Pankh Beauty Academy
This is Ms. Sana Gotama and I am Hairdresser and skin esthetician. I have done Cidsco and Cibtac. Beauty Parlour Classes
17/07/2024
आता या पुढील काही भागात आपण फेशीअल साठी उपयुक्त असलेल्या काही मशीनच्या बद्दल माहिती पाहणार आहोत.
कोणतेही मशीन वापरण्या अगोदर त्या मशिनची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तसेच मॅन्युफॅक्चरचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचून मशीन उत्तम स्थितीत असल्याची खात्री करावी.
कोणत्या स्थितीत मशीन वापरू नये हे सुद्धा माहिती हवे. म्हणूनच फेशीअल सुरू करण्याअगोदर "क्लायंट कन्सल्टीग " (ग्राहका बद्दलची माहिती) करणे ह्याला प्रथम प्राधान्य द्यावे.
सर्व प्रथम कोणते कोणते मशीन्स वापरले जाते ते पाहू या. नंतर प्रत्येक मशीन बद्दलची माहिती वेगवेगळ्या भागात पाहू या.
फेशीअल साठी ब्रशिंग युनिट, स्टीमर, गॅल्व्हनिक मशीन, हाय फ्रिव्केन्सी, व्हॅक्युम सक्शन आणि अल्ट्रासॉनिक मशीन इत्यादी मशीन्स वापरले जातात. प्रत्येक मशिनचे काम आणि वेेशिष्ट वेगवेगळी असतात. फेशीअल मशीन्स त्वचेच्या गरजेनुसार आणि वापरले जाणारे प्रॉडक्ट नुसार निवडले जाते.
ब्रशिंग युनिट
खरं तर आता अॅडव्हान्स प्रॉडक्ट मुळे हे मशीन वापरत नाही. शिवाय यातील ब्रशमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होण्याची शक्यता असते. असे माझं वेेयक्तीक मतं आहे.
तरीही या बद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.
ब्रशिंग युनिट या मशीन मध्ये ए.सी( अल्टरनेटीव्ह करंट) असतो.
या मध्ये मोठा ब्रश, मिडियम ब्रश, लहान ब्रश, स्पंजब्रश असे वेगवेगळे भाग असतात.
मोठा ब्रश हा मान, गळा आणि गळ्याखालील थोडा भाग या साठी वापरतात.
मिडियम ब्रश गालासाठी वापरतात.
लहान ब्रश कपाळ, नाक, हनुवटीसाठी वापरतात.
स्पंज ब्रश वयस्क किंवा संवेदनशील(सेन्सेटिव्ह त्वचा) साठी वापरले जाते.
ब्रशेसचे निर्जंतुकीकरण करण्याची पद्धत
वापरलेले ब्रश प्रथम पाणी आणि साबणाने स्वच्छ धुवावेत. त्या नंतर डिसइंफेक्टेड लिक्वीड स्वच्छ पाण्यात मिसळून त्या पाण्यात धुतलेले ब्रश ३० मिनिटे भिजवावीत. कोरडे केल्यावर स्टॅबिलाझर मध्ये ठेवावे.
ब्रशिंग युनिट वापरण्याची पद्धत
प्रथम ग्राहकाची त्वचा तपासावी.
योग्य प्रॉडक्ट त्वचेवर असावेत.
ब्रश थोडेसे ओले असावेत.
गाहकाला हेअरबॅंड लावावा.
ग्राहकाच्या डोळ्यावर ओला कापूस असावा.
ब्रशहोल्डर ग्राहकाच्या त्वचेवर हळुवार फिरेल याची दक्षता घ्यावी.
ब्रशहोल्डर त्वचेवर ९० अंशात असावा.
ब्रश त्वचेवर क्लॉकवाईज फिरवावा.
ब्रश फिरण्याची गती योग्य असावी.
कोणत्या त्वचेवर ब्रश युनिट वापरू नये?
मधुमेह असणाऱ्या ग्राहकाला वापरू नये.
कोणतीही केमिकल ट्रीटमेंट केली असेल तर वापरू नये.
ग्राहकाच्या त्वचेवर खूप केसं असतील तर वापरू नये.
त्वचा कडक उन्हामुळे पोळली असेल तर वापरू नये.
कोणताही त्वचा रोग, ताजी जखम आणि अॅक्ने असेल तर हे मशीन वापरू नये.
12/07/2024
आज आपण फेसपॅक संदर्भात माहिती पाहू या .
