Aarogya Page

Aarogya Page

Share

"तंदुरुस्त शरीर, निरोगी जीवन! 🌿💪 तुमच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह माहिती, घरगुती उपाय आणि तज्ज्ञांचे आरोग्य सल्ले.

24/05/2025

शेती करणाऱ्या महिला दिवसाचा बहुतांश वेळ वाकून, वजन उचलून, निसर्गाशी झगडत काम करत असतात. ही कामं वारंवार आणि चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पाठदुखी (Back Pain) ही एक सामान्य पण गंभीर समस्या बनते.

पाठदुखीचे प्रमुख गुंतागुंतीचे प्रकार

1. ❌ मसल स्ट्रेन (Muscle Strain)
माती उकरताना किंवा ओझं उचलताना पाठीला ताण येतो.
लक्षणं: अचानक पाठीत कळ, हालचालींमध्ये अडथळा.

2. 🦴 स्नायूंची जखम (Ligament injury)
लांब वेळ वाकून काम केल्यामुळे स्नायूंवर ताण येतो.
लक्षणं: उठताना/वाकताना त्रास, पाठ थोडी सुजलेली वाटते.

3. 🌀 डिस्क स्लिप (Slipped Disc / Herniated Disc)
सतत जमीनीवर बसून काम केल्यामुळे कंबर-पाठीच्या हाडांमधील डिस्क सरकते.
लक्षणं: पाठीतून पायापर्यंत कळ जाणं, सुन्नपणा, थकवा.

4. 🧓 दीर्घकालीन सांधेदुखी (Chronic Back Pain / Arthritis)
वय वाढल्यावर अस्थी घासत जातात – विशेषतः उन्हात, थंडीत काम करताना वाढतं.
लक्षणं: सतत दुखतं, औषध घेतल्यावर थोडा आराम होतो.

⚠️ कारणं:
वाकून काम करणं (तण काढणं, लागवड)

वजन उचलणं (खते, पाणी, पीक)

जमीनीवर बसून काम

योग्य पोषणाचा अभाव

पुरेशी विश्रांती न मिळणं

चप्पल/बूट न वापरणं – थेट मातीवर काम

🛠️ उपाय व काळजी:
✅ दैनंदिन सवयी सुधाराव्यात:
शक्य तिथे वाकण्याऐवजी बसून काम करा

ओझं उचलताना दोन्ही हात वापरा, अचानक वाकू नका

जास्त वेळ काम केल्यावर थोडी विश्रांती घ्या

🧘‍♀️ सोपे व्यायाम (योगासने):
भुजंगासन (Cobra Pose)

मरकतासन (Spinal Twist)

सेतूबंधासन (Bridge Pose)
👉 ह्यामुळे पाठदुखी कमी होते आणि शरीर लवचिक राहतं.

🍲 पोषण:
कॅल्शियम व व्हिटॅमिन D युक्त आहार घ्या (दूध, ताक, भाजी)

घरगुती तेलात मसाज करा

🩺 डॉक्टरांकडून तपासणी आवश्यक:
त्रास सातत्याने असेल तर X-Ray / MRI करून घ्या

योग्य औषध व उपचार घ्या

02/04/2025

स्मार्ट आहार : हृदय मजबूत ठेवण्याचा सोपा मार्ग

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

यासाठी आपल्या आवडत्या पदार्थांचा त्याग करण्याची गरज नाही, तर फक्त काही स्मार्ट पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.

1) अधिक फायबरयुक्त आहार घ्या. संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि भाज्यांचा समावेश कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते.

2) अती प्रमाणात मिठाचे सेवन, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.

3) जास्त मीठ रक्तदाब वाढवतो आणि त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

4) आपण चांगला आहार घ्या बदामासारखे चांगल्या प्रकारची चरबी किंवा मेद असलेले पदार्थ खा.
साखर मर्यादित ठेवा : जास्त साखर लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढवते.

5) 80/20 नियम पाळणे हा एक सोपा उपाय आहे – ८०% वेळा आरोग्यदायी आहार घ्या आणि २०% वेळा जे जिभेला आवडतं ते खा.

01/04/2025

कधीच येणार नाही हार्ट अटॅक, हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर हरेश मेहतांनी सांगितलेले हे 5 उपाय करा, एकदम टकाटक राहील हृदय.

आज हृदयरोग हा जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे जगभरातील लोकांची हृदय कमकुवत होत चालली आहे.

यावर उपाय काय, हा प्रश्न अनेकजण विचारतात. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेलच. तर यावर उत्तर एकच ते म्हणजे लहान-लहान पण सातत्याने केलेले जीवनशैलीतील बदल हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात.

