Neha ghag

Neha ghag

Share

✒♊Simple & friendly 😘
✒♊Fashion Full 🕶️👛
🤎Cheer Life 🤎

03/04/2026
Photos from Narendra Modi's post 03/04/2026
03/04/2026

आदरणीय देवेंद्रजींच्या विकासाभिमुख नेतृत्वात श्री क्षेत्र जोतिबा मंदिर व परिसराचा विकास प्रगतिपथावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हे पवित्र तीर्थक्षेत्र लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असून, या ठिकाणाच्या विकासासाठी २५० कोटींच्या विकास आराखड्याला भाजपा-महायुती सरकारने मंजुरी दिली आहे.

जोतिबाच्या कृपेने मंदिर व परिसराचा हा कायापालट निश्चितच राज्याच्या प्रगतीला गती देईल.

[ Jyotiba Temple, Kolhapur, Temple Development, Infrastructure Development, Cultural Heritage, BJP Mahayuti ]

03/04/2026

जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार आणि मराठी लेखक राजू बाविस्कर यांना त्यांच्या 'काळ्यानिळ्या रेषा' या गाजलेल्या आत्मकथेसाठी २०२५ चा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्य-सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढवणारा आहे. त्यांच्या या सन्मानाने नवोदित लेखक आणि कलाकारांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

आपल्या प्रतिभेने आणि कष्टाने महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या राजू बाविस्कर यांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

[ Raju Baviskar, Sahitya Akademi Award, Marathi Literature, Maharashtra Pride ]

#मराठीसाहित्य

03/04/2026

राज्याच्या वाहतूक व्यवस्थेत डिजिटल क्रांती!

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डचे लोकार्पण करण्यात आले आहे.

हे अत्याधुनिक स्मार्ट कार्ड 'RuPay On-The-Go' तंत्रज्ञानावर आधारित असून यामुळे एसटीचा प्रवास डिजिटल, पारदर्शक आणि अधिक सुलभ होणार आहे.

डिजिटल महाराष्ट्राच्या ध्येयाला गती देणाऱ्या या उपक्रमामुळे राज्याची वाहतूक व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि आधुनिक बनेल, असा विश्वास आहे.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

[ Digital Maharashtra, Digital Transport, NCMC, MSRTC, RuPay On The Go, Smart Card, Devendra Fadnavis ]

Photos from Ravindra Chavan's post 03/04/2026
Want your business to be the top-listed Beauty Salon in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Mumbai
Thane