फेसपॅक काय काम करते ?
फेसपॅक मुळे त्वचा ताजीतवानी होते. कारण त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते . त्वचेवरील छिद्रे साफ होतात . त्यामुळे त्वचेला पोषण आणि ऑक्सीजनचा पुरवठा होतो . त्वचेचा पोट सुधारतो . त्वचा टाईट होण्यास मदत होते . चेहऱ्याचे स्नायू टोन होतात . त्वचेचा तेलकटपणा कमी होतो . आणि त्वचा निरोगी ,सतेज राहण्यास मदत होते .
फेसपॅक हे त्वचेनुसार निवडले जावेत . खूप जण आपल्या स्वयंपाक घरातील वस्तू वापरुन फेसपॅक बनवितात . पण चेहऱ्याला काहीही लावण्या अगोदर जे चेहऱ्याला लावणार आहे त्याची माहिती असणे गरजेचे आहे .
आता पहिल्या सारखे नेेसर्गिक काही मिळत नाही . शिवाय आजकालची हवा आणि पाणी सुद्धा बदले आहे . त्यामुळे पूर्वीच्या लोकांकडून आपण एेकतो की “ आम्ही काही तुमच्या सारखे खूप प्रॉडक्ट वापरत नव्हतो ”. काही ते अंशी खंर पण आहे . एक तर त्या वेळेस एवढे ब्रॅंड बाजारात नव्हते . शिवाय त्या वेळेची जीवनशेेलि खूपच वेगळी होती ना . असो .
स्वयंपाक घरातील वस्तू वापरुन बनविलेले फेसपॅक खूप प्रबही नसतात. कारण ते फक्त त्वचेच्या बाहेरील स्तरावर तेवढ्यापुरते काम करतात तेही एका वयापर्यंत . हे वास्तव आहे .
आजकालचे प्रोडक्टस हे नॅनो टेक्नॉलॉजीने बनविल्यामुळे ते त्वचेवर जास्त परिणामकारक असतात . फेसपॅक सुद्धा . फेसपॅक सेटिंग मास्क ,नॉनसेटिंग मास्क ,विशिष्ट मास्क या प्रकारात मोडतात .
सेटिंग मास्क मध्ये मातीसारख्या घटकांचा समावेश असतो . उदा . मुलतानी माती ,केओलिन पावडर , कॅलमाईन पावडर , विशिष्ट प्रकारचे सल्फर किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट .
नॉन सेटिंग मास्क मध्ये नेेसर्गिक घटकांपासून बनविलेले असतात .
विशिष्ट मास्क हे त्वचेच्या गरजेनुसार बनविलेले असतात . उदा. जेल मास्क , वॅक्स मास्क , टाईट मास्क.
म्हणूनच फेशीअलचा रिझल्ट चांगला येण्यासाठी सर्व गोष्टी अभ्यासात असाव्यात
10/07/2024
फेशीअल मसाजच्या स्टेप्स आणि त्याचे फायदे
त्वचा चांगली राहण्यासाठी मसाज हा महत्वाचा असतो . मसाज मुळे रक्तप्रवाह सुधारतो . त्यामुळे लिम्फॅटिक सिस्टीमचे कार्य सुधारते . मसाजमुळे पेशींचे आरोग्य चांगले राहते . मसाजमुळे मानसिक तणाव दूर होतो . शास्त्रोक्त पद्धतीने मसाज केल्याने डोळ्यांभोवती मसाज करताना अतिशय हलक्या हाताने करावा कारण तेथील त्वचा जास्त नाजुक असते . गळ्याभोवती आणि चेहऱ्याच्या मसाज मुळे तेथील स्नायू चांगले राहण्यास मदत होते . शिवाय त्वचेच्या अॅसिडचा समतोल साधला जातो .
फेशीअल स्टेपची नावे
१. एफ्लराज : स्वीडिश मसाज मधील ही एक स्टेप आहे . ह्या स्टेपमुळे स्नायूंचा थकवा दूर होतो आणि हलकेपणा वाटतो .
२. पेट्रीसाज : या स्टेपमुळे तेेलग्रंथी उत्तेजित होतात . त्वचेला तरतरी येते .
३. टॅपोटमेंट : या स्टेपमुळे त्वचेचे टोनिंग होण्यास मदत होते . चेहऱ्यावरील हावभाव निर्माण करणाऱ्या स्नायूंना बळकटी येते .