अनेकांना वाटते की हृदयरोग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदल आवश्यक आहेत, पण प्रत्यक्षात, छोटे -छोटे, जीवनशैलीतील बदल दीर्घकाळ परिणामकारक ठरतात.

प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हरेश मेहता, सल्लागार – पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, खार, मुंबई यांनी यावरच एक मार्गदर्शनपर माहिती दिलेली आहे. जी आपल्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकते.

29/03/2025

लवंगामध्ये असलेले एक महत्त्वाचे घटक म्हणजे युजेनॉल, जे दातदुखी रोखण्यास मदत करते. बरेच लोक ते बारीक करून वेदनादायक भागावर लावतात.

ते संपूर्ण चावल्यानेही वेदना कमी होतात. पण मुलांसाठी हा चांगला पर्याय नाही. नकळत देखील लवंग गिळणे धोकादायक आणि वेदनादायक असू शकते.

💪 🌿 🏋️‍♂️ 🍃 🏡 🌱 🥗 ✅ 💖 🏥 🧘‍♂️ 🎯 👨‍⚕️ 🚶‍♂️ 🍏

26/03/2025

मिठाच्या पाण्याने धुणे

दातदुखीवर मिठाच्या पाण्याने धुणे हा सर्वात सामान्य घरगुती उपाय आहे. मिठामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ घटक असतात जे दात आणि हिरड्यांना जळजळीपासून वाचवतात, त्यामुळे दात संसर्गापासून सुरक्षित राहतात. याशिवाय, दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण देखील धुण्याने निघून जातात.

💪 🌿 🏋️‍♂️ 🍃 🏡 🌱 🥗 ✅ 💖 🏥 🧘‍♂️ 🎯 👨‍⚕️ 🚶‍♂️ 🍏

25/03/2025

लिंबाचा वापर

लिंबू हे व्हिटॅमिन सीचा एक उत्तम स्रोत आहे. दातांच्या दुखणाऱ्या भागावर लिंबाचा तुकडा लावल्याने वेदनांपासून त्वरित आराम मिळतो. दातदुखी ही किडणे किंवा पोकळीमुळे होते, अशा परिस्थितीत हे घरगुती उपाय काही काळ आराम देऊ शकतात. जर वेदना कमी होत नसतील तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या

#लिंबूफायदे 🍋 #आरोग्यसंपदा 💪 #दातदुखीउपाय 🦷 #घरगुतीउपाय 🏡 #विटॅमिनC 🌿 #नैसर्गिकउपचार 🌱 #स्वस्थराहा 😊 #दातांचीकाळजी 💖

25/03/2025

२४ तासांत एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे? डॉक्टरांनी सांगितली पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत.

🕒 २४ तासांत किती पाणी प्यावे? 💧
✅ डॉक्टरांनी सांगितले योग्य वेळ आणि पद्धत! ✅

💡 सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी – पचनासाठी उत्तम!
💡 जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी आणि नंतर पाणी प्या – आरोग्यासाठी फायदेशीर!
💡 थोड्या-थोड्या वेळाने पाणी प्या, एकदम जास्त नाही!
💡 झोपण्याच्या आधी थोडेसे पाणी प्या – शरीर हायड्रेट राहील!

🚰 दररोज २.५ - ३ लिटर पाणी पिणे आवश्यक!

पृथ्वीचा आणि आपल्या शरीराचा एक मोठा भाग पाण्याने भरलेला आहे. जर यात घट झाली तर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ लागतात. विशेषतः उन्हाळ्यात, योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

पाणी पिण्याचे १०० हून अधिक फायदे आहेत. पल्या शरीराचा सुमारे ६०% ते ७०% भाग पाण्याने बनलेला असतो. रीराला इतर सर्व आवश्यक खनिजांप्रमाणेच पाण्याचीही आवश्यकता असते.

पाणी शरीराला सर्व आवश्यक घटक आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. एवढेच नाही तर आपले संपूर्ण शरीर ७५ टक्के पाण्याने बनलेले आहे. जर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर डिहायड्रेशन, चिडचिड आणि बेशुद्धी येऊ लागते.

शरीराच्या वजनानुसार, प्रत्येक २० किलो वजनासाठी एक लिटर पाणी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, दिवसभरात किमान दोन ते अडीच लिटर पाणी आवश्यक असू शकते किंवा काही लोकांना तीन लिटर पाण्याची देखील आवश्यकता असू शकते.

Category

Address


Pune
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarogya Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.