इकोफ्रेंडली बाप्पा बुकिंग या सगळ्यांबरोबरच आपल्याकडे चिक्कार पाहुणे येणारेत हेही ध्यानात ठेवायचं ☺️ ताईमाईअक्का झालंच तर छोटी बबडी , छोटा सोनू , सोनुमोनुचे आईबाबा असे सगळे एकत्र जमणार , बाप्पांची प्रतिष्ठापना होणार , छान छान नैवेद्याचं जेवण होणार , उकडीचे छान की तळणीचे असल्या फालतू मुद्द्याला महत्त्व न देता पुढ्यात आलेले मोदक चटकन 'स्वाहा' होणार .. सगळीकडे आनंदीआनंदाचं आणि उत्सवाचं वातावरण ! गणपती येतात न येतात तोच 'आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा' चे पडघम वाजू लागतात , घरोघरी सवाष्ण जेवणाची लगबग असते ... गौरायांचे सुंदर मुखवटे आणि सुरेख दागिने ठेवणीतल्या पेट्यांमधून बाहेर निघतात ..
या सगळ्या गदारोळात , धामधुमीत , धावपळीत , कोलाहलात एक विसरायचं नाही ...
कधीही सांगा , कुणीही सांगा , केव्हाही हाक मारा ...
सुंदरसे दागिने , बॅगा , खणाची प्रॉडक्ट्स , गिफ्ट आयटम्स घेऊन #सुतेजा_कलेक्शन्स तुमच्या सेवेसी सादर आहे ☺️ तुम्ही फक्त नाव सांगायचं आणि आम्ही ते तुमच्या पुढ्यात हजर करायचं ! इतकं सोपं आहे हे हा का ना का 😊😊😊
पण ..... एकच करायचं
ऑर्डर तेवढी लवकर प्लेस करायची म्हणजे कसं सणाच्या दिवशी गडबड होणार नाही , कसं?
तर पटापट छान छान प्रॉडक्ट्स पहा , कुठलं आवडतंय ते मनाशी नक्की करा आणि अल्लादिनचा दिवा (पक्षी : WA मेसेज) घासा , आप के खिदमत मे सुतेजा हाजीर है !!
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
07/07/2023
तू ही तू तू ही तू
जीने की सारी खुशबू
तू ही तू
सतरंगी रे
मनरंगी रे
कसे आहात दोस्त लोक्स? कडक आणि तापवणाऱ्या उन्हाळ्यानंतर शीतल आणि शांतवणारा वर्षाऋतू जरी आलेला असला तरी आमच्या ऑफर्स मात्र अजुनी 'कडक' आहेत बरं का ☺️
सणसमारंभ , पाव्हणेरावळे , गणगोत यांच्यासाठी गिफ्ट्स घेण्यापूर्वी स्वतःसाठी सुद्धा प्रेमानं आवर्जून काहीतरी छोटंसं का असेना पण गिफ्ट घ्यायला विसरू नका , का ते सांगू ? कारण जगण्याचा 'उत्सव' असाच तर सेलिब्रेट करायचा असतो दोस्तांनो जेणेकरून जगण्यातला 'उत्साह' टिकून रहावा ! किनई ? ☺️
आणि एक सांगू का? गिफ्ट्स घेण्यासाठीचे छोटेमोठे चिक्कार ऑकेजन्स आपल्यासमोर हात जोडून उभेच असतात ... आता हेच बघा ना , अधिक महिना म्हणू नका, श्रावण महिना म्हणू नका, गौरी-गणपती म्हणू नका,दिवाळी म्हणू नका ... प्रत्येक सणासाठी one stop solution म्हणून आम्ही आपल्या दिमतीस सहर्ष हजर आहोत ...
You name it and we serve it because your wish is my command ... हे अगदी इतकं cheesy नाही म्हणणार 😆 पण खरंच तुम्हाला आवडतील अशा मस्त मस्त प्रॉडक्ट्सच्या रांगा लागल्यात आमच्याकडे ... या पटापट उचला चटचट खुश व्हा फटाफट 😊😊
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Pune