४. फ्रिक्शन : या स्टेपमुळे त्वचेची लवचिकता वाढण्यास मदत होते . ग्रंथी कार्यास सक्रिय होतात . लिम्फ प्रवाह सुधारतो .
५. व्हायब्रेशन : या स्टेपमुळे त्वचेखाली असलेल्या थरांना हलक्याने उत्तेजित केले जाते . स्नायूमधील थकवा आणि वेदना नष्ट होतात .
28/06/2024
फेशीअल
फेशीअल सलोन मधील कर्मचाऱ्याची आणि ग्राहकाची आवडती सर्विस आहे .
फेशीअल मसाज साठी फेशीअल स्नायूंची माहिती असणे अतिशय आवश्यक आहे .
फेशीअल मध्ये मेकअप रिमूव्हर , क्लीनझिंग ,स्क्रबिंग , स्टीमिंग , टोनिंग , मसाज , फेसपॅक , टोनिंग आणि शेवटी सनस्क्रीन या सर्व सेवा क्रमाने होतात .
यातील आपण प्रत्येक पायरीची माहिती पाहू या .
मेकअप रिमूव्हर : कधी कधी ग्राहकाच्या चेहऱ्यावर मेकअप असतो तो प्रथम मेकअप रिमूव्हरने काढावा . सर्व प्रथम डोळ्याचा मेकअप काढावा . नंतर लिपस्टिक काढावी . मग पूर्ण चेहरा आणि मानेचा मेकअप काढावा . डोळ्याचा मेकअप काढताना काळजीपूर्वक काढावा . मेकअप काढताना कापूस किंवा टिशू पेपर वापरावा .
क्लीनझिंग : क्लीनझिंग मध्ये दोन प्रकारचे क्लीनझिंग होते . एक असते जे नॉर्मली त्वचेच्या सर्वात वरच्या स्तराच्या पहिल्या स्तरावर केले जाते . या मध्ये क्लीनझिंग लोशन लावून हलक्या हाताने दोन/तीन मिनिटं मसाज केले जाते . नंतर ते पुसून घेऊन कोरडे करावे . अलीकडच्या प्रोडक्टस मध्ये डिप क्लीनझिंग सुद्धा असते . हे प्रॉडक्ट त्वचेच्या वरच्या स्तरावरील पहिल्या स्तराच्या थोडे खाली जाते . शिवाय त्वचेवरील रोमछिद्रा मध्ये जाऊन साफ करते . या प्रॉडक्टमुळे त्वचा त्या स्तराच्या थोडे आतून साफ झाल्याने रोमछिद्रे स्वच्छ होतात .
स्क्रबिंग : ,स्क्रबिंग करणे म्हणजेच मृत त्वचा काढणे . या साठी अतिशय बारीक स्क्रब वापरतात किंवा ग्राहकाच्या त्वचेनुसार पिल (केमिकल पिल नाही) वापरतात . या मध्ये व्हेजिटेबल पिल वापरतात . हे त्वचेसाठी सुरक्षित असते . पण अति संवेदनशील त्वचेसाठी वापरू नये . पाणी आणि टिशू पेपरने स्वच्छ करावी .
स्टीमिंग : त्वचेला वाफारा देणे . हे सुद्धा त्वचेवरून ठरवावे कारण जर ग्राहकाची त्वचा कोरडी किंवा शुष्क असेल तर वाफ देऊ नये . त्याने त्वचेवर अजून कोरडेपणा येऊ शकतो .
या नंतर ब्लॅकहेड आणि व्हाइटहेड काढून घेणे .
टोनिंग : फ्रेश कापसावर किंवा टिशू पेपरवर टोनर घेऊन हलक्या हाताने कापसाने थोपटावे (टॅपिंग). टोनरमध्ये गुलाब पाणी वापरणे योग्य आहे . अस्ट्रिंजेंट मध्ये थोड्या प्रमाणात अल्कोहोल असल्याने ते फक्त तेलकट त्वचेसाठी वापरावे .
मसाज : त्वचेच्या अनुसरून क्रीम घेऊन मसाज करावे . मसाज हे कुशल आणि लयबद्ध तंत्राने केल्यानेच फायदा होतो . चुकीच्या पद्धतीच्या मसाजने त्वचा खराब होते . मसाज मध्ये काही बिंदु (पॉइंट) वर हलक्या हाताने दाबल्यावर त्वचेवर चांगले परिणाम दिसतात . मसाज मुळे पेशीना चैतन्य मिळते . रक्तप्रवाह सुधारतो . मानसिक ताण दूर झाल्याने फ्रेश वाटते . मसाजने स्नायू चांगले होतात .त्वचेच्या अॅसिडचा समतोल राखण्यास मदत होते .
