nileshtalele6

nileshtalele6

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from nileshtalele6, Health/Beauty, l m ngr, Thane.

27/11/2025

येळकोट येळकोट जय मल्हार
चंपाषष्ठी तळी भंडारा उत्सव मठामध्ये साजरी करण्यात आला

19/11/2025
Photos from nileshtalele6's post 24/10/2025

*🙏🌸शुभ दिपावली🌸🙏*
*
🙏🌸भाऊबीज🌸🙏*

*जपावे नाते निशमय भावनेने जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने ।। भाऊबीजेच्या निमित्ताने सर्व भाऊ व बहिणींना स्वामीमय शुभेच्छा ।।आज तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा,आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणीं प्रार्थना🙏🙇‍♂️*

19/10/2025

. 🙏 *जाहीर निमंत्रण* 🙏
🌺 *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ll* 🌺
🌸 *॥ श्री स्वामी समर्थ ॥* 🌸
🏮 *॥ स्वामीमय दिवाळी पहाट २०२५ ॥*🏮

आपनास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने, यंदाचा दिवाळी पहाट महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी नरक चतुर्दशीच्या शुभ प्रसंगी, सुर्यनारायणाच्या साक्षीने, श्री स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याचा पवित्र सोहळा संपन्न होईल.

*कार्यक्रमाची रुपरेषा*:

- *पहाटे ४.३० वा.* श्री ची काकडा आरती
- *पहाटे ४.५५ वा.* दिव्यांची आरास
- *पहाटे ५.०० वा.* श्रीं च्या मूर्तीवर अभ्यंग स्नान (अभिषेक)
- श्री स्वामी समर्थ सेवेक-यांना मुर्तीवर अभिषेक सकाळी ५ ते ६ या कालावधीतच करता येईल
- *सकाळी ६.०० वा.* श्री स्वामी समर्थ भजन मंडळाचे सुमधुर भजन
- *सकाळी ७.३० वा.* श्री ची आरती

तरी सर्व श्री स्वामी समर्थ सेवेक-यांनी, भक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या चरणी आपली सेवा रुजु करावी.

*स्थळ - श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र डवले नगर लोकमान्य नगर ठाणे.*
सदर सेवेबाबत आपल्याला सुचना किव्हा मार्गदर्शन करावयाचे असल्यास मंडळाचे व्यवस्थापक / कार्याध्यक्ष, मार्गदर्शक श्री मनोहर उतेकर(मामा) यांच्याशी संपर्क साधावा.
☎️9221707058

Photos from nileshtalele6's post 14/10/2025

, 🌸 *श्री स्वामी समर्थ* 🌸
🌸 *सस्नेह निमंत्रण* 🌸
✨ *अभिष्टचिंतन सोहळा* ✨

आपणास कळविण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की *गुरुवर्य श्री. मनोहर (मामा) उतेकर* यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास आपणांस सस्नेह आमंत्रित करीत आहोत.

आपली उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे.
कृपया उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

📅 दिनांक: १३ नोव्हेंबर २०२५
🕗 वेळ: रात्री ८.०० वा.
📍 स्थळ: उतेकर मामा यांचे निवासस्थान,
समर्थ निवास, डवलेनगर, ठाणे

05/10/2025

' *॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ll*
*॥ श्री स्वामी समर्थ ॥*

🏵️ *मासिक पौर्णिमा - पादुका अभिषेक सोहळा*🏵️

आपल्याला कळवताना आनंद होत आहे की *श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र, डवलेनगर, ठाणे* येथील मठातील *श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पूजेतील पादुकांचा अभिषेक सोहळा दर पौर्णिमेला सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत मठात पार पडतो.* अभिषेकसाठी इच्छुक स्वामी भक्तांनी कृपया मठाचे कार्याध्यक्ष श्री. मनोहर (मामा) उतेकर यांच्याशी संपर्क साधावा.

*अधिक माहितीसाठी संपर्क:*
*श्री मनोहर (मामा) उतेकर (9221707058)*

*पत्ता:-*
*श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र*
डवलेनगर मैदान, लोकमान्य नगर टी. म. टी. बस डेपोच्या मागे, लोकमान्य नगर, ठाणे (पश्चिम)

*असें पातकी दीन मीं स्वामी राया |*
*पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||*
*नसे अन्य त्राता जगी या दीनाला |*
*समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ||*

28/09/2025

ठाण्याची दुर्गेश्वरी 🙏💐💐

12/09/2025

🌸 *॥ श्री स्वामी समर्थ ॥* 🌸

*🙏 उत्सव ललिता पंचमीचा , पावनभूमी अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या आगमनाचा 🙏*

मूळस्थान अक्कलकोटहून अध्यात्माची कास जोडण्याचे कार्य करणाऱ्या  समर्थ नगरी परिवार अक्कलकोट  (एक पाऊल अध्यात्माकडे ) यांच्या वतिने अक्कलकोटसह राज्यभरात ललीता पंचमी ( महाराजांचा अक्कलकोट येथील आगमनाचा दिवस )  उत्सव नामस्मरणचा म्हणून विश्वशांती व मन शांती करीत एकत्रीत नामस्मरणात साजरा करण्यात येत आहे. *या उत्सवा बाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी अक्कलकोट येथुन शनिवारी दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता उपस्थित राहणार आहेत. तसेच या वेळेत अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान येतील श्री. स्वामी समर्थ महाराज्यांचा नित्य अलंकार पूजेतील वस्त्र व इतर साहित्याचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.*

सर्व स्वामी सेवकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करावी.

*स्थळ:-*
*श्री स्वामी समर्थ उपासना केंद्र,*
डवलेनगर मैदान, लोकमान्य नगर टी. म. टी. बस डेपोच्या मागे, लोकमान्य नगर, ठाणे (पश्चिम)

*वेळ:- सायंकाळी ०७.०० ते ०८.३०*

12/09/2025

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🌹🌹

Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


L M Ngr
Thane
400606