फेसपॅक : त्वचेला अनुसरून फेसपॅक निवडावा . फेसपॅक मुळे छिद्रे साफ झाल्यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा वाढतो . रक्ताभिसरणाचे कार्य सुधारल्याने त्वचेचा रंग ,पोत सुधारतो . योग्य फेसपॅकने चेहऱ्यावरील हलक्या रेषा ,हलक्या सुरकुत्या कमी होतात . फेसपॅक मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत .
टोनिंग : : फ्रेश कापसावर किंवा टिशू पेपरवर टोनर किंवा गुलाबपाणी घेऊन हलक्या हाताने कापसाने थोपटावे (टॅपिंग).
सनस्क्रीन : फेशीअल केल्यावर सनस्क्रीन कटाक्षाने लावावे . कधी ऊन असते . कधी ग्राहक लगेच गॅस किंवा निळ्यास्क्रीन (ब्लूस्क्रीन) समोर बसतात म्हणून सनस्क्रीन अवश्य लावावे .
26/06/2024
ब्लीचिंग
ब्लीचिंग ही ब्युटी पार्लर मध्ये खूप चालणारी सर्विस आहे . पण मला एक खेदाची गोष्ट वाटते ती म्हणजे खूपदा ग्राहकांना ही सर्विस कशी योग्य आहे हे सांगितले जाते .
पण खरंच प्रत्येक महिन्याला करावे का ब्लीचिंग ?
काही लोकांना दर महिन्याला पूर्ण बॉडी ब्लीच करण्याचे सुचविले जाते .
आज आपण हेच पाहू की ब्लीच करावे की नाही ? करावे तर कुणी आणि कितीदा करावे?
ब्लीच म्हणजे काय ? पहिलं आपण समजून घेऊ या .
हायड्ड्रोजन पेरोक्साइड , सोडियम हायपोक्लोराईड , कॅल्शियम हायपोक्लोराईड मुख्य घटक ब्लीच मध्ये असतो. ह्या घटकांमुळे केसांचा रंग बदलण्यास मदत होते . परंतु हे स्कीन किंवा हेअर साठी चांगल नसतं. केसांच्या सर्विस मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ब्लीच वापरले जाते .
ब्लीच मुळ चेहऱ्यावरील केसांचा रंग हलका होतो . ज्यांच्या चेहऱ्यावर जाड केसं आहेत आणि जास्त केसं आहेत त्यांना ब्लीच सोयीचे वाटते . पण अश्या लोकांनी सुद्धा वर्षातून फक्त २/३ वेळाच ब्लीच करावे . ब्लीचिंग हे प्रत्येकाच्या त्वचेनुसार करावे . त्याचे मिश्रण योग्य प्रमाणात करावे आणि त्वचेवर ब्लीच ठेवण्याची वेळ पण त्वचेवर अवलंबून असते .
ब्लीच मुळे वांग (पिगमेंटेशन ), चेहऱ्यांवरील डाग जातात किंवा कमी होतात हा समज चुकीचा आहे . ब्लीच मधील घटकांमुळे त्वचेवरील मृत त्वचा निघाल्यामुळे त्वचा ताजीतवानी वाटणे साहजिक आहे . यांचा अर्थ ब्लीच मुळे त्वचा चांगली होते असं नाही .
तुम्ही घरात पांढरे कपडे धुण्यासाठी कधी ना कधी ब्लीच वापरलेले असेल . तेव्हा कपडे पहिल्या पेक्षा थोडे खरबरीत जाणवले असतील . त्या वरुन अंदाज येईल की आपल्या त्वचेवर त्यांचे काय परिणाम होत असतील . म्हणून प्रत्येक महिन्याला ब्लीच करावे की नाही हे ठरवावे .
ब्लीचचे मिश्रण त्वचेवर जास्त वेळ ठेवू नये . खूप प्रॉडक्टच्या बॉक्स वर २० मिनिटे ठेवण्याचे सांगितले जाते . ब्लीच किती वेळ ठेवावे हे पूर्णतः त्या त्वचेवर अवलबुंन असते हे ध्यानात असू द्यावे . ब्लीच करण्या अगोदर पॅच टेस्ट करावी .
ब्लीचिंग केल्यावर लगेच सूर्य प्रकाश्याच्या संपर्कात आल्याने त्वचा काळी पडू शकते . ब्लीचिंग नंतर लगेच अल्कोहोल असलेले प्रॉडक्स वापरू नये . ज्यांना मुरूम (अॅक्ने), सोरायसिस किंवा इतर त्वचेचे विकार असेल , त्वचा संवेदनशील असेल अश्या लोकांनी ब्लीच करू नये.
24/06/2024
22/06/2024
मागील काही भागात थ्रेडिंग ,पेडिक्युर , मॅनिक्युर आणि वॅक्सिंग बद्दल माहिती पहिली
त्याच्याच संदर्भात अजून काही..
21/06/2024
वॅक्सिंग (waxing)
वॅक्सिंग यालाच डेपिलेशन सुद्धा म्हणतात . शरीरावरील नको असलेल्या केसांना वॅक्सिंग द्वारे काढतात. काही जण शेविंग , हेअर रिमूव्हर आदींचा सुद्धा करतात . परंतु वॅक्सिंग हा उत्तम पर्याय आहे. शेविंग आणि हेअर रिमूव्हर क्रीम च्या वापरणे येणारे केसं हे राठ असतात शिवाय लगेच येतात . कालांतराने त्वचेवर त्यांचा परिणाम होऊ शकतो .वॅक्सिंगमूळे मृत त्वचा (डेड स्कीन) निघते आणि त्वचा चांगली दिसते.
मानवी शरीरावर दोन प्रकारचे केसं असतात.
एक वेलस किंवा लनूगो हेअर . जे आपल्या पूर्ण शरीरावर (तळहात आणि तळपाय सोडून) असतात. ही केसं लहान , पातळ आणि खालच्या दिशेने वळलेली असतात. या केसांचा रंग थोडा हलका असतो . स्त्रियांचा शरीरावर वेलस हेअर ५५% असतात.
दुसरा प्रकार टर्मिनल हेअर. जे आपल्या डोक्यावर असतात. या मध्ये हेअर शाफ्ट असतात. ही केसं वेलस केसांपेक्षा जरा जाड असतात .
हार्मोन्स असंतुलन, गर्भ निरोधक गोळ्या आणि अनुवांशिकता अश्या कारणांमुळे काही स्त्रियांना शरीरावर केसं थोडी जाड असतात.
वॅक्सचे तीन प्रकार असतात.
१. शुगर वॅक्स : खूप वर्षांपूर्वी हेच वॅक्स सर्रास वापरले जायचे. हे वॅक्स साखर ,लिंबू किंवा सायट्रिक अॅसिड, आणि पाण्यापासून बनवितात. हे वॅक्स घरी बनवू शकतो.
२. हनी वॅक्स : हे वॅक्स मध्यमाशीचे मेण आणि रेसिन पासून बनवितात.
३. क्रीम वॅक्स (लिपोसोल्युबल वॅक्स) : हे वॅक्स आजकाल खूप वापरतात. व्हेजिटेबल ऑइल, मध्यमाशीचे मेण, ग्लिसरील रोझिनेट ,झिंक ऑक्साईड ,टायटॅनियम डायऑक्सइड , लिनाऊल इ. पासून बनविलेले असते.
कोणी वॅक्सिंग करू नये ?
१ . कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य रोग.
२ . त्वचेचे विकार .
३ . सनबर्न किंवा सौना याच्या २४ तासानंतर वॅक्सिंग करावे.
४ . व्हेरिकोंज व्हेन्स असणाऱ्यांना वॅक्सिंग काळजीपूर्वक करावे कारण या शिरा त्वचेच्या पृष्टभागावर असल्याने शिरा फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.
12/06/2024
पेडीक्युअर आणि मॅनिक्युर साठी लागणारी आयुध (टूल्स )
नेल कटर: नखं कापण्यासाठी .
नेल फायलर : नखांना आकार देण्यासाठी .
नेल बफर : नखांना स्मूथ बनविण्यासाठी आणि चमक आणण्यासाठी .
कयूटीकल पुशर : कयूटीकल मागे पुश करण्यासाठी .
कयूटीकल कटर : कयूटीकल कट करण्यासाठी .
प्यूमीक स्टोन /फूट स्क्रॅपर : टाचा मऊ करण्यासाठी .
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
412307
Opening Hours
| Monday | 11am - 5pm |
| Tuesday | 11am - 5pm |
| Wednesday | 11am - 5pm |
| Thursday | 11am - 5pm |
| Friday | 11am - 5pm |